अपेक्षाभंग . - (शशक स्पर्धेसाठी नाही )
मिसळपाववर शतशब्द कथांची स्पर्धा चालू आहे . कथांचा पाऊस पडतोय नुसता .वाचकांचा आणि लेखकांचाही कल्लोळ चाललाय नुसता . आपणही घ्यावा का भाग ? आपल्याला बऱ्यापैकी जमतं कि कथा लिहायला . तो विचार करत होता . लिहूनच टाकू . अगदी पहिला नाही तर तिसरा तरी नंबर येईल अश्या दृष्टीने बराच वेळ विचार करून त्याने एक शशक कथा लिहिली आणि डकवली.
१० मिनट दुसर्या कामात गुंतला . आत्तापर्यंत किती प्रतिसाद आले असतील ? किती जणानी +१ दिला असेल कितींनी -१ हे बघायला अधिरतेने त्याने मी .पा चं पान रिफ्रेश केलं अन ती महान अक्षरं झळकली
'The website encountered an unexpected error. Please try again later.'