आखाजीना सन
खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -
नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू
माहेरवास्नी सार्या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात
आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार
गवराई चला ग मांडूया
पुजा तिची करूया
आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे
माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे
(अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या)
- पाभे