पत्र...
प्रिय,
प्रिय,
एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .
झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......
पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !
जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते"
जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन
माझ्या अंगाशी कसाही झोंबतो
तेव्हा तो मला आवडत नाही
जेव्हा किरकोळ वादातून तो मला
हिंसकपणे Get out you bitch म्हणतो
तेव्हा तो मला आवडत नाही
माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर
मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो
तेव्हा तो मला आवडत नाही
मी एकटीच आवरून बाहेर जाताना
तो एकटक संशयानं बघतो
तेव्हा तो मला आवडत नाही
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . .
आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . .
काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . .
मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो !
कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ?
कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं !
जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . .
आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा
किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही
इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची
हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही !
परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं
कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं
अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत
गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ?
मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर
त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर
आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी
करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ?
येई हो अण्णा रे माझे माऊली ये ।
कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।।
आलिया गेलिया कोणी धाडी निरोप ।
कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।।
काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला ।
घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।।
अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी ।
अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत
शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा,
मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा,
घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून,
मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !!
प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला,
मी किंचित केले भार कमी खांद्याला,
नसता हे जीवन व्यर्थ मानले असते,
तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!
चकवून शत्रूला पार समुद्रा केले,
ती जन्मठेप मी हसत-हसत सोसियले,
जरी अंती आले उपेक्षाच मज पदरी,
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!
ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||
गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||
आयुष्य सोपं असत..
तुझ्यासाठी अवघड का करू?
मला नाही बदलायच;
तुझ्याकडून अपेक्षा का ठेऊ?
तो तसा... ही अशी...
तक्रारीचा सुर नको...
आपल मत आपल्यापाशी...
त्याची कुठे चर्चा नको!
सर्वांचच् आयुष्य सुंदर असत...
प्रत्येकजण आपल्यापुरत जगत असत;
एकमेकांशिवाय अडत नसत..
म्हणूनच..
अध्यात-मध्यात पडायच नसत!!!