आनंदाचे डोहीं आनंद तरंग।
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत?
पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही. कधीकधी आपण वैयक्तिक समस्यांमुळे काळजीत असतो तर कधी आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे मक्ख-चिंताग्रस्त चेहरे, त्रासिक मुद्रा, परिचयातल्या कोणाच्या आजारपण,अपघात, मृत्यूची वा एखादी वाईट बातमी अशा गोष्टी, त्यांचा थेट आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नसूनही, नकळतपणे एक प्रकारच्या खिन्नतेचे जळमट आपल्या मनावर पसरवत असतात.