मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विशाळगडावरील पीर बाबा

शशिकांत ओक ·

जॉनविक्क 22/12/2019 - 20:30
पावसाळ्यात जबरा ठिकाण आहे, मस्ट गो। बाकी ही दन्तकथा असावी असे काही ना घडले होते ना घडत असावे पण असंख्य लोक सर्वधर्माचे इथे नेहमी जातात, मी गेलो तेंव्हा पवित्र महिना चालू होता आणी १०० मीटर पलीकडे काही गैर अल्पसंख्याक लोक दारूची पार्टी करत होते

शशिकांत ओक 22/12/2019 - 23:38
ही दन्तकथा असावी असे काही ना घडले होते ना घडत असावे पण असंख्य लोक सर्वधर्माचे इथे नेहमी जातात,
काही काळापूर्वी तिथे जाणार्‍यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. सुरवातीला व्हिडिओ चित्रीकरण म्हटल्यावर जरा काचकूच केली पण नंतर आम्ही मराठीत बोलताना पाहून काही स्त्रियांनी मराठीत संभाषण केले. त्या मिरज भागातील होत्या. त्यांच्याशी बोलताना पाहून इतरही बोलू लागले. साधारणपणे हे भाविक कर्नाटकातून बसेस भरून येतात. मन्नत पूरी झाल्यावर ऐपतीप्रमाणे बकरा, मुर्गी आम्ही कुर्बानी करतो. ते घरून आणलेले परवडते. इथे विक्रीसाठी फार महाग देतात. वगैरे बोलणे झाले. मला बेडीच्या बद्दल माहिती तेंव्हा नव्हती. पण तिथे विशिष्ठ दिवशी दरवाजा उघडला जातो वगैरे बोलताना चित्रफितीतून कळते. दर्ग्याच्या संपन्नतेची ओळख पाहून समजते. या पुढे जे भेटायला वर जातील त्यांनी काही माहिती सादर करायची विनंती करतो.

मनो 22/12/2019 - 23:54
दर्ग्याशेजारी एक मशीद आहे आणि त्या मशिदीत एक फारसी शिलालेख. त्यात मलिक रेहान म्हणतो. "भोज नावाच्या हिंदू राजाच्या अधीन असलेला हा किल्ला मला सहा वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही. शेवटी सातव्यांदा वेढा घातल्यावर किल्ला मजकडे आला" इ.स. १४५३ चा सुमारास अलाउद्दीन बहामनीचा सेनापती मलिक उत्तुजार विशाळगडावर प्रचंड सेनेनिशी चालून येत असताना इथल्या गहन अरण्यात शंकर मोरे नावाच्या मराठा सेनापतीने त्याचं सारं सैन्य कापून काढलं. १४६९ मध्ये महम्मद गवाननें नऊ महिने किल्ल्याला वेढा घातला तेंव्हा त्याला किल्ला घेता आला. असल्या पीरांना नवस करणं, त्यांना विशाळगडाचा राजा म्हणणं हे व्यक्तिशः मलातरी पटत नाही. बाकी ज्याची त्याची मर्जी आणि श्रद्धा.

हल्ली बऱ्याच किल्यांवर पीर पब्लिकचा प्रस्थ वाढत चाललंय. लोहगडवरदेखील असाच एक दर्गा आहे. संत अफझल खानाचा दर्गा आता फेमस झालाच आहे.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 23/12/2019 - 13:12
जी चूक महाराजांकडून झाली ती आताच्या काळात ओबामांनी केली नाही, अबोटाबाद मधे घुसून मारला समुद्रात बुडवून टाकला समाधी वगैरे झंझट नाही.

शशिकांत ओक 23/12/2019 - 14:31
एक फारसी शिलालेख. त्यात मलिक रेहान म्हणतो. "भोज नावाच्या हिंदू राजाच्या अधीन असलेला हा किल्ला मला सहा वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही. शेवटी सातव्यांदा वेढा घातल्यावर किल्ला मजकडे आला" किल्ला मजकडे आला"
मला यातील वेढा या शब्दाने विचार करायला लावले. या किल्ल्याची नैसर्गिक ठेवण अन्य किल्ल्यांपेक्षा वेगळी आहे. एका बाजूला खर्निंकोची दरी आहे. गजापुरच्या बाजूने येताना समोर गडावर चढायची वाट दिसत असताना तिथ जायला मात्र सध्याच्या पुलाऐवजी ७०-८० फूट खाली उतरून पुन्हा तितकेच वर आल्यावर मग उजवीकडील वळणदार वाटेने आले की मग मुंढा (मुख्य) दरवाजा लागतो. गडाच्या मागील बाजूला मुचकुंदी नदीच्या उगमाने तयार दरीचाभाग आहे. या मागच्या बाजूला बालेकिल्ला असावा. त्या बाजूला माचाळ गावाचा कोकण दरवाजा येतो त्याला पार करायला अवघड चिंचोळ्या वाटेने जावे लागते. मनो यांनी ऐतिहासिक संदर्भातील शीलालेखनाला सादर करून हे प्रस्थ महाराजांच्या आधीच्याकाळापासून ठाण मांडून होते. यावर प्रकाश पडला. धन्यवाद मनो जी. या पिराच्या दर्ग्यापाशी जाऊन तिथे मन्नत मागितली जाते हा भाग सध्या वगळता, शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून सुटून परतताना ही मशिद किवा मजार अस्तित्वात तेंव्हाही होती.

आनन्दा 23/12/2019 - 16:33
सहजच या मलिक रेहान चा इतिहास शोधावा म्हणून गुगगले, तर पहिल्यन्दा तुनळी वरची ४ गाणीच समोर दिसतायत. भलतेच मोठे प्रस्थ आहे हे म्हणायचे. https://www.youtube.com/results?search_query=%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8

मनो 23/12/2019 - 21:47
कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटीअरमध्ये ही माहिती आहे. https://books.google.com/books?id=krYBAAAAYAAJ&pg=PA323&lpg=PA323&dq=vishalgad+inscription इथे बहुतेक बादशाही माळ म्हणून जी उल्लेख आहे तो औरंगझेबाच्या संदर्भात असावा, विजापूरचा नव्हे, असे वाटते.

In reply to by मनो

अगदी बरोबर! औरन्गजेबाच्या स्वारीच्या वेळी आलमगीराचा मुक्काम या गजापुरच्या माळावर होता. जेव्हा मोघली सैन्याने विशाळगड ताब्यात घेतल्याची बातमी आली, तेव्हा औरंगजेब कुराण वाचत होता, तेव्हा तो जी ओळ वाचत होता, त्यात "हाजी सक्करलाना" हा शब्द होता, त्यावरुन विशाळगडाचे नाव "सक्करलाना" ठेवले गेले, अशी कथा सांगितली जाते.

शशिकांत ओक 24/12/2019 - 00:15
शेख भाई, व्हिडिओ ठीक था पर आप जब उपर पहुंचे तब खत्म हो गया. जानना चाहता हूं कि ऐसा क्या है कि इतने सारे लोग, मुस्लिम, हिंदू वहां जाते हैं? रेहान बाबा थे कौन? इतिहास में उनका नाम कैसे आता है? वे वहां कैसे पहुंचे? ये मजार कितने साल पहले से है? कहीं पढ़ा था कि वहां कुछ बेडीयां हाथ में डाली जाती है. मजार के चक्कर काटते हुए वे अपने आप निकल आती हैं? जिनकी बेड़ियां नहीं निकल आती उन्हें दोषी ठहराया जाता है? क्या यह रीत आज भी इस तरह से चलती आ रहा हैं? नहीं तो कोई नया तरीका अपनाया जा रहा है? पाहू ते काय उत्तर देतात ते.... इथे कोणी तिथे जाऊन आले असतील तर यांनी त्यांचा अनुभव कथन करावा. मी असल्या गोष्टी मानत नाही, वगैरे वैयक्तिक मत झाले. ज्यांनी अनुभवले त्यांचे म्हणणे समजून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक 25/12/2019 - 13:19
या वरून विशाळगडाला फक्त दोन चिंचोळ्या वाटांमधून प्रवेश शक्य होतो, यावर प्रकाश पडेल. शिवाजी महाराजांनी गजापूरच्या बाजूच्या दरीत आधीच प्रवेश करून ती पार केली आणि एकदम ते गडाच्या बाजूच्या भागात अनपेक्षितपणे उपस्थित झाले. त्यामुळे सुर्वे - दळवीच्या सैनिकांना बाण मारून थांबवण्याच्या पर्यायाशिवाय गत्यंतर नव्हते... या कथनाला भाग ७ मधील संदर्भातील ध्याग्यातील कथनाशी जोडून पहावे ही विनंती.

प्रतिसाद थोडा उशीरा देत आहे. या दर्गावाल्या मलिक रेहानचे मुळ शोधायला गेलात तर वेगळीच माहिती हाती येते. महाराष्ट्रावर बहामनी कालखंडानंतर मुख्यत: निजामशाही, आदिलशाही आणि मोघलांचा अंमल बसला असला तरी काही छोटी संस्थाने सह्याद्रीच्या आश्रयाने तग धरुन होती. शृंगारपुर त्यापैकी एक. ह्या उरल्यासुरल्या मराठी सत्ता बुडवाव्यात म्हणून मलिक उत्तेजार नावाचा सरदार सैन्य घेउन या भागात आला. सुरवातीला त्याने शॄंगारपुरच्या सुर्वेवर स्वारी केली. प्रतिकार करता येणार नाही म्हणल्यावर सुर्वेनी त्याला युक्तीने विशाळगडाच्या जंगलात आणले. त्यानी व विशाळगडाचे शंकरराव मोरे यानी विशाळगडाच्या गहन जंगलात गाठून मलिक उत्तेजारचा पुर्ण खातमा केला. या युध्दाविषयी फेरिस्ता या ईतिहासकाराने "गुलशने इब्राहिमी" या ग्रंथात सविस्तर लिहीले आहे. हा ग्रंथ डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. गुलशने इब्राहिमी या सैन्यात हा मलिक रेहान होता, ज्याचे थडगे विशाळगडावर बांधले गेले. काही जणांच्या मते हा मलिक रेहान खिद्रापुरजवळच्या जुगूळच्या माँसाबी आणि मिरजच्या मिरासाहेब यांचा मुलगा, तर काही जणांच्या मते कोण्या अवलियाचा हा दर्गा. हाजी मलंगवरचा बाबा मलंग दर्गा असु दे किंवा शनिवारवाड्याजवळचा शेख सल्ल्याची कबर या लोकानी केलेले एकमेव धर्मकार्य म्हणजे हिंदुना बाटवून मुसलमान करणे. मलिक रेहानच्या दर्ग्याच्या आडोश्याने काही वेगळे झाले नाही. अश्या या दर्ग्याला नवस बोलायला हिन्दु भाविक जातात हे आपले दुर्दैव कि अज्ञान ? या दर्ग्याचा जीर्णोध्दार १६३९ मधे राजापुरच्या कोंडुशेठ बल्लाळ यानी केला. हा झाला मलिक रेहान दर्ग्याचा ईतिहास. बाकी साखळदंड बांधणे वैगरे जे चालते, तो सगळा शुध्द अंधश्रध्देचा भाग झाला. वास्तविक विशाळगडावर त्यापेक्षा कितीतरी महत्वाची ठिकाणे आहेत. स्वराज्यासाठी ज्यानी प्राण ओवाळून टाकले त्या बाजी आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या , सरकारवाडा आणि राजाराम महाराज यांच्या द्वितीय पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई या राजाराम महाराजांच्या पागोट्यावर सती गेल्या, त्यांची समाधी. पण हे सगळे सोडून विशाळगड प्रसिध्द झाला तो मलिक रेहानच्या दर्ग्यामुळे. अर्थात आता चित्र बदलते आहे. झालेल्या जागॄतीमुळे असंख्य गडप्रेमी आणि शिवप्रेमी गडावरच्या शिवकालीन खुणा बघायला जात आहेत. गडावरच्या मुंडा दरवाज्याची डागडूजी झाली आहे, मुळ पायरी मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमीची वर्दळ आणि जागृती वाढली तर गडाला मुळ वैभव प्राप्त होइल अशी आशा करुया.

