पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
11 Aug 2014 - 3:20 pm

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

                           - गंगाधर मुटे ’अभय’
--------------------------------------------------------

अभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

11 Aug 2014 - 4:47 pm | कविता१९७८

मस्तच ; वास्तव .

गंगाधर मुटे's picture

15 Aug 2014 - 6:20 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद

गौरी लेले's picture

12 Aug 2014 - 9:52 am | गौरी लेले

सुंदर विडंबन !

गंगाधर मुटे's picture

15 Aug 2014 - 6:20 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद

तिमा's picture

12 Aug 2014 - 11:13 am | तिमा

कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की,

पैसा येतो आणि वाढत जातो
वाढताना,जुने धागे तोडतो
पैसा येतो, येतच रहातो
येताना, माज आणतो
पैसा येतो, घर भरतो
पण, घरपण घालवतो.

गंगाधर मुटे's picture

15 Aug 2014 - 6:21 pm | गंगाधर मुटे

सुरेख

अजय जोशी's picture

17 Aug 2014 - 7:02 pm | अजय जोशी

मस्त.