माहिती

मदत : वायरलेस इंटरनेट डाँगल

राजो's picture
राजो in काथ्याकूट
17 Dec 2013 - 3:17 pm

नमस्कार मिपाकर्स,

सध्या बावधन, पुणे येथे स्थलांतरित झालो आहे. नवीन इमारत असलेने अजून वायर्ड इंटरनेटचा पर्याय (बी.एस्.एन्.एल., हॅथवे... वगैरे) आसपास उपलब्ध नाही. वायरलेस डाँगल हा पर्याय कितपत उपयुक्त आहे? ब्राऊझिंगव्यतिरिक्त डाऊनलोड करण्याचाही वापर असेल च. टाटा डोकोमो, फोटॉन, रिलायन्स, इतर ३जी प्रोव्हायडर्स पैकी कोणता योग्य ठरेल?

इतर काही पर्याय असल्यास सुचवावेत.

धन्यवाद.

मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
14 Dec 2013 - 12:40 pm

ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी?
त्याला साधा सोपा अभ्यास काय ?
तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :-

कंपनी : बँक ऑफ इंडिया
वर्ष : २०१३

महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो)

जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ)

फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१०

मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९०

अर्थव्यवहारमाहिती

युद्धकथा-१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Dec 2013 - 10:20 am
इतिहासलेखमाहिती

चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
11 Dec 2013 - 10:38 pm

यापूर्वीच्या लेखात आपण हिंदु देवादिकांच्या 'सपाट' रंगलेपन पद्धतीच्या चित्रातून हळूहळू पाश्चात्त्य पद्धतीच्या 'खोली' ‘घनता’ आणि 'छायाप्रकाश' दर्शवणार्‍या चित्रांकन पद्धतीकडे झालेली भारतीय चित्रकलेची वाटचाल, आणि त्याच सुमारास तिकडे फ्रांस मध्ये बरोबर याउलट दिशेने होणारी चित्रकलेची वाटचाल बघितली.
या लेखात आता आपण पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य पद्धतीच्या काही चित्रांद्वारे या दोन्ही चित्रपद्धतींमधील फरक बघूया.

बॉडी वर्ल्डस् व्हायटल - मानवी शरीराचे एक अनोखे प्रदर्शन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 11:05 pm

बॉस्टनच्या ऐतिहासीक फॅन्युएल हॉल एकेकाळी अमेरीकन स्वातंत्र्ययुद्धाच्या आखण्या करत असे. आत्ताच्या काळात तेथे नागरीकत्वाचा शपथविधी वगैरे सोहळे चालतात, खालच्या मजल्यावर केवळ खाण्यासाठी भरपूर दुकाने, बाहेर महागडी दुकाने आणि रेस्टॉरंट्स असा प्रकार आहे. सध्या ख्रिसमसच्यामुळे रोषणाई आहे, शनीवारी तर भरपूर पब्लीक थंडी असली तरी कोरडा दिवस असल्याने येऊन जाऊन मजा करत होते. अशा ठिकाणी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक वेगळेच फिरते प्रदर्शन आले आहे.

तंत्रऔषधोपचारविज्ञानसमीक्षामाहितीसंदर्भ

शेअर मार्केट आणि मी.

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
9 Dec 2013 - 12:12 pm

वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात.
अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे.

तर

१) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट.

अर्थकारणमाहिती

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 9:06 pm

असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

इतिहासचित्रपटप्रकटनप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमाहितीप्रतिभा

शोध स्वत्वाचा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
7 Dec 2013 - 4:37 pm

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

समाजमाहितीभाषांतर