शशिकांत ओक 27/12/2019 - 21:19
शिवप्रेमीची वर्दळ आणि जागृती वाढली तर गडाला मुळ वैभव प्राप्त होइल अशी आशा करुया.
दुर्गविहारींच्या मताला माझी पूर्ण सहमती आहे.

शशिकांत ओक 27/12/2019 - 21:48
शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या मोहिमेची सांगता जुलै महिन्यात भर पावसात पावनखिडीतील कासारी नदीच्या खळाळत्या प्रवाहात उतरून हजारोंच्या संख्येने साजरी होते. हे चांगले झाले आहे. तसेच त्या पैकी काहींनी पुढे जाऊन विशाळगडावर जाऊन मोहिमेची सांगता करावी.असे सुचवावेसे वाटते. मिपाकरांपैकी जर कोणी मनावर घेऊन जायचे ठरवले तर मला कळवा. काही नाविन्यपूर्णपणे काम करायला शक्य आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार

हजरत पीर मलिक रहान बाबा

लढा पावनखिंडीचा यातील भाग ७ मिपावर सादर करायला मुक्त विहारींनी सुचवल्यावर तो लवकरच सादर करत आहे. त्यात विशाळगड सध्या कसा दिसतो याची अंदाज यायला सोबतची फीत सादर आहे. गड चढताना आता जरी पूल बांधल्यामुळे येता यायला सोईचे झाले तरी समोरच्या बसेस पार्किंगच्या माथ्यावरून दरीत उतरून विशाळगडाच्या चढाला सुरवात होते. ऐतिहासिक काळात सुर्वे- दळवी यांच्या सैन्याचा तळ त्या पार्किंग भागात होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याला भिडायला दरीत उतरून यावे लागले. भाग ७ मधे महाराजांनी ते कसे घडवले ते वाचा. फितीत शेवटी एक नव्याने बांधलेला बुरुज दिसतो.

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

पहाटवारा ·
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

चौकटींतील रत्ने

हेमंतकुमार ·

सुडोकू पण उत्तम आहे. सध्या तरी सुडोकूच सोडवत बसतो. www.websudoku.com ही उत्तम साईट आहे. ... केवळ शब्दकोडी सोडवायला म्हणून, दर शनिवारी "महानगर" घेत होतो.

मी पण एसटीत वा आगगाडीत बसतांना कोड्यांसाठी वर्तमानपत्रे घेतो. बातम्या पाचदहा मिनिटात वाचून होतात. पण एक कोडे तासभर पुरते. एक मात्र नक्की. शब्दकोडी नित्यनेमाने सोडवल्यामुळे मेंदूचे 'शब्द सर्च इंजिन' मस्त कार्यक्षम राहते अणि इतर सर्व कामात त्याचा उपयोग होतो. बहुतेक मराठी वृत्तपत्रातील कोड्यांमधले शब्द बहुधा एकाच डाटाबेसमधून घेतलेले असतात आणि तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात. कधीकधी लबाडी पण असते. तरी रटाळ बातम्यांपेक्षा कोडे नक्कीच मनोरंजक असते. एक शब्दकोडेकार महाशय तर दर कोड्याच्या बाजूला स्वत:चा फोटो पण छापून आणतात. पुढील भागाची वाट पाहतो आहे.
गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे.
चविष्ट मुरांबा कसा आहे याची उत्सुकता आहे.

हेमंतकुमार 16/12/2019 - 18:20
वरील सर्वांना धन्यवाद. मु वि, उपयुक्त माहिती. पण मी अंककोड्याच्या अजिबात नादी लागलेलो नाही. एकदोनदा प्रयत्न केलाय पण मला आपले शब्दांचेच राज्य बरे वाटते. सुधीर, अनुभवाशी सहमत. मेंदूचे इंजिन मस्त पळते खरे. चौरा, तुमच्या क्र. १ चे उत्तर ‘महानगर’.

हेमंतकुमार 17/12/2019 - 08:39
अल्झायमर व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का? व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का?
>>> मु वि, तुमचा प्रश्न चांगला आहे. पण त्याचे उत्तर जरा चाचपडतच ‘हो’ असे द्यावे लागेल. यावर अजून बऱ्याच संशोधनाची गरज आहे. तूर्त असे म्हणता येईल: १. काही तज्ञांचे मते विविध कोडी नियमित सोडविण्याने या आजाराचा धोका कमी होऊ शकतो. २. अशी कोडी ही व्यक्तीनुसार ‘झेपेल’ इतक्याच कठीणतेची असावीत. ३. फक्त एकट्याने कोड्यात डोके घालून बसण्यापेक्षा दोघातिघांत मिळून काही बौद्धिक खेळ खेळल्यास अधिक फायदा होतो. ४. यासंबंधी अजून बरेच प्रयोग आणि त्यांचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 17/12/2019 - 09:46
माझ्या आईला शब्द कोडी सोडवायचा नाद अगदी ७५ वयापर्यन्त होता तरीही तिला त्या नन्तर अल्झायमर हा आजार झाला . तो अलझायमर फारसा गम्भीर नव्हता हे खरे पण अल्झायमरच होता . ती ८५ वर्शे पूर्ण करून गेली.

कंजूस 18/12/2019 - 05:30
पावसाळ्यात मुंबई होते तुंबई. महानगर वाराणसीला म्हणण्याची चाल आहे. मुंबई नगरी बडी बांका। मग दिल्ली? असो. इंग्रजी कोड्याचं उत्तर समोर ठेवून प्रश्न पाहिला तरी याचं उत्तर हे का हे कळत नाही इतकं (क्रिप्टीक )गूढ असतं. चौकटराजांची आइडिआ सुरू करायला हवी. प्रथम सर्वांनी आपापले प्रश्न आणि उत्तर कुणा एकाकडे संदेशाने पाठवायचे, त्याने प्रश्न एका धाग्यात मिपाकोडे १/२/३प्रसिद्ध करून आठवड्याने उत्तर प्रसिद्ध करायची.

अनिंद्य 18/12/2019 - 10:56
@ कुमार१, 'चौकटीतील रत्ने' समर्पक शीर्षक आहे लेखाला. असे छंद भाषा समृद्ध करतात. शब्दसंग्रह तोकडा असल्यामुळे एकट्याला शब्दकोडे क्वचितच सोडवता येते, पण 'एन्जॉय द प्रोसेस' म्हणतात तसे आहे. घरी येणाऱ्या तीनही वृत्तपत्रांमधली मराठी आणि इंग्रजी शब्दकोडी पिताश्री काही मिनिटातच सोडवतात, हेवा वाटतो. इंग्रजी शब्दकोडी लीलया सोडवणाऱ्या माझ्या धाकट्या काकांचेही असेच कौतुक वाटत राहते, स्वतःला कधी जमत नाही :-) पुभाप्र

श्वेता२४ 18/12/2019 - 13:25
माझ्या बहिणीमुळे मलाही मराठी शब्दकोडे सोडवायची सवय लागली. त्याचा फायदा म्हणजे शब्दसंग्रह वाढून भाषेवर एकप्रकारची हुकुमत आली. त्याचा फायदा पुढे वक्तृत्व स्पर्धांमध्ये झाला. आम्ही बहिणी नेटाने पूर्ण शब्द कोडे सोडवितच असू. माझी सवय पुढे अभ्याासत सुटली पण बहिण अजुनही सोडवते. मध्यंतरी एका ऑफीसमधल्या सरांना कोणी कायप्पावर शब्दकोडे टाकले होते. पण एक दोन अक्षरी शब्द अडला होता- पान थुंकायचे तबक/भांडे असा. मला शब्द माहित असूनही नेमका आठवेना पण खात्री होती बहिणीला माहित असेल. तीला लगेच कायप्पावर संदेश पाठविला व अपेक्षेप्रमाणे तीने तात्काळ प्रतिसादर पाठविला- तस्त. खूप वाईट वाटले मला त्यावेळी या आनंदापासून मी आता दू गेले आहे. तुमच्या लेखामुळे माझे मस्त स्मरणरंजन झाले. धन्यवाद. पु.भा.प्र.

हेमंतकुमार 18/12/2019 - 13:59
श्वेता, धन्यवाद
पान थुंकायचे तबक/भांडे = तस्त.
>>> अगदी ! हा शब्द खूप वेळा येतो कोड्यात. हे तस्त मी फक्त चित्रपटातच पाहिले आहे.

In reply to by हेमंतकुमार

शेखरमोघे 08/05/2020 - 20:08
मी बर्‍याच काळापूर्वी "तस्त" बर्‍याच वेळा पाहिलेले आहे. एखाद्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे किन्वा काही गायक, वादक, वक्ते पान खाणारे आहेत हे जर माहित असेल तर त्यान्च्या करता लावलेल्या "बैठकी" करता चकचकीत पितळेचा पानाचा "सज्ज" डबा, अडकित्ता आणि तस्त या जरूरीच्या गोष्टी असत.

गामा पैलवान 18/12/2019 - 18:54
कुमारेक, एका वयात मलाही मराठी शब्दकोडी सोडवायचा छंद लागला होता. तो आता सुडोकूत रुपांतरीत झाला आहे. :-) एक गंमत करता येते ती म्हणजे लेखणी न वापरता कोडे सोडवणे. कोड्यातल्या चौकटी रिकाम्याच ठेवायच्या. फक्त मनातल्या मनात अक्षरांची नोंद करायची. तुम्हाला कदाचित पुढचा टप्पा म्हणून प्रयत्न करून पाहता येतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुडोकू सोडवायचा प्रयत्न केला. .. पण माझ्या मेंदूला ते प्रकरण झेपले नाही... आमची मजल जास्तीत जास्त, medium level पर्यंतच. . www.websudoku.com

In reply to by गामा पैलवान

नगरी 18/01/2022 - 16:29
मान्य, पूर्णपणे मान्य कारण आमच्या कडे टोटल 4 डोकी कोड्याच्या मागे पडलेली असतात आणि प्रत्येकात चढाओढ असते

हेमंतकुमार 18/12/2019 - 19:27
गा पै व मु वि +१. ............ मितवा : हिंदीतला आणि मराठीतला ! आज ‘मितवा’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि या शब्दाची मजा त्यात ऐकून मग जालावर वाचली. मितवा चा हिंदी भाषेतला अर्थ आहे : अगदी जवळचा, आपला माणूस. मराठीत या शब्दाचा एक वेगळाच अर्थ शोधण्यात आलाय: मित्र, त्त्वज्ञ व वाटाड्या या ३ शब्दांतील पहिले अक्षर घेऊन मितवा हा संयोग शब्द तयार केलाय ! म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो ना फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड. त्याचेच हे रुपांतर .

जॉनविक्क 19/12/2019 - 00:53
आपण सर्वात पहिली गोष्ट कोणती शिकत असू तर ते म्हणजे शब्द म्हणूनच मेंदूमधे याचे मॅपिंग भरपूर झालेले असते व जेंव्हा आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा, प्रयत्न करतो आजपासून :) धन्यवाद.

शब्द कोडे सोडवायला मजा येते पण एखाद्या शब्दावर अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. काही दिवसांपूर्वी अडलेले एक कोडे :- राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) सगळे कोडे सोडवून झाले तरी हा एक शब्द काही केल्या सापडत नव्हता. जेव्हा उत्तर समजले तेव्हा अगदी "ह्या" वाटले. अजून एक :- कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) या वरही बराच काळ असाच अडलो होतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

श्वेता२४ 19/12/2019 - 10:52
राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) - डबिर, दफ्तरी कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) - कैकाडिण्,कैदाशिण्,महामाया

In reply to by श्वेता२४

हेमंतकुमार 19/12/2019 - 12:05
काही महिने माझ्या कोड्यांत ३ शोधसूत्रांनी अगदी धुमाकूळ घातला होता. या तिघांचे उत्तर एकच आहे. सूत्रे अशी: १. लसणाची पाकळी २. लिंबाची फोड ३. दह्याची कवडी. यांचे उत्तर असलेला शब्द मी कधीच ऐकला नव्हता. कोड्यांमुळेच कळला. बघताय प्रयत्न करून ?

In reply to by श्वेता२४

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:00
श्वेता, ‘बोई’ चे तीनही अर्थ शब्दरत्नाकरमध्ये आहेत. व्युत्पत्ती माहित नाही. सहज आठवले. इंग्लीशच्या ‘set’ चे तब्बल १५६ अर्थ आहेत ! त्यापुढे आपली ‘बोई’ बरीच म्हणायची !!

राघव 19/12/2019 - 09:23
हायला.. लोक्स एवढं सिरियसली घेत असतात कोड्यांना? :D मी कधी एवढा विचार करून वगैरे कोडं सोडवलं नाही तसं.. जमेल तसं आणि तेवढं सोडवत जायचं, असंच माझं "जिओ और जीने दो" वालं धोरण! सुडोकू आवडतं, पण काही कठीण म्हणजे फारच कठीण असतात. त्यामुळं फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. पण त्यातून एक कळलं, एखाद्या ठिकाणी कोणता अंक येणार यासोबतच कोणता येणार नाही हेही ओळखता आलं पाहिजे. This goes close to the "Theory of Deduction" by the great Sherlock Holmes!! तरीही अजून फार पुढची सुडोकू नाही सोडवता येत. अर्थात् तेवढा वेळही दिला पाहिजे म्हणा.. :-)

In reply to by राघव

ह्या बद्दल एक सुंदर लेख वाचनात आला होता... त्या लेखात पहिल्या शब्दकोड्या पासून बर्याच गोष्टींचा आढावा घेतला होता. https://googleweblight.com/i?u=https://www.crosswordtournament.com/more/wynne.html&hl=en-IN

In reply to by हेमंतकुमार

शोधता शोधता अजून एक माहिती मिळाली. अमेरिकेत शब्दकोडी सोडवायची स्पर्धा असते. खाली लिंक देत आहे. खूपच मनोरंजक माहिती मिळेल. https://googleweblight.com/i?u=https://en.m.wikipedia.org/wiki/American_Crossword_Puzzle_Tournament&hl=en-IN

हेमंतकुमार 19/12/2019 - 10:30
* आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा * अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. * फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. या सगळ्याशी अगदी सहमत.

गणेशा 19/12/2019 - 23:25
काय सुंदर पणे लिहिले आहे.. खूप आवडले. शाळेत असताना, किंवा कॉलेज मध्ये असताना घरी गेल्यावर हे सोडवत असे. आई वडीलां बरोबर बसून. हे सर्व आठवले आणि हळू हळू तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीत अक्षरश: तुम्हीच दिसू लागला, रेल्वे मध्ये बसलेला, एकटा असलेला.. समरसुन जायला झाले..

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:01
गणेशा, मनापासून आभार ! तुम्ही जी दाद दिली आहे त्यातून पुढील लेखन अजून समरसून करायला प्रेरणा मिळाली आहे.

हेमंतकुमार 01/01/2020 - 14:04
कोडे शौकिनांना आवाहन: तुमच्या कोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा. मी असे २ लिहितो गळू, बेंड = करट संशयी = दिकतखोर

हेमंतकुमार 08/01/2020 - 08:33
कडधान्या संबंधी दोन वेगळे शब्द मध्ये सापडले. शोधसूत्रे: १. अजिबात न भिजणारे ( मोड आणताना) २. अर्धवट शिजलेले दोन्ही शब्द ३ अक्षरी. ओळ्खताय ?

हेमंतकुमार 11/01/2020 - 05:14
या धाग्याच्या निमित्ताने आपल्यातील शब्दप्रेमींची भेट झाली याचा आनंद वाटतो. सर्वांचे अनुभव रोचक आहेत. तसेच काहीजण अंक कोडेप्रेमी आहेत हेही दिसले. एक विनंती: तुमच्या शब्दकोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा. त्याचा सर्व इच्छुकांना उपयोग होईल. धन्यवाद !

हेमंतकुमार 11/03/2020 - 07:51
नुकताच होळीचे दरम्यान शब्दकोड्यात एक मजेदार शब्द आला: होळीचे होळकर = (लाक्षणिक अर्थाने) उडाणटप्पू लोक

लई भारी 13/03/2020 - 16:21
हा धागा राहिलाच होता. चांगला छंद आहे! मराठी कधीमधी करायचो, पण इथे दिलेले काही शब्द वाचून कळलं कि बहुधा मी 'महाशब्दकोडे' च सोडवले असेल :-D इंग्रजी तर कधीच जमलं नाही.

हेमंतकुमार 13/03/2020 - 19:22
धन्यवाद.
बहुधा मी 'महाशब्दकोडे' च सोडवले असेल
>>> काही हरकत नाही. सोडवले हे महत्वाचे !

हेमंतकुमार 17/03/2020 - 13:31
आजच्या एका शब्दकोड्यात ‘खवलेमांजर’ शब्द आला आहे. सध्याच्या करोना वातावरणाशी हे सुसंगत आहे ! कसे ते सांगतो. खवले मांजर (पँगोलिन) चीनमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या मांसातून करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता पडताळली जात आहे. ( संदर्भ : नेचर’ नियतकालिक)

हेमंतकुमार 08/05/2020 - 11:38
अजून छापील वृत्तपत्र घरी येत नसल्याने मराठी कोडी सोडविण्याची उपासमार होत आहे ! इंग्लिश शब्द कोडे जालावर सहज मिळते, ते सोडविणे चालू आहे. पण छापील मराठी शब्दकोड्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ....

हेमंतकुमार 11/06/2020 - 07:53
'क्षितिज' चा नेहमीचा अर्थ आपण जाणतोच. परवा कोड्यात याचे अन्य दोन अर्थ समजले आणि स्तिमित झालो. 'क्षितिज = झाड, गांडूळ . ( 'क्षिति = जमीन . म्हणून त्यातून जन्मलेले ते, अशा अर्थाने).

हेमंतकुमार 11/06/2020 - 09:07
ती माहिती अशोक श्री. रानडे यांच्या 'शब्दयात्रा' या दै. सकाळ मधील सदरातून घेतली आहे.

हेमंतकुमार 15/09/2022 - 09:01
‘लट’ चे विभिन्न अर्थ स्तिमित करतात. १. गुह्येंद्रियावरील केंस २. साठ कागदांचा संच ३. लाट ४. गुंतागुंत ( केसांची , लोकरीच्या , सुतांची , तंतूंची ) https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B2%E0%A4%9F/word …. कागद मोजण्याची दस्ता, रीम आणि quire ही परिमाणे माहिती होती. लट हे नवे समजले. दोन लटांची एक जोडी , चार जोड्यांची एक गड्डी होते .

nutanm 16/09/2022 - 02:57
ही म्हण माहित ी कोणाकोणाला आहे व तिचा अर्थ ?? आला गेला गोसावी दाढेला दिला. माझी आई ही म्हण नेहमी वापरत असे. कोणाची दाढ व कोणाला दिले या काही hints . hints समानार्थी शब्द ? आठवत नाही.

In reply to by nutanm

हेमंतकुमार 16/09/2022 - 07:52
हा अर्थ : ज्या मनुष्याचा आगा पिच्छा नाही त्याला कोणाच्याही तोंडी द्यावयास हरकत नाही कारण त्याला कोणी वाली नसतो. पण हा अन्याय आहे.

लेखाचा पूर्वार्ध: रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो.

मिसळपाव

अविनाशकुलकर्णी ·

जॉनविक्क 09/12/2019 - 15:52
फेसबुक/ मिपा हे स्वानंद मिळवण्याचे साधन आहे. मनस्थिती बिघडवण्याचे नाही.
वाचकांच्या मनस्थितीचा विचार करायचा नाही ठरवले तर तुमचे म्हणणे 200 टक्के सत्य

In reply to by जॉनविक्क

mrcoolguynice 12/12/2019 - 10:25
वाचकांच्या मनस्थितीचा विचार करायचा नाही ठरवले त
अहो त्यांनी , रूपक रुपी डिस्क्लेमर दिलाय ना ... :)
जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच. तस असते यांचे

पाषाणभेद 12/12/2019 - 09:34
बॉल कुणीच कसा टोलवला नाही? बाकी अकुजी आपण म्हणता ते सत्य आहे. भावनिक गुंतागूंत करून उपयोग नाही. तुम्ही लिहून जो धागा बनवलेला आहे तेवढी आमची सही होती.

फेसबुका वर पट्टीचे पोस्ट पोस्टणारे हलवाया सारखे असतात जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच. तस असते यांचे फेसबुक /मिसळपाव हा एखाद्या नदीच्या पाण्या सारखा प्रवाह आहे--आपल्या पोस्ट त्या पाण्या सोडल्या जाणा-या कागदी होड्या असतात.

Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

शा वि कु ·

वगिश 31/12/2019 - 11:07
आपन विद्यार्थी असताना वाचनाची आवड म्हणुन वाचली असली तरी हे वाङ्मय चौर्य आहे हे लक्षात ठेवा. आपन जेव्हा कधी कमावते होणार तेव्हा न विसरता सर्व पुस्तके विकत घेऊन वाचनाची गरजू विद्यार्थांना दान करा अथवा संग्रही ठेवा.

In reply to by वगिश

गामा पैलवान 07/01/2020 - 19:12
वगिश, माझ्या मते वाङ्मयचौर्य म्हणजे दुसऱ्याने लिहिलेलं स्वत:च्या नावे खपवणं. पुस्तक पळवणं म्हणजे वाङ्मयचौर्य नव्हे. आ.न., -गा.पै.

नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता ! मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली.

प्रीति करो मत कोय॥

शरद ·

जॉनविक्क 20/11/2019 - 11:47
ह्या जीवन्मुक्त लोकांनी सगुण साकाररुपातल्या ईश्वराचे गुणगान करून अजाणतेपणी अतिसमान्यांचे जेवढे अध्यात्मिक नुकसान केले आहे त्याची खरोखर भरपाई होणे शक्य नाही. सगुण साकारतेला शरण अध्यात्माशी असंग असणाऱ्यापुरता मर्यादित असणे धर्माच्या दीर्घकालीन मुख्य प्रयोजनासाठी आवश्यक मानतो. असो, इथे किमान स्त्री पुरुष भेदाची तरी व्यवस्थित पोलखोल झाली आहे हे वाचून आंनद वाटला.

आज आपण मीरेच्या भावविश्वातले एक मनोहर रूप पाहूं. "विरहिणी". सर्व संतांनी, त्यांत पुरुष संतही आले, विराणी लिहल्या. जेथे ज्ञानदेवासारखा एक बालयोगीही विराण्या लिहतो तेथे तुम्हाला मीरेने विराण्या लिहल्या, हो, अनेक लिहल्या, याचे नाविन्य वाटणार नाही. पण मीरेकडे वळण्याआधी जरा विषयांतर करण्यास परवांगी द्या. संतांनी विराण्या कां लिहल्या ? संतांची परमेश्वरावर श्रद्धा आहे. परमेश्वराची व आपली भेट व्हावी; अगदी सायुज्यता नाही तरी किमान समिपता लाभावी ही आंस. पण मुक्तीचतुष्टय हे तत्वज्ञानात ठीक. आपल्या नेहमीच्या व्यवहारात वा भाषेत हे कसे सांगावे ?

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

समीरसूर ·

मनिष 31/10/2019 - 15:16
गाण्याविषयी काय बोलावे? मदन-मोहन आणि उमेदीतली लता म्हणजे विषयच संपला - एकाहून एक रत्ने दिलीत ह्यांनी. जाता-जाता - मता-ए-कूचा-ओ-बाज़ार हणजे गल्लीच्या बाजारत ठेवलेली चीजवस्तू (मता/माता - वस्तू/commodity, कूचा=गल्ली). तुम्ही लावलेला अर्थ बरोबरच आहे. :-)

चौकटराजा 31/10/2019 - 17:40
एकमेकान्च्या अगदी जवळ रहाणारे मदन मोहन जी लतादीदी बरोबर एका भावाचे नाते जपून होते पण गीतात त्यानी निराश व आनन्दी अशी दोन्ही लता पेश केली ! हिदी फिल्म संगीतातील सर्वोत्तम भागीदारी म्हणजे मदन्मोहन लता ! त्या जोडीचे भट्ट्टी न जमलेले गीत शोधून सापड्ने देखील मुश्कील !

In reply to by चौकटराजा

समीरसूर 01/11/2019 - 13:46
"रस्म-ए-उल्फत को निभायें तो निभायें कैसे…." हे पण एक अप्रतिम गाणे...काय सूर आहे...काय जादू आहे...चित्रपट 'दिल की राहें'...

नूतन 31/10/2019 - 17:43
आणि आवडतंही. या चित्रपटातील सगळीच गाणी सुंदर आहेत . पण रफीच्या स्वरातील .. तुमसे कहू एक बात परोंसे हलकी हलकी....लाजवाब ....तरल..

चित्रगुप्त 01/11/2019 - 14:55
गाण्याचा आणि सिनेमाचा सुंदर परिचय करून दिल्याबद्दल अनेक आभार. लेखात उल्लेखिलेली दोन्ही गाणी अनेकदा ऐकलेली आहेत, परंतु मी एकंदरितच फारच कमी सिनेमे बघितलेले असल्याने अनेक आवडती गाणी असलेले सिनेमे कोणते, हे देखील ठाऊक नाही. तूनळीपूर्व काळात एकदा पिच्चर थेट्रातून गेला की गेलाच, तो पुन्हा बघणे अशक्यच असायचे. गाणी सुद्धा रेडियोवर जेंव्हा वाजतील, तेंव्हाच ऐकायला मिळत. रस्त्यावरून जात असता अचानक एकादे आवडते गाणे पानपट्टीच्या दुकानातल्या रेडियोवर वाजताना ऐकून भर पावसात देखील ते ऐकत उभे राहून गाणे संपल्यावर पुढे जाण्याचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत. अश्या दुर्मिळत्वामुळे ती गाणी आणखीनच मौल्यवान वाटायची.

