कशाला हवी ही दुकानं?
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय.
अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ?