मा.ल.क.-४
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता.