लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी
(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).
(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).
सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी( म्हणजे T.V. आणि सोशल मिडीयावर) आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून राहिली आहे. ती म्हणजे नोटाबंदी. काय अभूतपूर्व परिस्थिती, दिवाळी नंतर शिमगा लगेचच यावा आणि सर्वत्र धुळवड साजरी व्हावी असे चित्र. महामहीम पंतप्रधान मोदीशेठ ह्यांचे परम भक्त आणि परम शत्रू, सगळेच डोके गमावलेल्या मुरार बाजी प्रमाणे थैमान घालताना दिसताहेत. बरे दोघांना हि सर्वसामान्य जनतेच्या हालाची, तिच्या देशभक्तीची, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची कोण काळजी?
(पिशी अबोली यांचा लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता हा लेख वाचला आणि मनात आले की रामायण आणि महाभारत काळातील रूढी, प्रचलित कथा आणि कल्पना इथे मांडाव्यात. लेडी सीमोर यांचे आयुष्य संघर्षमय आणि शारीरिक आणि मानसिक दुःखमय गेले. पण तरीही त्यांनी जिद्दीने आपली बाजू समाजापुढे मंडळी... ही खरच मोठी गोष्ट आहे.
प्रस्तुत लेखात कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याबद्दल मी आजवर जे वाचले आहे ते लिहिले आहे. हा धागा लिहिण्याचा उद्देश इथे चांगली चर्चा व्हावी एवढाच आहे. जर वाचकांकडे काही वेगळी माहिती असेल तर मला समजून घ्यायला नक्की आवडेल.)
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
- डॉ. सुधीर रा. देवरे
"अरे सहाब क्यू इतना झंझट करवाते हो आप? कौन जायेगा बँक में घडी घडी लाईन लागाने को?. मेरा तो अकाउंट भी नही है बँक में, आप मेरे को कॅशहि दे दो."
साधारण सहा महिन्यापूर्वीचं आमच्या नवीन बंगाली कामवाली बाईचं हे वाक्य.
नवरा पुराणिक बिल्डर्सच्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर, आणि हि त्याच कॉम्प्लेक्समधे धुणी-भांडी, जेवण बनवण्याचं काम करते. कॉलेजात शिकत असलेली दोन मुलं शिकण्यासाठी कोलकातामधे. नवऱ्याच्या पगारात दोघे भागवतात आणि तिचा सगळा पगार मुलांच्या शिक्षणासाठी पाठवते.

नमस्कार मंडळी.
मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे
सायकलिंग - ८०१० किमी
रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो.
ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.
नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.