एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
12 Jan 2014 - 1:50 pm

२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :)

तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट.

या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे. सर्वांगाला व्यायाम देतानाच कार्डिओ म्हणजेच ह्रुदयाला व्यायाम देणारा, किंवा स्टॅमिनाचाही कस लावणारा असा हा व्यायाम, `बर्पी'.

केवळ हाच व्यायाम आणि जोडीला स्ट्रेचिंग, किंवा काही योगासनं, असाही दिनक्रम ठेवून तुम्ही तुमचं फिटनेस चं उद्दिष्ट साध्य करू शकता.

हे काय असतं ब्वा, कसं करायचं?... ते असं.
१. ताठ उभं रहा. नजर समोर.
२. पुढे खाली वाकून पावलांच्या बाजूस (अगदी बाजूस नसले तरी किंचित पुढे, फार नको) दोन्ही हात ठेवा. (इथे गुडघ्यात वाकल्यास हरकत नाही.)
३. दोन्ही पाय मागे फेकत `पुशअप पोजिशन' मधे या.
४. एक पुशअप करा. (न जमल्यास ही स्टेप वगळा)
५. पाय पुन्हा उडी मारून हाताजवळ आणा. (स्टेप २)
६. हात उंच करत बसल्या स्थितीतून उडी मारून स्टेप १ च्या स्थितीत या.

a

तूनळी वर याचे अनेक व्हिडियो मिळतील, आंतरजालावर बरीच माहिती मिळेल. हा सुद्धा साधारण सगळ्या वयोगटांना जमू शकणारा व्यायाम आहे. तेंव्हा वेळ कमी असेल, फिटनेस तरीही महत्वाचा असेल, तर बर्पीसाधना करायला हरकत नाही. हमखास फरक जाणवेल, तुम्हाला आणि पर्यायाने इतरांनाही.

एक बर्पी चॅलेंज म्हणून प्रकार करतात काही जण. १ बर्पी पासून सुरुवात करून रोज १ अशा प्रकारे संख्या वाढवत न्यायची आणि १०० दिवसा अखेर तुम्ही न थांबता एका दमात १०० बर्पी करायच्या. .... ऐकायला कदाचित कठीण वाटेल पण ट्राय करायला हरकत नाही ना! १०० नाही ५० तरी होतीलच एका दमात. मुद्दा काय, आपला स्टेमिना आहे त्यापेक्षा चांगल्यापैकी वाढला पाहिजे... त्यातच विजय आहे..

समाजजीवनमानतंत्रराहणीविचारलेखमतमाहिती

प्रतिक्रिया

तिमा's picture

12 Jan 2014 - 2:38 pm | तिमा

नियमित बर्पी केल्यावर बर्फी खाल्ली तर चालेल का ?(डायबिटिस नाही असे धरुन)
नवीन व्यायामप्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आयुर्हित's picture

12 Jan 2014 - 8:29 pm | आयुर्हित

नवीन व्यायामप्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मुद्दा काय, आपला स्टेमिना आहे त्यापेक्षा चांगल्यापैकी वाढला पाहिजे... त्यातच विजय आहे..
१००% सहमत.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 3:05 pm | वेल्लाभट

थँक्स.

इन्दुसुता's picture

12 Jan 2014 - 9:34 pm | इन्दुसुता

शरीराला ज्याप्रमाणे वेगवेगळ्या न्युट्रींअट्सची गरज असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यायामाची देखील.
वर दिलेला व्यायाम चांगला आहे तो कोअर साठी.. एरोबिक म्हणण्यासाठी तेव्हढा विदा उपलब्ध नाही. याशिवाय माझ्यामते 'बर्पी' ने सर्वांगाला व्यायाम होत नाही.
जागा आणि वेळ याची शहरी जीवनात घालावी लागणारी सांगड लक्षात घेता हा एक चांगला पर्याय आहे नक्की !! :)

