पर्स..
माझी पर्स म्हणजे एक वस्तुसंग्रहालय आहे. माझ्याकडे इतक्या पर्सेस आहेत, पण अजूनही मला माझ्या गरजा पूर्ण करणारी, योग्य आकाराची, आदर्श पर्स मिळालेली नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आहेत. त्यांत मी बॅग बनवणाऱ्याकडून, लघुउद्योजक बायकांकडून, माझ्या अपेक्षा सांगून बनवून घेतलेल्या बॅग्जही आहेत. मला गरजेनुसार पर्सेस लागतात. सकाळी फिरायला जाताना लहानशी पाण्याची बाटली, मोबाईल, एक रुमाल आणि घराची किल्ली एवढंच सामावणारी लहान पर्स मला हवी असते. तर प्रवासाला जाताना मला मोठी पर्स हवी असते.