मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

पाषाणभेद ·

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

तरल भावनेचं चित्र : मासुम

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'लकडी की काठी काठी काठी का घोडा' हे गाणं न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. लहानपणी रविवारी रंगोली मध्ये कित्येक वेळा हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा त्यातलं त्यात उर्मिला मातोंडकर आणि 'घर से निकलते हि वाला' जुगल हंसराज होता इतकंच काय ते त्या गाण्याचं कौतुक होतं आणि विषय तिथेच संपत होता. कट टू : करंट जिंदगी गेले कित्येक दिवस 'मासुम' पहायचं डोक्यात होतं, पण कधी वेळ जमत नव्हती तर कधी अर्धवट पाहिल्या जात होता. सरतेशेवटी काल योग जुळून आला. १९८३ मध्ये आलेला मासुम 'शेखर कपूर' चा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट.

बोन्साय

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
.. ती मॉडर्न सावित्री होती वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती - तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली - दारावर टकटक झालं तीन दार उघडलं - दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता - अरे तू कोण ? - सावित्री मी सत्यवान तुझा पती - अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ? - तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं - तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली

जर्नी इस द रिवॉर्ड

महासंग्राम ·
लेखनप्रकार
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

पारा असा चढला

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ

पुणे मिसळ हॉटेल

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ//पुणे मिसळ हॉटेल..बाहेर पावसाची बुरबुर.. त्याने मस्त मिसळ चापली..चहा घेतला..बिलाचा कागद व बाजुला ठेवलेली छत्री घेवुन तो उठला व समोरच्या इसमाने त्याला हटकले.. माफ करा आपण माधवराव जोशी का? नाहि..मी हेमंत देशपांडे.. ओह्ह..मी माधवराव जोशी जी छत्री आपण घेतली ति माझी असुन त्यावर नाव पण लिहिले आहे.. त्यावर खजील होऊन देशपांडेे म्हणाले..ओह्ह माफ करा..तरी प्रष्ण उरतो माझी छ्रत्री कुठे गेली असावी?... तुम्हि असे करा मनोहर लेले ना विचारा बहुतेक त्यांच्या कडे असावी..मागच्या पावसाळ्यात त्याला दिली होति.... पण आपणास हे सारे कसे माहित???

सुपरनॅचरल - इंग्रजी मालिका

nishapari ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं .. " 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात " अशी अगदी थोडक्यात माहिती वाचून मालिका पाहण्याची मुळीच इच्छा झाली नव्हती . वर्षभरापूर्वी जेव्हा पाहायचं ठरवलं तेव्हाही साशंकताच होती .. पण 10 - 15 एपिसोड पाहिल्यानंतर या मालिकेच्या प्रेमात पडले .

चार शब्द - पुलं - एक वाचनीय पुस्तक

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्‍या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच.

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

प्राची अश्विनी ·
लेखनप्रकार
मंडळी, नमस्कार! श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण! "मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत.... श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! तो सावळा, श्रीरंग..! त्या श्यामरंगात रंगलेल्या.. काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल? काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला? प्रत्येकीचा कृष्ण निराळा.. प्रत्येकीचा प्रश्न निराळा.. त्या प्रश्नांचा रंग... श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार! अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित "श्यामरंग...

प्रेमम !

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर प्रेम केलेलं असते. भले यशस्वी होवो अथवा न होवो त्यासाठी आपल्या हृदयात एक कायम हळवा कोपरा राखीव असतो. तुमचं प्रेम यशस्वी असलं तर क्या बात असते, नाहीतर ती कायम कुरवाळत ठेवावी अशी हवीहवीशी जखम असते. प्रेमाला जसं जातपात, भाषा, धर्म यांचं बंधन नसते तसंच चित्रपटाचं सुद्धा असतं. एखादा चित्रपट समजण्यासाठी शब्द महत्वाचे नसतात तर महत्वाच्या असतात त्यात व्यक्त केलेल्या भावना, त्या जर तुम्हांला आपल्याशा वाटल्या तो चित्रपट सुद्धा आपला वाटतो.