जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.