मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

मोदक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

बॅटमॅन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ भाग २.१ मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून. आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः मेनेलॉसबरोबरच्या मारामारीत जखमी होऊन पॅरिस पळाला.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि ·
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

सोत्रि ·
लेखनप्रकार
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते.

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

सुज्ञ माणुस ·
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य bus ( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.: http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/st.html ) हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे. वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो.

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells

मोदक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) पहिल्या भागावर मिळालेल्या सर्वांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार्स. एक सूचना - आपापल्या संगणकावरती एखाद्या सहज सापडणार्‍या ठिकाणी / Desktop वरती एक एक्सेल फाईल तयार करून त्यामध्ये डमी डेटा तयार करून यापुढील सर्व प्रयोग त्यामध्ये साठवून ठेवले तर सर्व संदर्भ लगेचच मिळतील. आज शिकूया एक्सेलच्या काही मूलभूत बाबी. कोणतीही एक्सेल शीट समोर आल्यानंतर पुढील कांही गोष्टी सर्वप्रथम तपासून पाहिल्या गेल्या तर आपल्याला एक्सेलशीट समजण्यास खूप सोपे जाते.

शनिवारवाडा (भाग २) : अवशेष वर्णन (तटबंदी, दरवाजे आणि नगारखाना)

सव्यसाची ·
लेखनप्रकार
शनिवारवाडा (भाग १) : इतिहास शनिवारवाडा: अवशेष वर्णन सध्या दिसणाऱ्या अवशेषांमध्ये पुढील ३ गोष्टींचा समावेश होतो. १. तटबंदी आणि बुरुज २. दरवाजे ३. नगारखाना आता या तिन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती घेऊयात. १. तटबंदी आणि बुरुज शनिवारवाडा हा पुण्याच्या साधारणपणे मध्यावर वसला आहे. वाड्याची तटासह दक्षिणोत्तर लांबी १८४.२५ यार्ड आहे तर पूर्वपश्चिम लांबी १६४.२५ यार्ड आहे. या वाड्याने जवळपास ६.२५ एकर जमीन व्यापली आहे.