संवाद
आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता.