ओमर खय्याम -एक गणिती व मित्र !........ओमर खय्याम भाग ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 May 2011 - 11:35 am


ओमर ख्य्याम १
ओमर खय्याम २

x3+bx2+2bc=ax2 हे बीजगणितातील इक्वेशन सोडवण्यासाठी खय्यामने एक सोपी पध्दत शोधून काढली.

हे सोडवण्यासाठी, तो म्हणतो एक वर्तूळ आणि एक हायपरबोला काढला की काम होते. खय्यामकडे त्यावेळी व्हेरिएबल ही संकल्पना नव्ह्ती. म्हणून त्याने हे सर्व शब्दात सोडवले. पण त्याचा युक्लीडचा अभ्यास होता हे निश्चित.

खय्यामला वैदिक गणित आणि इथले गणिती यांची माहिती होती हे ही निश्चितपणे म्हणता येते कारण त्याने त्याच्या एका लेखात असे म्हटले आहे की तिसर्‍या घातांका पर्यंतची इक्वेशन हिंदूंनी सोडवलेली आहेत,
मी त्याच्या पुढची सोडवायचा प्रयत्न करतोय.

वरील इक्वेशनचे स्पष्टिकरण, एका डॅनिश गणितीने लिहलेले आहे. ते खाली दिलेले आहे.

अब्राहम लिंकनने एका ठिकाणी म्हटले आहे ते फार महत्वाचे आहे.
“माणसाच्या आयुष्याचे जर चांगले आणि वाईट
असे दोन भाग केले तर-
चांगल्या भागाचा नव्वद टक्के भाग हा मित्र आणि मैत्रीने व्यापलेला असतो.”
किती खरे आहे हे! मग यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना त्यांच्यातील एखादा गेल्यावर.......याची कल्पनाच त्यांच्या ह्रदयाचा थरकाप उडवते.
खय्यामने त्यावर एक रुबाया रचली आहे. खय्य्यामच्या आयुष्यात मित्रांना फार महत्व होते.
तो म्हणतो –

सगळे माझे मित्र गेले, एकएक करुन
आले न्यायला त्यांना यमदूत वरुन.
या आयुष्याच्या मैफिलीत तीच मदिरा प्यालो आम्ही भरभरुन,
त्यांचे प्याले पडलेत आडवे आता, आमचे बाजूला सारुन !

मित्रहो, आपल्याला सर्वांना माहीत आहे,-आपल्याला जायचेच आहे.

कल्पना करा आपण आपल्यातून गेलेल्या मित्राचा, संध्याकाळच्या मैफिलीत आपण चुकून पेला भरला आहे. या वयात आपण कितीही निर्ढावलेले असलो तरीही, ही कल्पना आपल्या काळजाचा ठोका चुकवतेच !

मित्र, मैत्री आणि आपण एकत्र घालवलेला वेळ याची तुलना मला वाटते कशाशीही होऊ शकत नाही. मित्रांची किंमत कशी करणार ?
दोन मित्रांमधले नाते हे
देव (असलाच तर) आणि त्याच्या भक्तांमधील
नात्यासारखे असते.
येथे एकच फरक असतो.
दोघेही देव असतात
आणि
दोघेही भक्त असतात.
भक्त देवाला कधीच अडचणीत टाकत नाही
आणि
देव भक्ताला अडचणीत कधिच
एकटे सोडत नाही.

हा झाला थोडासा गंभीर विचार.

हे आयुष्य म्हणजे एक रंगलेली मैफिल. याच मैफिलीत आपण मित्रांबरोबर याचा आनंद घेत असतो.
या आयुष्यात मित्रांच्या समवेत आपण या जीवनाचा आनंद लुटतो, अनेक मैफिलींची मजा एकत्र लुटलेली असते आणि अचानक केव्हातरी आपला एखादा मित्र जातो. खय्यामने याला उपमा पडलेल्या पेल्यांची दिली आहे. बाजूला सारलेले पेले म्हणजे आपल्याला मागे ठेऊन हे मित्र पुढे निघून गेलेले आहेत.

टीप : रुबाया वाचताना ओळी या क्रमाने वाचाव्यात. ओळ – १,२. परत १,२ नंतर ३ आणि ४. आणि वाटल्यास शेवटची परत एकदा.

जयंत कुलकर्णी

संस्कृतीइतिहासवाङ्मयकविताचारोळ्यासमाजविचारआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

26 May 2011 - 11:46 am | JAGOMOHANPYARE

छान

प्रास's picture

26 May 2011 - 2:35 pm | प्रास

वा! खय्याम आणि त्याच्या रुबाया यांची एकत्र माहिती देण्याचा उपक्रम छान रंगतोय.

माणसाच्या आयुष्याचे जर चांगले आणि वाईट
असे दोन भाग केले तर-
चांगल्या भागाचा नव्वद टक्के भाग हा मित्र आणि मैत्रीने व्यापलेला असतो.

हे तर कुणालाही पटण्यासारखेच आहे.

त्यांचे प्याले पडलेत आडवे आता, आमचे बाजूला सारुन !

ही मात्र प्रखर वास्तवाची जाणीव करवणारी ओळ आहे.

पुलेप्र. :-)