विचार
ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…
ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…
झाड आहे साक्षीला
अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत.
टंकबोली
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.
ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स
ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स
मार्विनमिल्स यांची ओळख ३७ मिनिटांच्या चित्रफितीतून अशी होते.
Link for Lecture by Prof Marvin Mills
मित्र हो,
ताजमहालाच्या संदर्भात लेखमाला सादर केली जात आहे. त्या संदर्भात विविध पैलूंवर प्रकाश टाकला जावा म्हणून लेखन केले आहे. यामधील एक महत्वपूर्ण दुवा ताजमहालाच्या बनावटीचा काल निर्णय करता येईल का? हा मानला जातो.
विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.
विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात आहेत. भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात.
बाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व
अगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो.
सच बोलू तो
गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.
बाप
सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.
एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है
पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा
जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर
इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल
एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है