अभय-काव्य

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
11 Aug 2014 - 3:20 pm

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

अभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

निसर्गकन्या : लावणी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jul 2014 - 10:27 pm

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

अभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2014 - 3:34 pm

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Pandharpur

बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

अभंगअभय-काव्यकविता

वारी

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
5 Jul 2014 - 8:13 am

श्वासांतून वाहे
सावळा मुरारी..
पायी चाले वारी
पंढरीची||

सावळ्या डोहात
सावळा तरंग
भक्तिरूपी दंग
वारकरी||

बंधने जुनी का
भासती विजोड
देहा लागे ओढ
विठ्ठलाची..||

अधिरश्या जिवा
पावलांची साथ
वसे अंतरात
भक्तियोग ||

पाहता लोचनी
विठ्ठल सावळा
तप्त जीव भोळा
श्रांत होई ||

विष्णुरूपी लीन
होवून मरावे
अंतास उरावे
विष्णूरूप ||

अदिती जोशी

अभय-काव्यसंस्कृती

प्रीतीची पारंबी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
2 Apr 2014 - 10:18 pm

प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा
झिंगून पिंगा घाली 'अभय' येरझारा
ऊर्मीच्या उन्नतीने उमेदी उसळते ॥

अभय-काव्यवाङ्मयशेतीशांतरसकविता

लोकशाहीचा सांगावा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Mar 2014 - 8:49 am

लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

अभंगअभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Mar 2014 - 11:26 am

सूर्य थकला आहे

पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अभय-काव्यअभय-लेखनवाङ्मयशेतीवीररसवाङ्मयकविता

रंग आणखी मळतो आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Mar 2014 - 6:59 am

रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

                              - गंगाधर मुटे
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==‍

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनवाङ्मयशेतीकविता

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Dec 2013 - 5:26 am

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

अभय-काव्यनागपुरी तडकावाङ्मयशेतीकरुणरौद्ररसवाङ्मय

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

अभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा