अनाथांची माई - सिन्धुताई सपकाळ
सिन्धुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील 'पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव अभिमान साठे, ते गुराखी होते. सिंन्धु नकोशी मुलगी, म्हणून घरात तिला सर्वजण चिंधी' या नावाने हाक मारीत. त्यांच्या वडीलांनी बायकोच्या विरोधाला न जुमानता सिन्धुला शाळेत पाठवले. पण आईचा विरोध, आर्थिक परस्थिती, घरची जबाबदारी, बालविवाह या कारणामुळे चौथी पास झाल्यावर सिन्धुला शाळा सोडावी लागली.