नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र....
महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते.
शेवटी ती आली. दोघांच्या चंचल नजरा एकमेकांना अधीरपणे न्याहाळू लागल्या.....पहिलेच चुंबन..सुखातिरेकानी राजपुत्रानी डोळे मिटले..
मूक रडण्यार्या मालतीला प्रधानजी हलकेच उठवून घेऊन जाऊ लागले. विषकन्येने आपले काम चोख केले होते. आता राज्य त्यांचेच होते!
प्रतिक्रिया
15 Jul 2015 - 9:58 am | जडभरत
काहीतरी गोंधळ आहे. नक्की कोण कुणासोबत काय करत आहे हेच समजत नाहीये.
15 Jul 2015 - 10:08 am | यश राज
कदाचित मालती प्रधांनाची मुलगी असावी.. तिच्याकरवी त्यांनी राजपुत्रावर विषप्रयोग केला असावा..
15 Jul 2015 - 10:09 am | अमोल मेंढे
मालती विषकन्या?
15 Jul 2015 - 10:13 am | एस
अरे बापरे! मालती विषकन्या निघाली. प्रधान दु दु दु दु! ;-)
छान आहे. पुलेशु.
15 Jul 2015 - 10:16 am | जडभरत
पण चुंबनातून कसा विष प्रयोग होईल? कैतरीच काय? मग तोंडात विष धरणारी व्यक्ती पहिली मरणार नाही काय?
बाद्वे मालती प्रधान कन्येबरोबर इच्छधारी नागीण पण आहे काय?
बाप रे?
15 Jul 2015 - 11:15 am | कहर
चुंबनातून विष प्रयोग - अधिक माहितीसाठी पहा अक्षय आणि दीपिका अभिनित सिनेमा "चांदणी चौक टू चायना"
18 Jul 2015 - 4:00 pm | शब्दबम्बाळ
किंवा गेम ऑफ थ्रोंस पहा! :P
15 Jul 2015 - 10:17 am | पगला गजोधर
१+
15 Jul 2015 - 10:30 am | सौंदाळा
चंद्रकांता चालु झाले का काय परत
विषपुरुष - महाराज शिवदत्त उर्फ सौंदाळा :)
15 Jul 2015 - 10:33 am | जडभरत
खी: खी: खी:
15 Jul 2015 - 11:44 am | नाखु
मी याक्कुला शोधतोय.
हीहाहाहा नाख्खू
16 Jul 2015 - 1:12 am | संदीप डांगे
ई तो साला होना ही था...
15 Jul 2015 - 10:44 am | सदस्यनाम
कदाचित मालती आणि राजकुमार भौभहीन असतील. राजकुमाराला परधान्याने विषकन्येच्या प्रेमात पाडून मालती अणि राज्य ढापायचा पिलान केला असेल.
यक्क्क्कु
15 Jul 2015 - 12:36 pm | तुडतुडी
मालती विषकन्या नाहीये हो . विषकन्येला बघून राजकुमाराने शेण खाल्ल आणि मग गेला ढगात .
15 Jul 2015 - 8:16 pm | सटक
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
माझ्या वाचिवात (अर्थात साहित्यिक) असल्याप्रमाणे, विषकन्या ह्या राजकारणातील महत्वाचे अंग मानल्या जात असत. त्यांना राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणे आचार, विचार, आहार, विहार शिकवले जात असत. युद्धकलाही शिकवली जाई. खूप वर्षे "डॉर्मंट" रहाण्याचेही शिक्षण दिले जात असे.
मालती प्रधानाची कन्या होती की नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे! मालती कदाचित महाराजांनी तयार केलेली विषकन्याही असू शकतेच. प्रधानानी फक्त योग्य त्यावेळी डाव टाकला....
15 Jul 2015 - 8:34 pm | जडभरत
प्रधानांनी डाव टाकला तर राजपुत्र कसा काय मेला?
एक साहित्यिक शंका हो!!!
15 Jul 2015 - 9:02 pm | सटक
डाव= मालतीला माहिती आहे की ती विषकन्या आहे. म्हणून ती राजपुत्राला भेटायचे टाळत असते. प्रधान तिला भरीस पाडून राजपुत्राला भेटायला पाठवतात आणि....
टाकायला अजून बरेच डाव आहेत.
खूप प्रयत्न करूनही राजपुत्र वश होत नाही म्हणून प्रधान निरोप्याचे काम करून राजपुत्राला भरीस पाडून तिथे पाठवतात..
जशी तुमची कल्पनाशक्ती तसा डाव...
15 Jul 2015 - 9:28 pm | पैसा
छान कथा!
15 Jul 2015 - 9:42 pm | प्रचेतस
ही घ्या तुमच्यासाठी एक विषकन्या.
15 Jul 2015 - 9:51 pm | सटक
व्वा!! हा बघा ऐतिहासिक पुरावा!!
15 Jul 2015 - 9:56 pm | चित्रगुप्त
विषकन्या कशी बनवितात ?
तूनळीवर 'हौ टू मेक विषकन्या' असे सर्चून बघितले, काही मिळाले नाही म्हणून ही पृच्छा.
हिंदी पिच्चरवाल्यांना ठाऊक असावे:
15 Jul 2015 - 10:13 pm | टवाळ कार्टा
=))
15 Jul 2015 - 10:28 pm | सटक
मांडणी सुंदर!!
15 Jul 2015 - 11:04 pm | जडभरत
माझ्या माहितिप्रमाणे विषकन्या चुंबनाद्वारे माणसांना मारत नसत. तर आपल्या सावजाला मोहपाशात फसवून, बोलण्यात गुंतवून, मोठ्या चतुराईने दारू किंवा खाद्यपदार्थात विष मिसळून देत असत. माणसाचे शरीर विषमय असणे हा फक्त साहित्यीक कल्पनाविलास वाटतो.
15 Jul 2015 - 11:05 pm | प्रचेतस
सहमत.
15 Jul 2015 - 11:22 pm | dadadarekar
मोघले आझमात मधुबाला दिलिपकुमारला फुलाचा वास देऊन बेशुद्ध करते... हा मिनि विषकन्येचा नमुना मानावा का ?
15 Jul 2015 - 11:35 pm | प्रचेतस
मी असले चित्रपट बघत नाही त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
16 Jul 2015 - 2:31 am | dadadarekar
आtaa यु ट्युबावर तरी पहा.
16 Jul 2015 - 2:34 am | dadadarekar
https://m.youtube.com/watch?v=k-MHRCjzbgE
15 Jul 2015 - 11:37 pm | पैसा
ळॉळ! तुमच्या धनगरी उपायानंतर पहिल्यांदाच एवढी विनोदी प्रतिक्रिया दिलीत!
15 Jul 2015 - 11:50 pm | जडभरत
मस्त जोक दादा
16 Jul 2015 - 12:41 am | प्यारे१
यात FTII चे नवीन चेयरमन प्रमुख भूमिकेत आहेत काय?
- संदीपिल खटमुनि ;)
16 Jul 2015 - 2:11 pm | कपिलमुनी
पण विषप्रयोगामागे "प्रधान" सेवक आहेत
=))
16 Jul 2015 - 2:16 pm | प्यारे१
प्रधानांचा प्रयोग विषारी आहे की अमृताचा कुंभ निपजवणारा ते येणारा काळच ठरवेल ना 'शाम'???? ;)
15 Jul 2015 - 10:27 pm | सटक
मौर्यकालीन...चाणक्याच्या कौटिल्यिय अर्थशास्त्रात उल्लेख. रेसिपी महिती नाही
https://en.wikipedia.org/wiki/Visha_Kanya
शशी भागवतांचे रत्नप्रतिमा पण वाचनीय आहे...अर्थात त्यांची तीनही आहेत. मर्मभेद, रत्नप्रतिमा आणि रक्तरेखा!
15 Jul 2015 - 11:54 pm | सूड
हे विषकन्या म्हणजे एकदम झॅन्टमॅटिक प्रकरण दिसतंय!!
16 Jul 2015 - 12:02 am | रातराणी
गोष्ट आवडली. छान आहे कल्पना : )
16 Jul 2015 - 3:02 am | चित्रगुप्त
सटकभैय्या (की सटक भाभी?), सध्या बाहुबली लय गाजतो आहे, तर त्याहून अतिभव्यदिव्य, महानेत्रदीपक, मेगापिच्चर आपण तुमच्या या ष्टोरीवर बनवूया का ? आमच्या पेन्थेसिलिया वरील तिन्ही पिच्चरांचे ( बघा: ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’} कॅलिफोर्न्यातले शूटिंग आता संपत आलेले आहे, ते आटोपल्यावर लगेच सुरु करता येईल. आर्डिरेक्क्षन आणि लिरिक्स आम्ही करू ... चल-छय्याछय्याछय्याछय्या च्या चालीवर "विष-कन्याकन्याकन्याकन्या हे गाणे तर आत्तापासूनच आमच्या मनात घुमू लागले आहे, आणि "विषकन्या किसीको मिस नही करती, किस जरूर करती है" वगैरे डायलागही सुचू लागले आहेत.
