विरंगुळा

पुणेरी व्यंगशोधक नजर (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
14 Jul 2015 - 12:25 pm

'अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी', गोल्फकोर्सवर गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस तोल सावरता सावरता म्हणालो, 'अरे सिच्युऐशनमधलं व्यंग लगेच पकडतो मी',…… सुपरलक्झरी लाइफस्टाइलचा परीघतूनच त्याला पुढे सांगतच राहिलो,...'आता आज सकाळचंच बघ, ड्रायविंग करताना दुकानाचा बोर्ड पहिला, "मृत्युंजय - सिजनल्स "…. '

'खिक्क …. ' समोरचा रीस्पॉन्स….

शब्दक्रीडाविरंगुळा

मीठ (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 4:52 pm

होना आणि डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं…. इकडून मी बोललो, 'हो का?' 'अरे बापरे' 'चक् चक्' 'आई गं' या व्यतिरिक्त कुठलीही प्रतिक्रिया पलीकडून येत नव्हती. कॉल संपवला शेवटी कसातरी. आज बायको वॉर्डात आईजवळ राहणार होती तर माझी ड्युटी होती लेकीला झोपवण्याची, रोजच्याप्रमाणे झोपण्यापूर्वी आपल्या लहान लेकीला, गोष्टीच्या पुस्तकातुन एकीकडे पुढची गोष्ट वाचून दाखवत होतो, तर दुसरीकडे ती मनाने कुठेच्या कुठे पोहोचली होती.

शब्दक्रीडाविरंगुळा

रिकामी घंटा, लोलक गायब

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 11:13 am

वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती टिपणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण....

रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो.

नाट्यमुक्तकभाषाप्रतिक्रियामतविरंगुळा

वाट...(शतशब्दकथा)

योगी९००'s picture
योगी९०० in जनातलं, मनातलं
6 Jul 2015 - 7:46 pm

काहीही झाले तरी मी आज तिच्याकडे जाणार होतो. बराच काळ वाट पाहिली होती...

लहानपणापासून तिच्या वाड्यावरून जाताना खिडकीत बसलेली दिसायची. पाहून हसायची, रुसायची, नजरेनेच बोलवायची, पण कोणीच मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. दोन-चार वेळा चोरून तिच्या वाड्यात शिरलो होतो. रखवालदाराने हाकलले,मारले पण ती मात्र कधीच मदतीला आली नाही.

मध्यंतरी बराच काळ गेला पण ती मात्र तशीच खिडकीत कायम बसलेली दिसायची.

धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो...

ती माझीच वाट पहात होती...मला हसून म्हणाली

मांडणीप्रतिभाविरंगुळा

चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 11:24 pm

प्रिय मिपाकरांनो,

बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे.

मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो.

आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले.

पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान.

यान्बूत तर बरेच कट्टे केले.

ते असो.

तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.)

कळावे,

लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती.

मौजमजाविरंगुळा

माझं करीयर मार्गदर्शन (!)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 5:27 pm

परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते.

मुक्तकविरंगुळा

“मिपा वाचकांनो थोडीतरी खाज बाळगा!

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 10:37 am

नेतागिरी नेते मा. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदारचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै १९७६ पूर्वी नेता पित्त्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण नेता पित्त्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण या राष्ट्रीय धुरंधर नेत्याने गाव-गुंड पुंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा कायद्याला घाबरणारा नेता समाज गावात सोडलेल्या बेफाम वळूसारखा उधळू लागला. नुसताच उधळू लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा नेता चक्क मूठ आवळून त्यालाच दिमतीला बोलावू लागला. विधायक विचारवंतांशी दोन हात करायला सज्ज झाला.

बालकथासमाजप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Jun 2015 - 7:19 pm

मागिल भाग..
मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो....
पुढे चालू...
=========================

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

मला आवडलेले संगीतकार :- ६ हंसराज बेहल

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
25 Jun 2015 - 9:26 am
कलासंगीतसमाजजीवनमानचित्रपटप्रकटनआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा