चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 11:24 pm

प्रिय मिपाकरांनो,

बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे.

मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो.

आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले.

पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान.

यान्बूत तर बरेच कट्टे केले.

ते असो.

तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.)

कळावे,

लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती.

कृपया, चेनैकर मिपाकरांनी व्यनि मार्फत संपर्क करावा.

आपलाच

(कट्टेकरी) मुवि

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

3 Jul 2015 - 6:27 am | योगी९००

चेन्नाईला एगमोर एरीयात मराठी मंडळ आहे. तिथे आलेल्या लोकांना मिपाकर करून घ्या आणि टाका एक कट्टा...!!! हाय काय आणि नाय काय..!!

(हलकेच घ्यावे ही विनंती)

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2015 - 8:13 am | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे मिपाकर सिरुसेरि चैन्नइमध्ये राहतात. गेल्या वर्षीपर्यंत सोत्रिही राहत होते.

चेन्नइबरोबर आणखी एक ऋणानुबंध म्हणजे माझी बायको मिपाकर बनली तेव्हा चेन्नइतच वास्तव्यास होती.

प्यारे१'s picture

3 Jul 2015 - 9:08 am | प्यारे१

एका जागी स्थिर रहा की मुवि.
काय चंद्रासारखे परिभ्रमण करताय? (ह. घ्या.)

मी मध्यंतरी जवळपास ६ महिने कामानिमित्त चेन्नईला राहात होतो . पण साईबाबा आणि आईबाबा यांच्या आशिर्वादाने नुकताच आपल्या मुळ ठिकाणी परत आलो आहे . थोडक्यात गोडी . चेन्नईमध्ये केवळ मिपाकरच नव्हे तर मराठी माणसांचाच एक हक्काचा कट्टा असावा असे माझेही मत आहे . चेन्नईत गेल्यावर मी सुद्धा सुरुवातीला काही महिने फेसबूक सारख्या माध्यमातुन तेथिल मराठी माणसांचा एखादा ग्रुप आहे का बघितले . पण तसे फारसे दिसत नाही . तिथे अनेक वर्षे राहणारी मराठी मंडळी ही त्यांचे अनुभव , माहिती ही नव्याने आलेल्या मराठी लोकांशी शेअर करण्यात, मैत्री -ओळख करण्यात व त्यांना सामावून घेण्यात अनुत्सुक वाटतात . वर्षानुवर्षे आपल्या गावापासुन लांब चेन्नाईसारख्या परक्या ठिकाणी जे ना धड शहर आहे ना खेडे , राहुन या मराठी लोकांचा स्वभाव तुसडा , कोंदट झालेला जाणवते . पहिले काही दिवस प्रयत्न करुन मीही मग यांचा नाद सोडुन दिला .
चेन्नाईला एगमोर एरीयात मराठी मंडळ आहे--- हे मराठी मंडळ सेंट्रल पासुन जवळ वेपेरि नामक मध्यवर्ती ठिकाणी संपत रोडवर आहे .यांची वेबसाईटही आहे . मला स्वताला येथिल एकुण कार्यपद्धती ही जुनाट , सुस्त , उदासिन वाटली . ठराविक फी ( ५००/-) भरुन या मंडळाचे सभासद होता येते व तेथे आयोजीत होणारया मराठी कार्यक्रमांना जायला मिळते . पण बरेचसे कार्यक्रम हे संध्याकाळी असतात . नव्याने चेन्नईत आलेल्या व उपनगरांमध्ये राहणारया मराठी माणसाला / कुटुंबांना 'काळ /वेळ /बस / ट्रेन / ट्रॅफीक/दुसरया दिवसाचे काम' या सगळ्यांचे भान लक्षात घेता या कार्यक्रमांना जाणे , येणे ,पुरेसा वेळ देता येणे शक्य नसते . आधी फी भरुन मेंबर व्हा मगच पुढचे बोलणे असा एकुण इथला सुर दिसतो . मला स्वताला चेन्नईतील लोकल तामिळ लोकांनीच घर , रेंट , प्रवास या बाबतीत मार्गदर्शन केले / मदत केली . त्यामुळे 'रोममध्ये रोमन लोकांसारखेच वागावे' या उक्तीप्रमाणे चेन्नईमध्ये तेथील मराठी लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या साउथ थलायवा मित्रांबरोबरच थलपाकुट्टीमध्ये कट्टा करणे यांत मजा आहे . अर्थात ही सर्व माझी वैयक्तीक मते / अनुभव आहेत .
नुकताच मी 'चेन्नईमध्ये मराठी माणसांचा एखादा ग्रुप असावा' अशा स्वरुपाचा एक प्रतिसाद दिला होता . तो खाली परत देत आहे .
-----------------
माहितीपुर्ण लेख

सिरुसेरि - Tue, 26/05/2015 - 09:24
या मालिकेतील सर्व लेख व प्रतिसाद खुप माहितीपुर्ण व उपयुक्त वाटले . एक लक्षात आले की - नोकरी , व्यवसाय व पर्यटन या निमित्ताने बरीच मराठी माणसे दिर्घ , मध्यम किंवा कमी कालावधीसाठी तामिळनाडुमध्ये (चेन्नई , कोइंबतुर व इतर ठिकाणी) राहायला आहेत किंवा जाउन येउन असतात . परंतु या सर्वांना एकत्र जोडु शकेल असा एखादा फोरम / इंटरनेट बेस्ड ग्रुप (फेसबुकवर ) जसा की 'मराठी पिपल इन तामिळनाडु' उपलब्ध असायला हवा होता . त्यामुळे ही मंडळी एकमेकांना महत्वाची माहिती ,उपयुक्त सुचना , मदत ,चर्चा-विचार यांची देवाणघेवाण नेटवर तसेच त्यांच्या सोयीने प्रत्यक्ष भेटुन करु शकतील . ज्याचा सर्वांनाच फायदा होइल . ---------

3 Jul 2015 - 1:01 pm | मुक्त विहारि

@ योगी९०० ===> बघू या.एक एक उत्तम मराठी माणूस शोधूया अन त्यासी मिपाकर बनवू या, असेच आमचे धोरण असते.

@प्यारे१ ===> काय करणार? आत्ता-आत्ता पर्यंत कौटुंबिक गरज म्हणून पैसे कमवत होतो, ह्या वेळे पासून मात्र, कामाचा आनंद घ्यायला जात आहे.

@सिरुसेरी ===> तामिळनाडू किंवा परप्रांतील मराठी माणसांचे पुर्वज, हे एक शिक्षा ह्या स्वरूपात मराठी प्रांतातून तिकडे गेले असावेत आणि आपण दुर्लक्षित आहोत, ही भावना फार पुर्वी पासूनच तिथल्या मराठी माणसांत असावी.

गुजरात (गायकवाड), मध्यप्रदेश(होळकर)आणि राजस्थान (शिंदे) ह्यांच्याकडे परकीय आक्रमण थोपवण्याची जबाबदारी असल्याने, तिथल्या मराठी माणसांना, पहिल्यापासूनच मराठी राज्य-कर्त्यांचा पाठिंबा होता.

पण कदाचित तितका पाठिंबा, तंजावर सारख्या दख्खनी मराठी प्रशासकांना मिळाला नसावा.

आणि मग हे पिढ्यान-पिढ्यांचे पुर्वग्रह, आता जास्तच खराब झाले असावेत.

असो,

मराठी माणसांत एकी न्हवती हा इतिहास

मराठी माणसांत एकी नाही हेच वर्तमान

मराठी माणसे कधीच एकत्र येवू शकणार नाहीत हेच भविष्य

शेवटी काय तर, मराठी माणसे एकाच सुत्रात कधीच बांधता येणार नाहीत, हे त्रिकालाबाधित सत्य.

कटू असले तरी हे सत्य स्वीकारायचे आणि जमतील तशी, निदान आपल्या स्वभावाच्या ७०-८०% मॅच होणारी, मंडळी जमवायची आणि एक फक्कड गप्पा-गोष्टींचा कट्टा करायचा.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

तामिळनाडू किंवा परप्रांतील मराठी माणसांचे पुर्वज, हे एक शिक्षा ह्या स्वरूपात मराठी प्रांतातून तिकडे गेले असावेत आणि आपण दुर्लक्षित आहोत, ही भावना फार पुर्वी पासूनच तिथल्या मराठी माणसांत असावी.

माझ्या अंदाजाप्रमाणे सिरुसेरी चेन्नइमध्यल्या ज्या मराठी माणसांचा उल्लेख करत आहेत ते गेल्या काही वर्षांत (५ ते २५ वगैरे) स्थायिक झालेले असावे.

चेन्नइच काय अमेरिकेतसुद्धा हाच अनुभव बरेचदा येतो. मी स्थानिक मराठी मंडळाचा कार्यकर्ता असल्याने सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलणारे दिसल्यास स्वतःहून त्यांच्याशी बोलून मंडळाबद्दल माहिती देत असे. तसेच पुढच्या कार्यक्रमांचे आमंत्रण देत असे. बहुतांश वेळी त्यांची उत्तरे उसने अवसान आणून दिलेली असायची. आम्ही कामात फार व्यग्र असतो वगैरे. काही तर असेही म्हणायचे अरेच्या आपल्या इथेही मराठी मंडळ आहे का? आम्ही १२ वर्षांपासून राहतोय, ठाऊकच नव्हते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्याच लोकांना सौजन्याने उत्तर न देणे मात्र पटत नाही.

शेवटी मी कुणी मराठी बोलणारे दिसले तरी स्वतःहून त्यांच्याशी बोलण्याचा नाद सोडला. ज्यांना मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असते ते स्वतःहून जालावर शोधून येतातच.

आणखी एक अनुभव म्हणजे भारतातून प्रथम येताना माहिती हवी म्हणून मंडळाला इमेलद्वारे विचारणा करतात. मी अशा इमेल्सला उत्तरे द्यायचे काम केले आहे. बरेचदा एका व्यक्तीच्या इमेल्स व रिप्लाइजची संख्या दोन दोन डझनांवर पोचायची. अशी मंडळी नंतर इथे आल्यावर स्थिरस्थावर झाल्यावरही एकदाही मंडळाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. थोडक्यात गरज सरो वैद्य मरो असे धोरण असते.

एक कार्यकर्ता म्हणून मी असे लिहिणे ज्या चळवळीसाठी मी काम करतो तिला कमीपणा आणणारे आहे याची जाणिव आहे पण कधी कधी कटू सत्य बोलावेसे वाटते.

राघवेंद्र's picture

3 Jul 2015 - 10:45 pm | राघवेंद्र

प्रतिसाद पटला.

संदीप डांगे's picture

4 Jul 2015 - 12:55 am | संदीप डांगे

आपण भले आणि आपले काम भले अशी विचारवृत्ती आहे हो. आपले काम भले झाले की वैद्य मेले तरी काय करायचंय कारण परत तेच आपण भले आणि आपले काम भले. असो. मराठी मनोवृत्तीवर बोलावे तितके कमीच आहे.

सिरुसेरि's picture

6 Jul 2015 - 12:39 am | सिरुसेरि

तुम्हाला चेन्नै प्रवासासाठी व तेथिल स्टे साठी शुभेच्छा .आपला मित्रांचा ( मराठी किंवा अमराठी कसेही) ग्रुप जमला तर चेन्नई मध्ये खुप एन्जॉय करता येते . तिथे बरेचदा ए.आर.रहमान , इलायराजा ,हरिहरन ,शंकर महादेवन ,बेन्नी दयाल ,अर्जित सिंग ,शिवमणी ,येसुदास , चित्रा अशा मान्यवरांचे लाइव कॉन्सर्टस / म्युसिकल शोस असतात . संजीव अभ्यंकर सारख्यांचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम असतात . मी असताना शर्मन जोशीचे 'राजु ,राजा ,राम और मै ' या हिंदी नाटकाचे प्रयोग झाले . तेथिल मुख्य तामिळ सिनेमांमध्ये बरेचदा मराठी कलाकार (सयाजी शिंदे ,अतुल कुलकर्णी , सचिन खेडेकर) आपले सुखद दर्शन देतात . हॉटेलींग व फिरण्यासाठी खुप चांगली ठिकाणे आहेतच .

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2015 - 7:31 am | श्रीरंग_जोशी

एका जुन्या सहकार्‍याचे त्याच्या चेपूवर हे शेअर केलं. मला वाटतय तुमच्या अन चेन्नईला जाणार्‍या मिपाकरांसाठी उपयोगी ठरेल.

If You're Veg And Proud, You'll Love These 16 Vegetarian-Only Restaurants In Chennai

यापैकी कैदी किचन रेस्तराँचा आतला फोटो (जालावरून साभार)
Kaidi Kitchen

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

7 Jul 2015 - 6:24 am | अरवीन्द नरहर जोशि.

तेथील मराठी माणसे फारसा प्रतिसाद देत नाहीत .