ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९
ओमर खय्याम भाग - १०
ओमर खय्याम भाग - ११
ओमर खय्याम भाग - १२
एक्झीट !
माणसाला जगायची अत्यंत जबरदस्त ओढ असते. अर्थात यालाही काही अपवाद आहेत. पण आपण सामान्य लोकांबद्दल बोलतोय ! मला वाटते या जगातून जवळ जवळ सगळ्या लोकांना आपली स्वप्ने अधूरी ठेवून या रंगमंचावरून एक्झीट घ्यावी लागते. त्यांच्यासाठी या ओळी आहेत.
दैवाच्या फटकार्यांनी जेव्हा माझा अंत होईल, तेव्हा माझ्या राखेतून झालेल्या मातीचे पेले बनवा. त्यात मद्य ओतताच मी परत येईन.
खय्याम म्हणतो,
नशीब जेव्हा मला तुडवेल,
माझ्या आशेचे रोपटे उखडून टाकेल,
माझ्या मातीचा प्याला कर,
त्यात मद्य भरताच मी येईन परत !
म्हणजे माझा परत जन्म झालाच तर मी या संसाराचा उपभोग घेईन, माझी स्वप्ने पुरी करीन.
प्याला प्रतिष्ठेचा !
कष्ट करुन आपण प्रतिष्ठा, संपत्ती आणि मान मिळवतो. खय्याम म्हणतो वर्कोहोलीक होऊ नका. जरा आयुष्याचा, या संसाराचा उपभोगपण घ्या. थोडीशी तथाकथीत प्रतिष्ठेला मुरड घातली तरी चालेल .
खय्याम म्हणतो,
सुंदर गुलाबी मदीरेचा घेऊ वास,
फोडू हा प्याला प्रतिष्ठेचा.
अपार कष्ट उपसलेत, ते आता थांबवू
तारा छेडून, या रुळणार्या बटांशी खेळू.
जर आता जे मिळवायचे आहे ते मिळवून झाले असेल तर ज्याच्यात आपल्याला रस आहे त्या गोष्टी करु त्यासाठी मान, समाजातली आपली तथाकथीत प्रतिष्ठा बाजूला ठेऊ.
खय्याम प्रतिष्ठेला काचेच्या प्याल्याची उपमा देतोय. प्रतिष्ठेच्या कल्पना किती तकलादू असतात आणि सापेक्ष असतात हे मी सांगायला नको. आजकाल तर सर्व प्रतिष्ठेच्या जागा गुंडांनीच व्यापलेल्या असतात. :-)
स्वर्गाची श्रीमंती.
माणसाचा हव्यास आणि त्याच्या भौतिक गोष्टींचा उपभोग घेण्याची ओढ यातील फरक समजवून घेतला पाहिजे.
ओढ योग्य आहे,पण हव्यास वाईट.
ज्याकाळी मोठमोठे सुलतान आणि राजे यांना जास्तीतजास्त देश पादाक्रांत करायचा छंद जडला होता आणि त्यातून निर्माण होण्यार्याा संपत्तीचा उपयोग करुन महाल, मंदिरे बांधली जायची त्यावेळची ही रुबाया त्यांना उद्देशून आहे.
खय्याम म्हणतो,
एक कोपरा व तुकडा भाकरीचा जगाहून प्यारा,
जमिनीचा आणि भव्यतेचा आग्रह सोडून दिलाय.
गरिबी आहे ह्रदयाशी कवटाळली,
त्यात आम्ही पाहतो स्वर्गाची श्रीमंती.
माणसाला याहून काय लागते ? अर्थात हे आयुष्याच्या शेवटी शेवटी कळायला लागते. पण तेच बरे आहे, नाहीतर जगात ज्या भव्यदिव्य गोष्टी तरुणांच्या हातून घडतात, त्या घडल्या नसत्या. आणि त्या घडल्याच पाहिजेत अशा मताचा मी आहे.
आपल्याकडील संत परंपरेच्या जवळ्पास नेणारी ही रुबाया आहे.
संसारसे भागे फिरते हो !
सगळे ज्ञान (त्या वेळी उपलब्ध असलेले) मिळवल्यानंतर खय्याम म्हणतो दारुच्या धुंदीइतके उच्च पदाला पोहोचवण्याची ताकद कुठल्याच शिक्षणात आहे असे मला वाटत नाही. ही थोडीशी तिरकस आणि विनोदाची झालर असलेली रुबाई आहे.
खय्याम म्हणतो,
वास्तवातील असणे, नसणे मला समजते.
आणि समजते अध्यात्मिक उंची.
नम्रपणे म्हणावेसे वाटते,
दारुच्या धुंदीपेक्षा श्रेष्ठ अशी पदवी नाही.
थोडक्यात काय, संसारापेक्षा श्रेष्ठ असे कुठलेच अध्यात्मिक शिक्षण नाही. हे जगच आपल्याला सर्व शिकवते आणि त्या शिक्षणाचा वापर इथेच करायचा आहे. त्या मुळे या विद्यापीठाकडे पाठ फिरवू नका. येथे प्रवेश घ्यायला कुठलिही प्रवेश परिक्षा द्यावी लागत नाही, फक्त मनापासून जीव तोडून काम करावे लागते. नाहीतर मग -
संसारसे भागे फिरते हो,
भगवान को तुम क्या पाओगे......
वाफ !
आपण आयुष्यात काय आणि खरे कोठे शिकलो हा एक खरोखरच संशोधनाचा विषय आहे.
आपण जे शिकलो ते आपल्याला खरेच समजले आहे का ? का नुसती पोपटपंची ? जेव्हा आपण पुढच्या पिढीला शिकवायला जातो तेव्हा आपल्या शिक्षणातील पोकळपणा आपल्याला कळतो. आपल्या तथाकथित ज्ञानाचे केव्हाच बाष्पीभवन झालेले असते. याचाच दुसरा अर्थ “लोकासांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण.”
हे विषेशत: तथाकथीत आध्यात्म शिकवणारे, बुवा, स्वामी, गुरू यांच्या बाबतीत फारच खरे आहे. कारण दुर्दैवाने या क्षेत्रातले कळणार्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. आपल्याला पैशात, धंद्यात कोणी फसवले तर आपल्याला लगेचच ( तुलनेने ) कळते. मित्रांनो पण यांच्या पासून सावध रहा. यांनी तुम्हाला फसवले आहे हे फार उशीरा लक्षात येईल. पैशापेक्षाही आपले दसपट नुकसान होते. कारण यात आपली ऐन उमेदीची वर्षे वाया जातात. ते नुकसान कसे भरून काढणार ?
खय्याम म्हणतो,
तारुण्यात शिक्षकांनी शिकवले,
आता आपली पाळी शिकवायची !
याचा शेवट फार विदारक आहे.
पाणी म्हणून आलो, वाफ म्हणून चाललो !
या असल्या गुरूंपासऊन सावध. मन:शांती वगैरे सगळे आपल्या कामात, यशामधे, कष्टात, घरात, आवडत्या गोष्टीत, छंदात, इ.इ. यामधेच असते.
हीच ती खय्यामची मदीरा ! दुसरे काय असणार ?
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
30 Jun 2011 - 11:04 am | अमोल केळकर
सुंदर . हा भाग ही मस्त रंगला आहे :)
अमोल केळकर