वेल्लाभट's picture

12 Jan 2014 - 10:44 pm | वेल्लाभट

कोअर साठी उत्तम आहे हे मान्यच. नक्कीच. बॉडी बॅलन्स मस्त सुधारतो याने. पण कसं आहे, की दुसर-या स्टेप मधे हॅमस्ट्रिंग्स ना स्ट्रेच, पुशअप पोजिशन मधे शोल्डर, पुशअप ने पेक्स म्हणजे चेस्ट, ट्रायसेप्स, शोल्डर्स, काही अंशी लॅट्स, तसंच पुढे स्क्वॉट थर्स्ट मधे क्वाड्रासेप्स, काफ्स, ग्लूट्स....असं सगळंच अ‍ॅड्रेस होतं की.... झालंच ना सर्वांग ! :)

काय, बरोबर ना? चुकलं तर सांगा. :)

srahul's picture

9 Jul 2020 - 3:12 pm | srahul

पूर्ण सहमत

काकाकाकू's picture

12 Jan 2014 - 11:09 pm | काकाकाकू

वेगळं नाहि असं वाटतं. "आपल्याकडे आधीच शोध लावलाय" छाप प्रतिक्रिया द्यायचा उद्देश नाही!! खरंच फार वेगळम नाही वाटतंय.

याला 'बर्पी' हे का बुवा नाव आहे?

अनिरुद्ध प's picture

13 Jan 2014 - 1:34 pm | अनिरुद्ध प

होतो +१ काकाकाकु यांच्याशी सहमत.

रॉयल एच बर्पी या माणसाने हा व्यायाम प्रकार शोधला म्हणून त्याचे नाव बर्पी

खटपट्या's picture

12 Jan 2014 - 11:33 pm | खटपट्या

सहा जमले मला !!!

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 3:05 pm | वेल्लाभट

गुड!

देव मासा's picture

13 Jan 2014 - 2:11 am | देव मासा

इथे वाचले आणि टूब नळीवर विडेओ पहिले, माझ्या सारख्या स्थुल लोकांना पटकन जमेल असे वाटत नाही, शरीराच्या भार मुळे होणारा अपघात टाळता यावा म्हणून तोंडा समोर खाली उशी ठेवीन म्हणतो

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 3:06 pm | वेल्लाभट

हेहेहे... ठेवा ठेवा. सावकाश. धडपडू नका.

चंबा मुतनाळ's picture

16 Jan 2014 - 8:30 pm | चंबा मुतनाळ

सुपरलाईक देवमाशा

जिममध्ये ज्यादिवशी जाणं शक्य नसेल तेव्हा करायला बराय. व्यायामप्रकारांसोबत तुमच्या आणखी काही हेल्दी रेसिपीज असतील तर त्याही देत चला. पीनट बटर तर भारीच आहे आणखी काही पाकृ असतील तर त्याही येऊद्या.

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 3:06 pm | वेल्लाभट

जरूर ... धन्यवाद

यालाच सपात्या असेही म्हणतात...

बहुतेक पुण्याचे पेशवे यान्नी हा प्रकार आधी सान्गितला होता. (चुभुदेघे)

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 3:08 pm | वेल्लाभट

असेल असेल :D खिखिखि!

सपाटे हा व्यायाम प्रकार बर्पी सारखाच आहे पण त्यात जोर आणी बैठक एकत्र येते , बर्पीत बरेच प्रकार आहेत.

मंदार दिलीप जोशी's picture

13 Jan 2014 - 6:27 pm | मंदार दिलीप जोशी

सूर्यनमस्कार अधिक सोपे आहेत असे वाटते.

शैलेन्द्र's picture

13 Jan 2014 - 7:07 pm | शैलेन्द्र

आवडला, सोप्पाय,

माझ्या आवडीचा अजून एक प्रकार सांगतो,
१ बैठक/९ जोर- २ बैठका/८ जोर- ३ बैठका/७ जोर......... असं ९ बैठका/१ जोर पर्यंत करायच.. मग २० सीट अप्स, असा एक सेट.. तो झाला की २ मिनिट विश्रांती, मग पुन्हा उलट रिपीट,, (१ जोर/९ बैठका)..
असे तीन चार सेट २०-३० मिनीटात मारून होतात..
सर्वांगाला व्यायाम घडवणारी इतकी छान पद्धत दुसरी नाही ..

सूड's picture

13 Jan 2014 - 7:57 pm | सूड

जोर म्हणजे?

अरे पुशपसारखाच प्रकार की. पण फरक आहे. पुशपसदृश ज्या स्टेप सूर्यनमस्कारात आहेत तसेच करायचे.

पण दॅट असाईड, त्याला अख्ख्या म्हाराष्ट्रभर जोरच म्हणतात. तुला ही संज्ञा ठौक नसावी याचे परमाश्चर्य वाटले.

पुश अप्स माहितीये. जोर ऐकलंय पण म्हणजे काय हे माहिती नव्हतं.

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 10:35 pm | वेल्लाभट

याला ही लोकं इंडीयन पुशअप म्हणतात बर का

वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 10:35 pm | वेल्लाभट
वेल्लाभट's picture

13 Jan 2014 - 10:51 pm | वेल्लाभट

`ये पी एस पी ओ नही जानता.........' वाल्या अ‍ॅड सारखं म्हणावसं वाटलं मला हा प्रतिसाद वाचून. असो. अहो आपल्या आधीच्या पिढ्याच्या पिढ्या जोर आणि बैठका मारूनच बलसाधना करायच्या.

सूड's picture

14 Jan 2014 - 1:30 am | सूड

ओक्के काका !! ;)

बर्‍याच ठिकाणी 'सूर्यनमस्कार' असा प्रतिशब्द ऐकलाय 'जोर' साठी.
वेल्लाभटसेठ्चा सौम्य णि षे ढ. नस्तंय एखाद्याला माहिती.

वेल्लाभट's picture

14 Jan 2014 - 9:14 am | वेल्लाभट

बरं.... मान्य. णिषेढ स्वीकारला... पण नसतोय एखाद्याला विश्वास बसत त्या माहित नसण्यावर... चालायचंच.. :)

>>पण नसतोय एखाद्याला विश्वास बसत त्या माहित नसण्यावर

एकच मार्‍या पण लै सॉलिड मार्‍या !! ;)

जोर आणि सूर्यनमस्कार हे एकच आहेत असा महान शोध लावलेले लोक कोण म्हणे ते???? ऐकावं ते नवलच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jan 2014 - 6:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अनेक जण आहेत रे. इन फॅक्ट,अनेक वर्षे मी कुणाला जोर म्हणताना ऎकले नव्हते. त्याला सर्रास सूर्यनमस्कार म्हणतात लोकं.

सुधारुन सुधारुन थकलो. शेवटी कुठले सूर्यनमस्कार, १२ चे की १ चे असे विचारतो आता.

हम्म, धिस मे बी अ रीजनल थिंग देन. किमान सांगली-कोल्हापूर-सातारा-सोलापूर इकडे तरी जोरच म्हटलेले ऐकले आहे.

चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!

कपिलमुनी's picture

16 Jan 2014 - 7:00 pm | कपिलमुनी

हाच खरा महाराष्ट्र ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2014 - 7:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुर्यनमस्कार म्हणजे वेगळे.
http://www.youtube.com/watch?v=hxbrUpVk03U

सुर्यनमस्कारमधल्या ३-४ स्टेपच जोर या प्रकारात येतात

प्यारे१'s picture

17 Jan 2014 - 2:53 am | प्यारे१

अहो 'खरे' मेहेंदळे ,
आम्हाला माहिती आहे सूर्यनमस्कार म्हणजे काय ते! संघाच्या शिबीरात १०१ वगैरे घातले आहेत. १० वाले पण माहिती आहेत नि समितीवाल्या बायका घालतात ते १२ आकड्याचे पण ठाऊक आहेत.
त्या 'खोट्या' मेहेंदळेंनी दिलेलं स्टेटमेंट नि माझं स्टेटमेंट बरंचसं सारखं आहे.
असो.

सूड's picture

17 Jan 2014 - 2:17 pm | सूड

>>अहो 'खरे' मेहेंदळे
पुरषांनी दोन आडनावं लावायची फेसबुकी फ्याशन मिपावर पण सुरु झाली काय ?

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 2:26 pm | बॅटमॅन

फेसबुकावर १ सोडले तर असे कुणालाही करताना पाहिले नाही.

म्यारिड म्हैलांची तर अजूनच येगळी फ्याशन. स्वतःचं आणि नवर्‍याचं अशी दोन दोन नावे लावतात.

विटेकर's picture

14 Jan 2014 - 10:08 am | विटेकर

श्री वेल्लाभट यांना " मिपा चे रामदेवबाबा " हा पुरस्कार द्यावा का ?

वेल्लाभट's picture

15 Jan 2014 - 7:11 am | वेल्लाभट

नाही; मला प्रात्यक्षिकं करून दाखवायला सांगाल तर जमायची नाहीत :D

कंजूस's picture

15 Jan 2014 - 7:28 am | कंजूस

दोनशे मिटरस दुरच्या विहिरीवरून पाणी सांधून दोन घागरी घेऊन येणे हा सर्वांगाला चांगला व्यायाम आहे (होता).

चमचमित खाऊन ,टुविलरने(अथवा ऑटो) प्रवास करून वाचवलेली चरबी आणि शक्ती चकाचक एसीजिम मध्ये दृष्टिसुख घेत महिना हजार रूपये देऊन खर्च करणे हा सर्वांगसुंदर नवीन प्रकार आहे .

भ ट क्या खे ड वा ला's picture

15 Jan 2014 - 10:08 pm | भ ट क्या खे ड वा ला

पण करतो कोण लेकाचा,
सा X कळत पण वळत नाही
("वळत" मध्ये कायतरी मराठी व्याकरणातील कायसस आहे )

उद्दाम's picture

16 Jan 2014 - 9:35 am | उद्दाम

सूर्यनमस्काराचा जुळा भाऊ दिसतोय.

खटपट्या's picture

17 Jan 2014 - 12:17 am | खटपट्या

बरोबर, सुर्यनमस्करामधुनच काढलेला पाश्चिमात्य प्रकार वाटतोय.
चांगला आहे पण. सध्या चालू आहे. आणि नियमित केल्यास बरेही वाटते.

स्वानुभवावरून एक सूचना - थोडेही दमल्यासारखे वाटल्यास जरूर थांबा. चक्कर येयिपर्यन्त करू नका

अबोल बाहुली's picture

16 Jan 2014 - 4:26 pm | अबोल बाहुली

धन्यवाद, नविन माहिती.

सुदर्शन काळे's picture

16 Jan 2014 - 4:47 pm | सुदर्शन काळे

करुन बघायला हवा हा व्यायाम..

वेल्लाभट's picture

16 Jan 2014 - 8:22 pm | वेल्लाभट

सूर्यनमस्कार फार वेगळे आहेत, त्यात १२ स्थितींमधे ठहराव असतो, ज्यायोगे स्नायू आकुंचन - प्रसरण पावतात. जोरांमधे ठहराव कमी असतो. Vigour जास्त असतो. आणि बर्पीज हा तुलनेने पटापट करायचा प्रकार आहे. न थांबता एका मागोमाग आवर्तनं केली की याची खरी गंमत कळते.

Atul Thakur's picture

16 Jan 2014 - 9:56 pm | Atul Thakur

कुठलाही व्यायाम सांगतात्य्तो कुणी करु नये हे देखिल सांगतात. वेल्लाभटजी, ज्याला बीपी आहे, स्लीप डीस्क किंवा स्पाँडीलॉसीस आहे त्याने हा व्यायाम करावा काय?

खटपट्या's picture

17 Jan 2014 - 12:40 am | खटपट्या

मला तरी वाटते डॉक्टर चा सल्ल्याशिवाय आजिबात करू नये. बाकी वेल्लाभट सांगतीलच.

इन्दुसुता's picture

17 Jan 2014 - 10:35 am | इन्दुसुता

पण कसं आहे, की दुसर-या स्टेप मधे हॅमस्ट्रिंग्स ना स्ट्रेच, पुशअप पोजिशन मधे शोल्डर, पुशअप ने पेक्स म्हणजे चेस्ट, ट्रायसेप्स, शोल्डर्स, काही अंशी लॅट्स, तसंच पुढे स्क्वॉट थर्स्ट मधे क्वाड्रासेप्स, काफ्स, ग्लूट्स....असं सगळंच अ‍ॅड्रेस होतं की.... झालंच ना सर्वांग
नाही!! फक्तं एव्हढ्यालाच सर्वांग कसे म्हणता येईल? :)

सूर्यनमस्कार फार वेगळे आहेत, त्यात १२ स्थितींमधे ठहराव असतो, ज्यायोगे स्नायू आकुंचन - प्रसरण पावतात. याच्याशी सहमत. :)
जोरांमधे ठहराव कमी असतो. Vigour जास्त असतो. कबूल :)
आणि बर्पीज हा तुलनेने पटापट करायचा प्रकार आहे. न थांबता एका मागोमाग आवर्तनं केली की याची खरी गंमत कळते. म्हणून हा एरोबिक व्यायाम होऊ शकतो.
माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हा व्यायाम चांगला आहे यात शंका नाही, पण याच्या काही मर्यादा खाली देते आहे
१) व्यायाम एका लिनीअर दिशेने होतो
२) ज्याला तुम्ही " ठहराव" म्हणता ते ... सस्टेन्ड पोझिशन नसल्यामुळे कुठल्याच स्नायुला योग्य / पुरेसा स्ट्रेच होत नाही.
३) रिस्क / पोटेन्शियल फॉर इन्जुरी : ज्यांना अपर बॉडी स्ट्रेन्ग्थ नाही / व्यायामाची ज्यांना सवय नाही / गरोदर / किंवा इतर काही आजार असलेले अश्या होतकरूंनी व्यावसायिक देखरेखी शिवाय केल्यास इन्जुरीची शक्यता
मला स्वतःला तुम्ही दिलेले प्रोग्रेशन ( १ ते १००, रोज प्रत्येकी एक वाढवून ) एरोबिक फायदा लक्षात ठेवून सुद्धा अयोग्य वाटते. ( माझे वैयक्तिक मत आहे, तुमच्यावर टीका करण्याचा हेतू नाही, तेव्हा गैरसमज नसावा :) )

वेल्लाभट's picture

17 Jan 2014 - 1:02 pm | वेल्लाभट

मी कुठे तुमच्या प्रतिसादाला टीका समजलोय... मुळीच नाही.
मी माझं understanding सांगितलं, तुमच्याशी पडताळून बघायला. बास.

त्यावर तुमचा वरील प्रतिसाद बरोबरच आहे.. I agree with it. Aerobic progression numbers were just as a reference to what certain people/groups of people do. तसे दुवे गूगल वर मिळतात.

`असं किती वेळा करायचं' या प्रश्नाला नेमकं उत्तर नव्हतं, म्हणून हे उदाहरण दिलं जेणेकरून त्या उत्तराचा क्लू मिळेल अपोआप.

वेल्लाभट's picture

17 Jan 2014 - 12:58 pm | वेल्लाभट

या अबबतीत असंच सांगेन की मधुमेही काय किंवा हार्ट पेशंट काय; इन फॅक्ट तुमचा साधा खांदा नाजुक असेल तरी तुम्हाला एखादा व्यायाम वर्ज्य ठरू शकतो तेंव्हा अशी कुठलीही शंका असेल तर डॉक्टरांना विचारणंच योग्य आहे. मी इतकंच सांगू शकतो, की when in doubt; don't do it.

पैसा's picture

21 Jan 2014 - 8:49 pm | पैसा

असेच आणखी येऊ द्यात! ज्याला जे जमेल ते करू देत!