Skip to main content

विरंगुळा

अपघात टळला तो प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/12/2024 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

दहीभात...

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 12/11/2024 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

भोरगिरी ते भीमाशंकर

लेखक Bhakti यांनी सोमवार, 11/11/2024 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
अ भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठर

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-१

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 05/11/2024 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
bw *** bw3 ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

एक उनाड सकाळ....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 26/10/2024 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
m1 नेहमीप्रमाणेच पहाटफुटणीला साखर झोपेतून जाग आली. परसदारातली कोकीळ दापंत्ये आणी बांग देणारा कडकनाथ अजून साखर झोपेतच होते. विठ्ठल भक्त, मंदिरात कमळापतीची आराधना करत होते.(उगाच राजकीय संदर्भ शोधू नये.) पाण्याची बाटली,भ्रमणध्वनी आणी थोडा आळसावलेला,थोडा सुखावलेला देह घेऊन बाहेर बाल्कनीत येवून बसलो.

माय(My) मराठी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 07/10/2024 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
'माय ' (my)मराठी! कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला. थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड. आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो! यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 15/08/2024 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 07/08/2024 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 20/07/2024 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.