आमच्या वेळेस असं होतं??
पूर्वीच्या पालकांचं बरं होतं. मुलं जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तरीही पालक दरडावून चूप बसवत. कारण बरेचदा पालकांनाही उत्तरं माहिती नसायची, इंटरनेट नव्हते त्यावेळेस, लायब्ररीत जाऊन पुस्तकांत बरेचदा उत्तरं शोधावी लागायची. अर्थात जीवनातील ज्या प्रश्नांची उत्तर गुगल देऊ शकत नाही मी त्याबद्दल बोलत नाही आहे! त्यावेळची बहुतेक लहान मुलं सुद्धा एखाद दुसऱ्या दरडावण्याने चूप बसत, त्यांचे मनातले कुतूहल या पालकांच्या धाकापायी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाबरून पायात मान खाली घालून जाऊन बसायचं आणि आणखी कधी मान वर करून प्रश्न विचारायची संधी मिळते का ते शोधत बसायचं.