✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सावरकरांचे मनोगत

क — कवि मानव, Tue, 01/10/2017 - 15:49
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा, मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा, घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून, मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !! प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला, मी किंचित केले भार कमी खांद्याला, नसता हे जीवन व्यर्थ मानले असते, तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !! चकवून शत्रूला पार समुद्रा केले, ती जन्मठेप मी हसत-हसत सोसियले, जरी अंती आले उपेक्षाच मज पदरी, निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे भारतवर्षे थोर तुझे उपकार, तू दिलेस मनगटात बळ न तलवारीला धार, न तू घेऊन हाती सत्याची विजय पताका, झळकविलेस करुनी दुष्टांचा संहार !! आता मोह नसे कुठलेही या देहाला, खारीचा वाटा माझा या देश सेवेला, हे हृदय हर्षिले न शीश अभिमानाने झुकले, वंदन करण्या माझ्या या मातृभूमीला !!

प्रतिक्रिया द्या
4017 वाचन

💬 प्रतिसाद (10)

कमा

चांदणे संदीप
Wed, 01/11/2017 - 09:25 नवीन
मनोगताचा उद्देश स्पष्ट होत नाही. शेवटचे कडवे साफ गंडलेले आहे. कविता उगीचच शब्दबंबाळ करून सोडली आहे. माफ करा, मला तरी आजिबात आवडली नाही. इतरांचे मत कदाचित याऊलट असू शकते. कवितेवर पहिलाच प्रतिसाद असा येतोय याचा मलाही खेद आहे. पण लक्षात घ्या, खूप अपेक्षेने उघडलेली कविता वाचण्यासाठी! Sandy
  • Log in or register to post comments

संदीप - हरकत नाही.. मी नक्कीच

कवि मानव
Wed, 01/11/2017 - 14:27 नवीन
संदीप - हरकत नाही.. मी नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेचा विचार करीन. मध्यंतरी सावरकरांवर एक व्याख्यान ऐकले आणि त्यातून काहीसा सुचलेली हि कविता. शेवटचं कडवा नक्कीच थोडा सत्य परिस्थितीशी सोडून वाटतं. पण दृश्य असा होतं की, माणसाच्या अतृप्त इच्छा असतात आणि त्याला अनुसरून सावरकर मातृभूमीशी मनोगत व्यक्त करत आहेत मी याला त्यांच्या निरूपणाची कविता म्हणू का कळत नाही... तुम्हाला काय वाटलं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

छान हो, शब्द जुळवण्याचा छान

समाधान राऊत
Wed, 01/11/2017 - 20:03 नवीन
छान हो, शब्द जुळवण्याचा छान प्रयत्न "चकवून शत्रूला पार समुद्रा केले, ती जन्मठेप मी हसत-हसत सोसियले" या दोन ओळी कमी केल्यातर सावरकर कुठेच नाहीत किंबहुना इतर वीरांना ही जशीच्या तशी लागु होते. पहिले चार शब्दसत्र आवडले!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

कवि मानव
गुरुवार, 01/12/2017 - 01:41 नवीन
धन्यवाद !! या दोन ओळी कमी केल्यातर सावरकर कुठेच नाहीत किंबहुना इतर वीरांना ही जशीच्या तशी लागु होते. --- मी याला माझा सन्मान म्हणून समजून घेतो :)))) की तुम्ही शालजोडी दिले असे समजू ;)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

आशय चांगला आहे!

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 01/12/2017 - 12:18 नवीन
आशय चांगला आहे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

कवि मानव
गुरुवार, 01/12/2017 - 14:24 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

छान प्रयत्न .

एकविरा
Fri, 01/13/2017 - 14:54 नवीन
छान प्रयत्न .
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

कवि मानव
Fri, 01/13/2017 - 20:36 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकविरा

चांगला प्रयत्न

पैसा
Sat, 01/14/2017 - 10:00 नवीन
चांगला प्रयत्न. का कोण जाणे अगदी उत्स्फूर्त वाटली नाही. आणि वृत्ततही जरा ओढाताण झाली असावी. याहून चांगले नक्की लिहू शकता.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. प्रयत्न नक्कीच

कवि मानव
Sun, 01/15/2017 - 17:30 नवीन
धन्यवाद.. प्रयत्न नक्कीच राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा