तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला.
आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे. बंगालातील तमाम समाज सुधारक भद्रलोकांतून (ऊच्च वर्णीय) आले, ते आपलं धोतर सांभाळत सुधारणा करत होते, राजा राम मोहन राय यांच्यासारख्या व्यक्तिनेही कधी जानवं काढून फेकलं नाही, पण दक्षीणेत हे आंदोलन ब्राम्हण आणी ब्राम्हणवादाविरोधात असे आक्रमक स्वरूपात प्रकट झाले, असं का झालं?
