स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय
क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…
ही कथा संपूर्ण /अति काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------
ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! ;) तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे जम्ले त्र लक्षात ठिव्ने!
टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार..
"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.
"ठीक…" क्रुरसिंह फुत्कारला
ते दहा दिवस निष्ठारामाने, गजांआडून कुत्र्यांना स्वतः जेवायला वाढले….
मृत्युदंडाच्या दिवशी निष्ठारामाला जेव्हा गजांपलीकडे कुत्र्यांच्या बाजूला ढकलण्यात आले, तेव्हा सर्व कुत्रे त्याला चाटू लागले,
सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
"७ / मार्च / २०१४ वेळ १० रात्री, क्वालालंपूर,
……
……
……
अश्यारितीने माझ्या चांगल्या नेचर्-चा दुनिया नेहमीच फायदा उठवत आलीये. पण आज, नव्हे आत्तापासूनच ठरवलंय मी, की 'भाडमें जाए दुनियादारी'. " असं आपल्या डायरीमध्ये, फ्लाईटच्या चेकइन लाइनमधे उभ्याउभ्याच नोंदवून, हळव्या वॉंन्गची त्या दिवसाची भडास थंडावली.
नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र....
महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते.
“तुम्हा आयटीवाल्यांनी महागाई वाढवून ठेवली आहे” आयटीवाले लोक शनिवारी रिकामेच असतात असा पक्का समज करुन आमच्या सोसायटीतले काका मला फाइलवर घेत होते. आयटीवाल्यांनी महागाई वाढवली हे माझ्यासाठी नवीनच होते. मी आपला समजत होतो की तो राजन ते Repo rate, CRR या न समजनाऱ्या इंग्रजी शब्दांत जो काही खेळ करतो त्यानेच महागाई वाढते किंवा कमी होते.
“तसे नाही हो काका महागाई मागणी पुरवठ्याने वाढते. आयटी तर आताच आली महागाई तर केंव्हापासून वाढतच आहे.”