कुंती, द्रौपदी आणि सीता... काळ आणि परिस्थिती

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
2 Dec 2016 - 8:05 pm

(पिशी अबोली यांचा लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता हा लेख वाचला आणि मनात आले की रामायण आणि महाभारत काळातील रूढी, प्रचलित कथा आणि कल्पना इथे मांडाव्यात. लेडी सीमोर यांचे आयुष्य संघर्षमय आणि शारीरिक आणि मानसिक दुःखमय गेले. पण तरीही त्यांनी जिद्दीने आपली बाजू समाजापुढे मंडळी... ही खरच मोठी गोष्ट आहे.

प्रस्तुत लेखात कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याबद्दल मी आजवर जे वाचले आहे ते लिहिले आहे. हा धागा लिहिण्याचा उद्देश इथे चांगली चर्चा व्हावी एवढाच आहे. जर वाचकांकडे काही वेगळी माहिती असेल तर मला समजून घ्यायला नक्की आवडेल.)

दुर्वासांची सेवा केल्याने त्यांनी कुंतीला एक वरदान दिले. त्यानंतर कुंतीने सूर्याला आव्हाहन केल ते केवळ तारुण्यसुलभ कुतूहलातून. त्यातून कर्णाचा जन्म झाला. पांडू एका शापामुळे प्रणय करू शकणार नाही हे समजल्यानंतर देखील कुंती शांत होती. ती त्या काळच्या पत्नी धर्माचे पालन करून पांडू बरोबर वानप्रस्थाश्रमात गेली. मात्र पांडू कायम दुखी होता कारण जर पुत्र प्राप्ति झाली नाही तर स्वर्गात जागा मिळणार नाही; असा त्यावेळी समज होता. हे पतीचे दु:ख समजून कुंतीने दुर्वासंकडून मिळालेल्या वरदानाची माहिती पांडूला दिली. त्यानंतर त्याच्या इच्छे नुसार तिने तीन शक्तींशी समागम केला आणि पुत्र प्राप्ति करून घेतली. कुंतीला झालेले तीन पुत्र पाहून माद्री... पांडूची दुसरी पत्नी दु:खी राहू लागली त्यावेळी पांडूच्या विनंतीवरून कुंतीने आपल वरदान माद्रीच्या ओटीत घातले. अशाप्रकारे माद्रीला देखील दोन पुत्र झाले. त्याकाळात स्त्रीने जन्म दिलेली मुले ही ती ज्या व्यक्तीची पत्नी असे त्या व्यक्तीचीच मानली जायची. त्यामुळे धर्म, भीम आणि अर्जुन हे कुंती पुत्र आणि नकुल सहदेव हे माद्री पुत्र पुढे पांडू पुत्र म्हणून पांडव असे ओळखले जायला लागले.

द्रौपदीच्या पांडवांबरोबरच्या लग्नाच्या बाबतीत दोन कथा प्रचलित आहेत. त्यातील एक कथा अशी की, द्रौपदीने पूर्व जन्मात तप करून सर्वगुण संपन्न पुरुष पती म्हणून हवा अशी इच्छा केली होती. त्यामुळे जेव्हा कुंतीने आदेश किला की द्रौपदीने पाच पांडवांशी लग्न करावे त्यावेळी द्रौपदी अगोदर या प्रस्तावाला तयार नव्हती. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला तिच्या पूर्वजन्मी केलेल्या तापाची आठवण करून दिली आणि पाच पांडवांचे गुण मिळून एक सर्वगुण संपन्न पुरुष होतो असे सांगून तिला त्या लग्नासाठी तयार केले. दुसरी कथा ही की कुंतीने तिच्या पाचही पुत्रांच्या नजरेत सौंदर्यवती द्रौपदी प्राप्त व्हावी ही इच्छा बघितली होती. जर द्रौपदीचे लग्न फक्त अर्जुनाशी झाले असते तर कदाचित् पांडवांमध्ये फूट पडली असती; हे ओळखून कुंतीने असा आदेश दिला की द्रौपदीने पाचही जणांशी लग्न करावे. जेणे करून पांडव कायम एकत्र राहातील.

सीतेच्या बाबतीत सांगायचे तर मात्र तिचे कुठल्याच घटनांवर किंवा काळावर नियंत्रण नव्हते. वडिलांनी त्यांच्या पत्नीला दिलेला शब्द पाळण्यासाठी रामाने वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. पतीच्या बरोबरच पत्नीने असावे या त्या काळाला साजेशा विचाराने सितेनेही रामाबरोबर जाणे ठरवले. शुर्पणखेच्या अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचे अपहरण केले. त्यानंतर त्याने तिला अशोक वनात ठेवले असताना आपल्याशी विवाह करण्याची विनंती केली. परंतु त्याने कधीही सीतेला स्पर्श केला नाही. तरीही रामाने तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. अग्नी परीक्षा देऊनही सीतेच्या आयुष्यातले दु:ख संपले नाही. एका धोब्याच्या बोलण्यावारून राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. त्यानंतर रामाच्या पुत्रांना जन्म देऊन त्यांचे योग्य शिक्षण सीतेने परत एकदा वनात राहूनच केले. शेवटी रामाला त्याचे पुत्र सुपूर्द करून तिने धरतीमध्ये स्वतःला सामावून घेतले.

कुंती, द्रौपदी किंवा सीता यांचा विचार केला असता एक लक्षात येते की, कुंतीच्या तारुण्य सुलभ उत्सुकतेतून कर्ण जन्माला. आजच्या काळाचा विचार केला तर हा तिचा दोष असू शकत नाही. किंवा द्रौपदीने पूर्व जन्मी सर्वगुण संपन्न पतीची इच्छा केली होती किंवा ती खूप सुंदर होती हा देखील तिचा दोष नक्कीच नाही. आजच्या काळाप्रमाणे पूर्व जन्म आपण मानतच नाही. सौंदर्यवती स्त्रीने भावांमध्ये भांडण होऊ नये म्हणून सर्व भावांशी लग्न करावे हा विचार आजच्या काळात कदापि मान्य होणार नाही. परंतु तरीही कुंती किंवा द्रौपदी यांच्या आयुष्यात जे काही घडले त्याला कुठेतरी एक दुवा दिलेला आहे. मात्र कुंती आणि द्रौपदी यांच्या तुलनेत सीतेच्या आयुष्यात जे काही घडले त्यात तिचा दोष कुठेच नाही. तरीही तिच्या आयुष्याची परवडच झालेली दिसून येते. कुंती आणि द्रौपदी यांचा काल वेगळा आणि त्यातही द्रौपदी आणि कुंती यांच्यात पिढीचे अंतर होतेच. त्यामुळे असे म्हणता येईल की त्याकाळातील सामाजिक परिस्थिती प्रमाणे कुंती, द्रौपदी किंवा सीता यांच्या आयुष्यातल्या घटना घडल्या.

जर दशावतारांचा विचार केला तर सीता ही कुंती आणि द्रौपतीच्या अगोदरच्या काळातली आहे असे लक्षात येते. (मस्य, कस्य, वराह, नरसिव्ह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की हे दहा अवतार.) रामा नंतर कृष्णाचा जन्म आहे आणि महाभारत हे कृष्ण जन्मात झालेले आहे.

मूलतः जिथे स्त्रीने बंड केले आहे तिथे तिला काही ना काही मार्ग मिळालेला दिसून येतो. रामायण काळात कैकयीने तिची इच्छा आपल्या पतीकडून पूर्ण करून घेतलीच की. त्याचप्रमाणे महाभारतात देखील अशी अनेक उदाहरणे आहेतच. याचा अर्थ असा की स्त्रीने जिथे संघर्ष केला आहे तिथे तिने न्याय मिळवलाच आहे. अर्थात स्त्रीला जर सर्वसाधारण सामाजिक रूढी मान्य नसतील तर तिला बंड करावेच लागेल, असाही अर्थ होतो.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

महाभारत हे रामायणाआधी लिहिले गेलेय. बाकी लेख आवडला.

प्रचेतस's picture

3 Dec 2016 - 9:31 am | प्रचेतस

सहमत

प्राची अश्विनी's picture

3 Dec 2016 - 10:38 am | प्राची अश्विनी

हे माहीत नव्हतं.

नगरीनिरंजन's picture

3 Dec 2016 - 10:44 am | नगरीनिरंजन

आणि दोन्हीही इतिहास नसून काव्यं आहेत. अर्थात तेव्हाच्या सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब त्यात पडलेले आहेच आणि त्यावरुन समाज नेहमीच असाच असतो असे म्हणायला हरकत नाही.
स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी स्त्रीनेच बंड करायला हवे ह्याच्याशी सहमत!

mayu4u's picture

3 Dec 2016 - 12:25 pm | mayu4u

महाभारत हे रामायणा nantar लिहिले गेलेय.

प्राची अश्विनी's picture

3 Dec 2016 - 10:39 am | प्राची अश्विनी

लेख चांगला आहे पण लेखाचं प्रयोजन कळलं नाही.

मारवा's picture

3 Dec 2016 - 11:37 am | मारवा

हे पतीचे दु:ख समजून कुंतीने दुर्वासंकडून मिळालेल्या वरदानाची माहिती पांडूला दिली. त्यानंतर त्याच्या इच्छे नुसार तिने तीन शक्तींशी समागम केला आणि पुत्र प्राप्ति करून घेतली.

हे समजले नाही कृपया विस्तार करावा माझ्याकडे वेगळी माहीती आहे. तुमची भुमिका काय ते अगोदर समजले तर बरे होइल.

ज्योति अळवणी's picture

3 Dec 2016 - 1:13 pm | ज्योति अळवणी

प्राची अश्विनीजी, पिशी अबोली यांच्या लेखातून लेडी सिमोर यांच्या आयुष्याची परवड वाचली. पिशी अबोली यांनी सिमोर यांची तुलना कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याशी केली. तेव्हा वाटलं की आपल्या वाचनात आलेली या तिघींच्या काळातील सामाजिक मानसिकता मांडावी; म्हणून हा लेख प्रपंच.

मारवाजी, माझी भूमिका अशी काही नाही. जे आजवर वाचलं आहे ते इथे मांडलं आहे. माझा मुद्दा मात्र एकच आहे की काळ कुठलाही असला तरी स्त्रीला आत्मसन्मानासाठी कायम झगडावे लागते.

महाभारत अगोदर की रामायण ही चर्चा अनेकदा रंगली हवं. मी केवळ विष्णूचे दशावतार समोर ठेवून असा अंदाज बांधला आहे की रामायणाचा काळ महाभारता अगोदर असेल. कारण दशावतारामध्ये राम अवतार अगोदर आहे आणि त्यानंतर कृष्ण अवतार आहे, इतकंच.

यशोधरा's picture

3 Dec 2016 - 1:19 pm | यशोधरा

काळ कुठलाही असला तरी स्त्रीला आत्मसन्मानासाठी कायम झगडावे लागते.

पैसा's picture

3 Dec 2016 - 2:43 pm | पैसा

लेख आवडला. सीतेचे अग्निदिव्य व त्यापुढचे रामायण प्रक्षिप्त आहे असे अनेक ठिकाणी वाचले आहे.

पिशी अबोली's picture

3 Dec 2016 - 11:07 pm | पिशी अबोली

लेख आवडला.

"पतीच्या बरोबरच पत्नीने असावे या त्या काळाला साजेशा विचाराने सितेनेही रामाबरोबर जाणे ठरवले." या ठिकाणी एक शंका अशी की मग उर्मिलेचे काय ? रामाला वडिलांची आज्ञा पाळणे भाग होते म्हणून वनात जाणे अपरिहार्य होते. सीतेने ज्या तर्काने, रामाबरोबर रहावयाचे ठरविले त्याच तर्काने उर्मिलाला सुद्धा वनात सोबत घेवून जाणे तर्कसंगत ठरले असते. दुसरी गोष्ट पतीबरोबर वनात असणे आणि पतीशिवाय १४ वर्षे राजग्रुहात राहाणे यात कोणाचा त्याग उठून दिसतो ? यावर सुद्धा भाष्य व्हावयास हवे होते. लेखाचे अधिक बारकाईने वाचन करून प्रतिसाद लिहिन. लेख विचार करण्यासारखा आहे.

ज्योति अळवणी's picture

4 Dec 2016 - 4:57 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वाना माझा लेख आवडला त्याबद्दल धन्यवाद.
@जयन्त बा शिम्पी....... ज्यावेळी लक्ष्मणाने रामाबरोबर वनात जाण्याचा निर्धार केला आणि सीता देखील जाणार म्हणाली त्यावेळी उर्मिलाने देखील लक्ष्मणाकडे बरोबर नेण्याचा हट्ट केला होता. परंतु आजारी वडील आणि दु:खी आई यांच्या सेवेसाठी तू इथेच अयोध्येत राहा असा आदेश पती लक्ष्मणाने पत्नी उर्मिलेला दिला होता. अशी देखील एक आख्यायिका आहे की लक्षमण जितके दिवस नव्हता त्या दिवसाच्या मनाच्या जळण्याचे प्रतिक म्हणून उर्मिलेने रोज एक दिवा लावला होता.
अर्थात पतीशिवाय १४ वर्षे ऐश्वर्यात राहून देखील वनवास सहन करणाऱ्या उर्मिलेचा त्याग कायमच दुर्लक्षित राहिला हे खर आहे.