वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
13 Mar 2016 - 3:28 pm

मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला-----

पाषाणभेदने क्लायंटला आपले बोलणे पटवून दिले. क्लायंटसमोरील काम संपल्यानंतर आपल्या कामाच्या धोपटीत आपली नेहमीची कागदपत्रे ठेवली अन ती आपल्या खांद्यावर अडकवली. थोड्याच अंतरावरील एका तालूक्याच्या बस स्थानकाकडे तो निघाला.

तर हा पाषाणभेद एके दिवशी भल्या पहाटे उठून दोन जिल्हे ओलांडून एका तालूक्याच्या गावी आला होता. दुपारपर्यंत त्याने त्याच्या व्यवसायाशी संबंधीत कामे केली अन तो आता बस पकडून पुन्हा आपल्या घरी येण्यासाठी बस स्थानकाकडे चालला होता.

त्याचा सकाळचा नाष्टा अशाच कोणत्यातरी रस्त्यावरच्या हॉटेलात झाला होता अन दुपारचे जेवण म्हणजे केवळ मिसळपाव खावून त्याने समाधान मानले होते. आता घरी परत जाण्याच्या ओढीने भूक जाणवत नव्हती. बसची वाट बघत तो बसस्थानकावर एका बाकड्यावर बसला. वे़ळ जाण्यासाठी एक प्रवासी अन बसस्थानक कंट्रोलर यांचे त्याने भांडण पाहिले, मोबाईलमध्ये इमेल्स अन व्हाट्सअप मधले मेसेजेस वाचले, पाण्याची बाटली विकत घेतली. तेव्हढ्यात आधीच्या एका जिल्ह्याच्या गावी जाणारी बस फलाटाला लागली.

थेट बस नसल्याने तो या बसमध्ये बसला. गर्दीचा मोसम नसल्याने बसमध्ये उजव्या बाजूकडच्या दोन सिटमधल्या कडाच्या सिटवर तो बसला. त्याच्या शेजारी असलेला एक पंचविशीचा असलेला प्रवासी तरूण खिडकीतून बाहेर बघत होता. मधल्या मार्गीकेच्या बाजूला असलेल्या दोन जणांच्या जागेवर खिडकीच्या बाजूला एक तरूणी अन तिच्या शेजारी एक तरूण बसलेला त्याला दिसला. तिचे वय साधारणतः बाविस अन तिच्या शेजारच्या तरूणाचे वय साधारण पंचविस सव्वीस असावे. त्या तरूणीच्या पायाशी एक मोठीशी सुटकेस होती. बहूदा ते जोडपे नवविवाहीत, किंवा बहीणभाऊ देखील असावेत असा त्याने अंदाज केला. एकतर ती सासरी जात असावी किंवा माहेरीतरी. सासरी किंवा माहेरी जिथे कुठे ती जात असेल तिथे तिचा भाऊ सोडायला किंवा तिचा पती तिला घेवून जायला नेत असावा.

बस ज्या प्रदेशातून जात होती त्या भागात उन अधिकच जाणवते. बाहेर रखरखीत उन, दुपारची वेळ अन त्यात एस्टीमधील मिळालेली जागा, या तिन गोष्टींच्या सम्मुच्चयाने पाषाणभेदाला झोप येवू लागली. पण एसटीतली झोप कितीशी शांततेची, गाढ असणार? त्यातच रस्त्यावरच्या गावांचा थांबा घेत घेत बस चालली होती. प्रवाशांची चढउतार होत होती. त्यामुळे त्याची झोप चाळवत होती. कधी तो बाकाच्या मागच्या बाजूला मान रेलून तर कधी समोरच्या दांडीवर आडवा हात ठेवून झोपू पाहत होता. या झोपेच्या चाळवाचाळवीतून जागे होत तो रस्त्यावरचे, बसमधले दृष्य पाहत होता.

पाषाणभेदाच्या शेजारचा खिडकीजवळचा तरूण मोबाईलशी चाळवाचाळव करत होता. हेडफोन लावून काहीतरी व्हिडीओ पाहत होता. त्याच्या पलिकडे बसलेले तरूण तरूणी एकमेकांशी हळूवार गप्पा मारत होते. कधी ती तरूणी त्या तरूणाचा मोबाईल हातात धरून काहीतरी करत होती. कधी झोप घेण्यासाठी त्या तरूणाच्या खांद्यावर डोके टेकवून झोप घेवू पाहत होती. पुन्हा गप्पा, हसणे, मोबाईल, झोप अशी तिची सतत क्रिया चाललेली होती.

आताशा जिल्ह्याचे ठिकाण जवळ येत चालले होते. मोठ्या गावाबाहेर जशी एखादी कारखान्यांची वसाहत, मोठे गोदामे, जागा जास्त मिळाल्याने उभे राहणारे बंगले आदी दिसतात तसे दृष्य पाषाणभेद खिडकीतून पाहू लागला. आता त्या शहरातल्या उपनगरांची वस्ती चालू झाली. एकदोन थांब्यावर उतारू कंडक्टरला विनंती करून बस थांबवून लगबगीने उतरत होते. तेवढ्यात त्या तरूणीशेजारचा तरूण उभा राहिला अन त्याने तिचा निरोप घेवून बस एका उपनगरापाशी थांबली असता उतरून गेला. ती तरूणी आता तिच्या दोन सिट च्या बाकावर तिच्या सुटकेससहित एकटीच बसलेली होती.

पुन्हा बस चालू होवून शहराच्या मुख्य स्थानकाकडे जावू लागली. सगळे प्रवासी सामानसुमान हाताशी घेवू लागले. ती शेजारची तरूणीदेखील ती मोठी सुटकेस पायाशी ठेवून उतरण्याच्या तयारीत होती. पाषाणभेदाकडे त्याची केवळ एक धोपटी असल्याने तो निवांत होता.

तेवढ्यात त्या तरूणीने पाषाणभेदाच्या शेजारी असणार्‍या तरूणाकडे त्याचा मोबाईल मागितला. त्या तरूणानेही तो सहज हात पुढे करून दिला. पाषाणभेदाला आता उतरायचे असल्याने त्याने त्या गोष्टीकडे बारकाईने बघितले नाही. कदाचित तो तरूणही त्या तरूणीच्या नात्यातला असावा असे त्याला वाटले. त्या तरूणीने एकदोन वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. तो तरूण मग तिला म्हणाला की 'फोनमध्ये बॅलन्स नसेल म्हणून लागला नाही.'

त्या तरूणीने मग पाषाणभेदाकडे मोबाईल मागितला. वडीलांना फोन करायचा आहे तर 'मी मिसकॉल करते' असे ती म्हणाली. एकतर उतरायची घाई अन एका कॉलचा काय विचार करायचा म्हणून पाषाणभेदाने तिला मिसकॉल वैगेरे नको करू डायरेक बोल असे सांगितले. त्या तरूणीने मग तिच्या वडीलांना फोन लावला अन मी बसस्टँड वर पोहोचतेच आहे तुम्ही घ्यायला या अशा अर्थाचा फोन केला.

बस स्टँडवर आल्यानंतर एकएक उतारू उतरले. पाषाणभेद देखील उतरला. अर्थातच ती तरूणी उतरून तिच्या वडीलांबरोबर गेली असेल. पाषाणभेदाच्या गावी जाणारी बस अजून लागली नसल्याने तो चहा घेण्यासाठी एका हॉटेलकडे वळाला.

हे वाचक माझी कहाणी संपली आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे या जगात मानवप्राणी विचित्र आहे. त्याचा स्वभाव पुर्ण वेगळा आहे. नातेसंबंधांना कसे वाकवावे हे त्याला चांगलेच समजते. या सत्यकहाणीमधील नायक पाषाणभेदाने असलीच एक घटना अनुभवली.

जर ती तरूणी अन तिच्याशेजारचा तरूण एकत्र प्रवास करत होते तर त्यांचे संभवतः नाते काय असावे? जर तो तरूण तिचा भाऊ असेल तर एवढ्या जवळकीने ते दोघे एकत्र का प्रवास करत होते? हास्यविनोद, गुलूगुलू गप्पा का मारत होते? जर तिला तिच्या वडीलांना बस स्टँडवर घ्यायला या असे सांगायचेच होते तर शेजारच्या तरूणाचा मोबाईल तिने का वापरला नाही? कारण गाव तर आलेले होते. ते दोघे जर एकमेकांच्या नात्यातले असतील तर त्या तरूणाने फोन स्वत: का केला नाही? ते दोघे एकत्र प्रवास करत होते तर तो तरूण गाव जवळ आले असता उपनगरात का उतरून गेला?

वाचका, या मधील कोणते पात्र कसे वागले ते तुला चांगलेच समजले आहे. या पात्रांतील नातेसंबंधांवर तू भाष्य करावे असे मला वाटते. माझ्या मनात जे काही आहे ते तूला माहीत आहे. पण तरी तू यावर भाष्य न करता मौन पत्करले तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होवून तुझ्या पायाशी पडतील आणि मी नेहमीसारखा अदृष्य होईल हे लक्षात ठेव.

कथासमाजजीवनमानप्रवासमतप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

13 Mar 2016 - 3:50 pm | योगी९००

अगायायायाया....डोक्याची पार...!!

मस्त लिहीलेयं...एकदम चांदोबा आठवला..!!

तिच्या बाजूला बसलेला तरूण तिचा नवरा किंवा भाऊ असावा. काही महत्वाचे काम असल्याने तो आधी उतरला असावा . तो उतरण्याआधी तिच्या घरी फोन करावयास विसरला असावा..!!

माझे काही प्रश्न
१) आजकालच्या जमान्यात सगळ्यांकडे फोन असतात. त्या तरूणीकडे फोन नसावा हे पटतं नाही. (का तिचा बॅलन्स/बॅटरी संपली असावी?)
२) पाषाणभेद जर त्या तरूणीच्या जवळ होता तर त्या तरूणीने पाषाणभेद यांना आधी न विचारता त्यांच्या बाजूच्या तरूणाकडे आधी फोन का मागितला?

जव्हेरगंज's picture

13 Mar 2016 - 4:08 pm | जव्हेरगंज

लफडं!

तुषार काळभोर's picture

13 Mar 2016 - 4:36 pm | तुषार काळभोर

मी प्रतिसाद टाईप करायला घेतला होता, तो साधारण असा होता:
(टाईमपासमधील शाकालच्या 'दगड!'च्या चालीवर) लफडं !!

दुसरी शक्यता: मित्र/नात्यातील तरुण जो फोन करायला विसरला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2016 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुस-याचं लफ़्र अन आपलं प्रेम. असं नाय चालणार ! :)
प्रेमचं दुसरं काय. पाभेचा चांगला वेळ गेला.

बडी देर कर दी मेरा दिल तोडने में,
न जाने कितने शायर आगे चले गये !!

-दिलीप बिरुटे
(शायर)

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Mar 2016 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

ए डिक्रा तिच्या वडिलाचा नंबर असतो ना रे तुज्या मोबाइल मंदी. देन आस्क हिम नो. सिंपल..... साला आमची दुपारची झोप का म्हणुन खराब करतेस.

पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

13 Mar 2016 - 5:04 pm | सतिश गावडे

ते दोघे पुण्यात हिंजवडीला एखादया आयटी कंपनीत कामाला असतील. एकाच भागातील असल्याने शनिवारी सोबत गावी गेले असतील.

त्याचे ठिकाण येताच तो उतरला. तिचे ठिकाण येताच ती उतरली.

अभ्या..'s picture

13 Mar 2016 - 6:14 pm | अभ्या..

ह्या. असे नाय काय.
त्यो पोर्गा पोरीचा धगड असणार. एकाच गावचे दोघे. पोरीला दुसर्‍या ठिकानी दिलेले. बिचारीने माहेरवासाला येताना धगडाला फोन करुन बोलावली. सासुरवाडीचे काय सोडायला येत नाहीत आजकाल. स्टँडवरुन घरी बापाला फोन केला असेल बॅटरी संपलीय. तासाभरात पोहोचते म्हणून. लगेच चिचाप करायचा फोन (घरचे लोक प्रवासात लै डोके खातेत. कुठवर आलीस, कोण आहे शेजारी वगैरे वगैरे. कटकटच नको) प्रवासात पण टाइमपास झाला. धगडाचे गाव पण आले. बिचारा उतरुन गेला. घरी तर सांगितलेले बॅटरी संपलीय म्हणून. मग दुसर्‍याकडून फोन मागून कॉल करायचा. सगळे सेफ आन क्लीअर ओ.
शब्दार्थः
धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.)
चिचाप : स्विच ऑफ

आणि दफोराव आजून एक रिक्वेस्ट.
ह्या वेताळकथा अशाच रेग्युलरली चालू ठिवलात तर म्या चांदोबा स्टैल एक फर्मास चित्र देईन तुमच्या कथामालेला. ;)

बाबा योगिराज's picture

14 Mar 2016 - 12:31 am | बाबा योगिराज

चीचाप:- मायला पाय कुडै तुमच्ये???

धगड : लग्नानंतर चालू असलेले प्रेमपात्र (लग्नाआधी खडा म्हणतेत, नंतर धगड.)
मायला किती येळ सांगू तुमाले, चार चौघात खर बोलाचं नै म्हणून.

भाऊंचे भाऊ's picture

13 Mar 2016 - 6:08 pm | भाऊंचे भाऊ

नायक सोडून सर्व पात्रांचा उत्तर सोपं आहे वेताळजी

Rahul D's picture

13 Mar 2016 - 8:19 pm | Rahul D

लफडं असेल हो.

नि३सोलपुरकर's picture

15 Mar 2016 - 2:51 pm | नि३सोलपुरकर

अभ्या ..अभ्या .. काय कराला बे !

धगड काय ,चिचाप काय एकदम फर्मास .

पण
पाभे ..ह्या स्टोरीला "भेद " करू शकले नाय , हे कुछ हजम नही हुआ .

नाखु's picture

15 Mar 2016 - 4:09 pm | नाखु

खरी वे (way) ताळ (balance) कथा !

सूचक रस्ता आणि समतोल (ज्याच माप त्याच्याच पदरात)

पाभे लिखाण वाचक नाखु