युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर
हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे. युरोपियन युनियनचे आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी कक्षा पूर्व युरोपमध्ये पोहोचवणे एवढीच समस्या नाही; तसे केल्याने पुतिन यांच्या खिशातून काही जात नाही.