सुबोध खरे 01/11/2019 - 18:56
सुंदर लेखन गाणं बऱ्याच वेळेस ऐकलं आहे आणि त्याचा थोडा फार अर्थही माहिती होता परंतु आज त्याचा संदर्भ लागला धन्यवाद

सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.

InShort 5 – Printed Rainbow (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय अ‍ॅनिमेशन मुळातच फार प्रचलित नाही, त्यातही अ‍ॅनिमेशन बनवलेच तर ते मुलांसाठीच असते असा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. त्यात प्रौढांसाठी अ‍ॅनिमेशन बनवणे, तेही २००६ च्या सुमारास किती अवघड असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

जोकर

श्रीरंग ·

उपेक्षित 15/10/2019 - 12:10
कालच रात्री पहिला आणि अंगावर आला, अजून नॉक नॉक आर्थर च्या वातावरणातून बाहेर आलेलो नाहीये. फ्लेचर ने स्वतः च्या शरीरयष्टी वर घेतलेली मेहनत (याला पाठमोरे पाहताना किळस वाटावी असे) याला तोड नाही. हिथच्या जोकर ला philosophy ची छटा होती तर इथे फ्लेचर च्या जोकर ला विक्षिप्तपणा + भावानिकतेची छटा आहे. फ्लेचर च्या अभिनयाबाबत तर क्या केहने ? निव्वळ निशब्द व्हायला होत २ तास भान हरपून पहिल्यांदाच एखादा इंग्लिश मूवी मी पहिला असेल. सर्वांनी एकदा तरी जरूर पाहावा असा हा जोकर आहे.

जोकर या पात्राची मुळात लोकांवर एक मोहिनी आहे. बर्‍याच लोकांना हा जोकर त्यांच्या सुप्त मनाचे प्रतिबिंब वाटतो. हा नवा जोकर अजून पाहिला नाही, पण नोलानचा जोकर एकदम अशक्य भारी होता!

जॉनविक्क 16/10/2019 - 12:28
आणि हेच त्याचे बहुतेक यशही आहे. जोकर पात्र ज्यांना माहीत आहे त्यांना हा चित्रपट खिळवून ठेवेल हे निःसंशय. ज्यातून अभिनय, दिगदर्शन, पार्श्वसंगीत, कथानक मांडणी या गोष्टी वेगवेगळ्या करूही शकणार नाही तेंव्हा फक्त हेच मनात येते "अफलातून चित्रपट".

जोकर.. DC चित्रपट विश्वातील सुपरहिरो इतकंच प्रचंड लोकप्रिय पात्र. किंबहुना, आजवरच्या सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक. अत्यंत विक्षिप्त, विदूषकाच्या मुखवट्याआडून थंडपणे गुन्हे करणारा, अंगावर काटा आणणारा खलनायक हिथ लेजर यांनी डार्क नाईट चित्रपटातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कल्पनेपलिकडे लोकप्रिय करून ठेवला आहे. टॉड फिलिप्सने दिग्दर्शित केलेला "जोकर" हा चित्रपट याच जोकरचे पूर्व कथानक, म्हणजेच आर्थर फ्लेचर याची विकृत क्रूरकर्मा जोकर बनण्यापुर्वीची कथा आहे. आर्थर फ्लेचर हा एक साधा सरळ मध्यवयीन इसम. गॉथम शहरात, आपल्या आईबरोबर अगदी बेताच्या परिस्थितीत दिवस काढणारा.

झोल? चच्चडी?

नूतन ·

जेम्स वांड 06/10/2019 - 14:42
मिपावर एकदम महाराष्ट्र बंगाल सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम एखाद्या उपक्रमाच्या धडाडीने सुरू झालेला दिसतोय. त्या निमित्ताने वंग प्रांताशी ओळख होते आहे एरवी राजकारण सोडून काहीच ऐकायला मिळत नाही अन काठी रोल सोडून मला बंगाली जेवणातले काहीच कळत नाही. पलीकडे अनिंद्य बोवा कोलकात्याच्या पट उलगडत बसलेत इकडे नूतन ताई पंचफोडण घालून खमंग काहीतरी बनवत आहेत, मज्जानी वाचन मेजवानी. रच्याकने, बंगालमध्ये व्हेज जेवण थोडेसे नकोसे मानतात का ? आमची एक बंगाली टीम मेंबर (स्वतः मुखोपाध्याय) आहे ती म्हणते व्हेज म्हणजे बिधोबा भोज असतं, बंगाल मध्ये म्हणे वैधव्य प्राप्त स्त्रियांनी फक्त शाकाहारी सात्विक भोजनच करायचे वगैरे कडक नियम असत (इति बंगालीण उवाच) चुभूदेघे. शाकाहार संबंधी तिथल्या सांस्कृतिक समजुती वगैरेंवर पण एक भाग येऊ देत प्लीज.

नूतन 06/10/2019 - 15:14
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. मी शाकाहारी असल्याने तुलनेसाठी फक्त शाकाहाराविषयी (रोजच्या जेवणातील) लिहीलं आहे.

नूतन 06/10/2019 - 18:07
काय गडबड झाली कळत नाही. आधी दिसत होते वाटतं.बघते.

अनिंद्य 07/10/2019 - 10:25
खूब भालो. लेख आणि कृतीसह फोटो ! फोटो आता दिसत आहेत आणि द्रोणात असलेल्या घुगनीचा फोटो विशेष.

मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.