माहिती
ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.
मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ - निकाल
मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे.
"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अॅंड फ्री !!" माझा उपक्रम
नमस्कार. मी कौशिक लेले,
मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
राणीछाप पैसे कुठे गेले?
१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशात लंडनच्या राणीबाई छापाची नाणी आणि नोटा होत्या.
स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे चलन बदलले. राणीछापी पैसे बदलून एका रात्रीत आपले पैसे कसे आणले गेले? लोकांच्याकडे जे पैसे होते ते त्यान्नी कसे बदलले? याबाबत नेमका जुन्या लोकांचा कसा अनुभव होता? लोकांकडून जुने पैसे घेऊन नवीन पैसे दिले काय? मग ते जुने पैसे घेतले त्याचे सरकारने काय केले? नवीन पैसे लगेच कसे छापले? इ .इ इ.
याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या चर्चेसाठी हा धागा.
( जुन्या पैशाचे फोटू असतील तर इथे दाखवायला लाजू नये. )
सिरीया (contains some disturbing images)
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे.
सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती
असद समर्थक - दमास्कस मध्ये
जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस !
आज हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेचे बेताज बादशाह शंकर जयकिशन या जोडगोळी पैकी जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस ! आजच्याच तारखेला (१२ सप्टेंबर १९७१) वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी "जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां" म्हणणारा हा अवलिया यकृताच्या आजाराने हे जग सोडून निघून गेला. त्यांची आठवण येत असताना त्यांनी शैलेन्द्र, हसरत जयपुरी, वर्मा मलिक, नीरज, इंदीवर इत्यादी गीतकारांबरोबर संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर आणि आशयपूर्ण गाण्यांचा उल्लेख इथे मुद्दाम करावा वाटतो.
गुडबाय मि. चिप्स
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल.