माहिती

भ्रष्टाचाराचा भस्मासूर

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
22 May 2015 - 3:54 pm

सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.
त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत.
कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती.

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?

सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?

राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?

पानिपत

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 10:45 pm

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

संस्कृतीइतिहाससमाजप्रवासछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

पुस्तकातील चित्रे

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
17 May 2015 - 10:07 pm

आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते.
या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

संस्कृतीकलाइतिहासकथारेखाटनआस्वादमाहितीविरंगुळा

आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !!

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
17 May 2015 - 4:43 pm

आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ).

राहणीमौजमजाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाबातमीमाहितीविरंगुळा

शेयर बाजारातला परतावा. मिथके आणि वस्तुस्थिती

प्रसाद१९७१'s picture
प्रसाद१९७१ in काथ्याकूट
15 May 2015 - 5:45 pm

ह्या धाग्यात टाकलेले टेबल कोणी मला नीट टाकुन देवु शकेल का?

शेयर बाजारा वर एक धागा आणि वरचे प्रतिसाद वाचले. त्यावरुन काही फार सोप्या सजेशन वाचण्यात आल्या, म्हणुन विचार केला की गेल्या ५ वर्षात नक्की काय झाले आहे ते बघावे. हा विदा आहे, ज्याचा त्याने बघुन त्यातुन अर्थ काढावा. ह्या तक्त्यातल्या सर्व कंपन्या प्रचंड मोठ्या वगैरे आहेत, आणि त्या जवळपास ५०-६० टक्के शेयर मार्केट रीप्रेसेंट करतात.

ज्या सुचना बघण्यात आल्या त्या थोडक्यात अश्या

पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 4:59 pm

संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-

समाजविचारआस्वादमाध्यमवेधमाहिती

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 10:19 am

रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.

गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.

धोरणसमाजराजकारणप्रकटनविचारलेखबातमीमाहितीसंदर्भ

वेबसाईट हॅकींग... SOS

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
6 May 2015 - 10:42 pm

कुणी अर्जंट मदत करू शकतं काय?

माझं होस्टींग आहे बिगरॉकवर. हरामखोर हॅकर्स नी हल्ला केलाय. एकूण १२-१५ वेबसाईट्स आहेत माझ्या त्यावर. एक एक गिळंकृत करत चाललेत. मी सगळे पासवर्ड्स बदलूनही काही उपयोग होत नाहीये. बिगरॉक सकाळपर्यंत सपोर्ट देणार नाहीये.

कुणाला काही माहिती आहे का?

पुण्यनगरी बद्दल माहिती हवी

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in काथ्याकूट
6 May 2015 - 11:23 am

पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन.
गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत.
आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे.
पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो.
त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे.
तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी.
अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल.

प्रताधिकार कायदा: अस्पष्टता, गल्लत, गफलती, विरोधाभास इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
4 May 2015 - 1:54 pm

कायदे मंडळांपुढे मंजुरीसाठी बहुतांश कायदे शासन यंत्रणा आणत असली तरी श्रेय कायदे मंडळांना जाते पण कायदेमंडळांच्या विशेषाधीकारांमुळे कायद्यात काही उणीवा शिल्लक राहील्यास उणीवांवर टिका करता येते, पण कायदेमंडळातील सदस्यांच्या कारभाराकडे बोट दाखवणे कठीण असते. भारत सरकारकडची कायदे तयार करणारी यंत्रणा, (सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकील मंडळी सरकार दरबारी आणि विरोधी पक्षात आणि संसदेत मोठ मोठे मानमरातब मिरवत असतात) त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या समीत्या संसद सभागृह, कायदे राबवणारी यंत्रणा या सर्वातून जाऊन बहुतेक सर्व शुद्धीकरण करूनच कायदे बाहेर येत असावेत.

मांडणीशब्दार्थसमीक्षामाहिती