मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

चॅलेंज - भाग ५ अन्तिम

aanandinee ·
लेखनविषय:
चॅलेंज भाग ५ (अंतिम) एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला” “तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला. “बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं. “नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता.

चॅलेंज - भाग ४

aanandinee ·
चॅलेंज भाग ४ “आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं. “अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?” “जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं. “अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही.

विकल्प

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विकल्प आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे.

चॅलेंज - भाग ३

aanandinee ·
लेखनप्रकार
चॅलेंज भाग ३ दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली. “लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय. बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”.

पैठणी दिवस भाग-१

गुल्लू दादा ·
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

चॅलेंज भाग 2

aanandinee ·
लेखनप्रकार
भाग १ पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या.

जनरेशन गॅप आणि निळाई

झपाटलेला फिलॉसॉफर ·
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

चॅलेंज भाग 1

aanandinee ·
लेखनप्रकार
तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचंय मला.” “कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं. “कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं. “अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं. “हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना!

समाधानाचे मुखवटे (भाग - २)

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
समाधानाचे मुखवटे भाग - १ दुपारी साडे-बारा एक वाजायच्या सुमारासास बसवाल्याने समाधानाला रस्त्याच्या शेजारी फूटपाथवर सोडले, त्या फूटपाथला लागून पूर्ण अर्धवर्तुळ आकाराचे एक भले मोठे मोकळे मैदान होते. तो फूटपाथ आकाराने एवढा मोठा की होता त्यावर काही चहावाले, पानटपरीवाले यांनी स्वतःचे धंदे दारूची जाहिरात असणाऱ्या छत्र्यांखाली सुरु केले होते. इथेही मान्सून बहुतेक नुकताच सुरु झाला असावा, असा अंदाज समाधानने त्या मैदानावर नुकताच उगवलेल्या हिरवळीकडे पाहून लावला. वातावरण छानच होते, हलका-हलका पाऊस चालू होता, गडद राखाडी रंगाचे ढग. संथ, आरामदायक आणि थंड हवा.

समाधानाचे मुखवटे भाग - १

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सलग दोन दिवस आणि रात्री झालेल्या अखंड जागरणामुळे त्याला कसलीतरी धुंदी आल्यासारखे वाटत होते, पूर्णपणे नशेत असल्यासारखी भावना. डोळेही भयंकर जळजळ करत होते. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता, जरा वेळ इकडे तिकडे केले कि त्याला प्रचंड उत्साह येई, मग अचानक आजूबाजूचे लोक, घटना हास्यास्पद वाटत. आणि मग अचानक थकवा. सखोल थकवा.. आता एकदाची गाडी आली म्हणजे दहा बारा तास ह्या अवजड पिशव्यांपासून सुटका होईल आणि निवांत झोपता येईल. असा विचार करत तो बसस्थानकावर कसा बस वेळ काढत होता.