राजकुमाराच्या भूमिकेत इम्रान हाश्मी सारखा अणुभवी नट असलेला बरा

(फक्त मरण पावण्याचे अॅक्टिंग मात्र त्याचेकडून नीट करवून घ्यावे लागेल)
पण विषकन्येसाठी कोण घावी बरे ?? (आज मिपावर तात्या असते, तर त्यांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला असता).
.
.
कंगना? विद्या? प्रियंका?
श्रिया? अनुष्का? आशा सैनी?
.

अंजली? नवनीत? काव्या?
.
.
सटक भैय्या/भाभी, फकस्त तुम्ही हो म्हणा, आणि लागा संपूर्ण ष्टोरी लिवायला.
16 Jul 2015 - 4:04 am | संदीप डांगे
दादा दोन सूचना!
१. हाश्मीला मरण्याची खरीखुरी अॅक्टींग येण्यासाठी थेट विष देऊन मारावे. (दोन फायदे: तुम्हाला उत्तम शॉट पण मिळेल, पब्लिकच्या डोक्याचा कायमचा शॉटही जाइल)
२. विषकन्येच्या भूमिकेत जम्नार नाहीच इतर कुनी... तिथे हवी फक्त सनी सनी सनी.
16 Jul 2015 - 3:15 am | सटक
खंग्री आहे अगदी!! माझी काही गरज आहे अशी अस्फुट शंका देखील वाटत नाही!! राइट्स बहाल तुम्हाला!!
_/\_ कोपरे जुळलेली आहेत..शंका नसावी!!
16 Jul 2015 - 5:08 am | गुलाम
९९ च शब्द आहेत. एका शब्दाला विषबाधा झाली की काय?? ;)
16 Jul 2015 - 6:35 am | जडभरत
पहिलेच चुंबन नंतर जो टिंबा टिंबा आहे तिथे तो शब्द असावा. संपादकीय कारवाईच्या भीतिने उडवला असावा. बघा त्याच्यानंतरच राजपुत्र सुखाने का काय ते डोळे मिटतो.
16 Jul 2015 - 1:04 pm | तुडतुडी
मी असले चित्रपट बघत नाही त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.>>>
मग कसले चित्रपट बघता तुम्ही ? ;-)
हाश्मीला मरण्याची खरीखुरी अॅक्टींग येण्यासाठी थेट विष देऊन मारावे.>>> हा हा हा . लय भारी .
16 Jul 2015 - 1:08 pm | तुडतुडी
सीतेने रामाला जराही दोष दिलेला नाही>>>
कशी देणार ती ? पतिव्रतेचे वांझोट्या नियमांखाली दाबून गेली होती बिचारी .
रामाच्या नावे ठणाणा बोंबलतांना सीतेकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं नाही तुमचं?>>>
लैच झोंबलेलं दिसतंय . सीते कडेच लक्ष आहे हो माझं . पण तुम्ही नुसत्या सीतेकडे लक्ष न देता तिच्यावरच्या अन्यायाकडे लक्ष दिलं असतं तर तुम्हीही असेच बोम्बलला असता . पण तुम्ही नर ना . तुमच्या घरातल्या स्त्रियेने तुमचा त्याग केल्यावर तुम्ही कसे त्यांच्या नावाने ठणाणा बोंबलत नाही ते बघू
16 Jul 2015 - 1:47 pm | प्यारे१
गल्ली चुकलं की वो तुमचं आक्का!
16 Jul 2015 - 7:06 pm | dadadarekar
गल्ली बरोबरच आहे.
शूर्पणखेला लक्षुमणाने विषकन्येच्या शंकेने दूर ठेवले असावे
16 Jul 2015 - 2:23 pm | तुडतुडी
व्हय वो . ते डिलीट करायचं हाय बघा . कसं करतात माहित नाय