मदत : वायरलेस इंटरनेट डाँगल

राजो's picture
राजो in काथ्याकूट
17 Dec 2013 - 3:17 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स,

सध्या बावधन, पुणे येथे स्थलांतरित झालो आहे. नवीन इमारत असलेने अजून वायर्ड इंटरनेटचा पर्याय (बी.एस्.एन्.एल., हॅथवे... वगैरे) आसपास उपलब्ध नाही. वायरलेस डाँगल हा पर्याय कितपत उपयुक्त आहे? ब्राऊझिंगव्यतिरिक्त डाऊनलोड करण्याचाही वापर असेल च. टाटा डोकोमो, फोटॉन, रिलायन्स, इतर ३जी प्रोव्हायडर्स पैकी कोणता योग्य ठरेल?

इतर काही पर्याय असल्यास सुचवावेत.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

17 Dec 2013 - 3:21 pm | बॅटमॅन

टाटा फोटॉन उत्तम आहे. दहा जीबीपर्यंतचा प्लॅन घेतला तर एका महिन्यात आरामात सगळं पुरतं शिवाय रेटही १००० आहे पर महिना.

तिरकीट's picture

17 Dec 2013 - 3:49 pm | तिरकीट

नवीन आलेलं फोटॉन मॅक्स पण बघायला हरकत नाही....

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Dec 2013 - 4:11 pm | लॉरी टांगटूंगकर

भारी आहे की,
एअरटेल येड्यासारखे पैशे कापतं अन् कधीपण कसेपण प्लॅन बदलून कापाकापीला तय्य्यार!!
वैतागून मी बीएसएनएल घेतलं. पुरेसं स्वस्त, अन् झक्कास स्पीड.

ब़जरबट्टू's picture

17 Dec 2013 - 5:10 pm | ब़जरबट्टू

अगदी उलट अनुभव आहे.,
एअरटेल चा प्लान मागच्या २ वर्षापासुन वापरत आहे, पुण्याला बरं का … आयतागत रडवले नाही. सर्विस तर मस्त आहे. आणि प्लान बदलतात, पण सहसा त्याचा पैशात स्पीड वाढलेली असते. :))

तुषार काळभोर's picture

18 Dec 2013 - 11:53 am | तुषार काळभोर

एयरटेलचं ४जी पन किंमत अन् स्पीड ने चांगलं आहे..

नित्य नुतन's picture

17 Dec 2013 - 3:25 pm | नित्य नुतन

आम्ही सध्या रिलायंस 3G वापरतो ..
स्पीड चांगला आहे ... हो पण online movie वगैरे नाही झेपत त्याला ...

ब़जरबट्टू's picture

17 Dec 2013 - 5:06 pm | ब़जरबट्टू

मला वाटते, खालील उपाय करून पाहता येईल :-

१) प्रत्येक कंपनीचे प्लान चेक करा. जे मस्त वाटतील त्या कंपनीच्या कार्ट्याला वायरलेस डाँगल घेऊन घरी बोलवा व स्पीड चेक करा. ( त्यातल्यात्यात बावधान खड्ड्यात आहे :)) . मगच निवडा.
२) माझ्यामते हाथवे पोहचलेय तिथे, परत एकदा चेक करा, स्पीड बेस्ट्च
३) वापर जर 2GB पेक्षा कमी असेल, तर सरळ फोनवर ३G घ्या, व फोन WiFi हॉट स्पॉट म्हणुन वापरा.
४) Reliance वायरलेस डाँगल चांगले आहे. इतर अनुभव नाही.

तिरकीट's picture

17 Dec 2013 - 5:52 pm | तिरकीट

तिकोणाचा पर्याय बघा!
त्याचाही अनुभव चांगला आहे...

संजय क्षीरसागर's picture

17 Dec 2013 - 11:35 pm | संजय क्षीरसागर

सगळीकडे सर्वकाळ उत्तम चालतो आणि प्रायवेट कंपन्यांसारखी फसवाफसवी नाही

खटपट्या's picture

18 Dec 2013 - 2:20 am | खटपट्या

टाटा फोटोन चा अनुभव अतिशय चांगला आहे. जिथे टाटा चा मोबाइल चालतो तिथे टाटा फोटोन दणदणीत चालते असा स्वानुभव आहे. अगदी तळकोकणात हि चालतो.

बुडबुडा's picture

18 Dec 2013 - 2:03 pm | बुडबुडा

आयडिया ३जी अजिबात नको.
ते आपल्यावरच आयडिया करतात..रेन्ज अजिबात येत नाही आणि पैसेहि फार घेतात..घेऊन पस्तावलो :(

मी गेली ३ वर्षे रिलायंस चे नेट कनेक्ट प्रवासात सोयी साठी वापरत होते. पण त्याचा स्पीड खूप सुमार वाटला. शिवाय प्लान्स खर्चिक होते. त्यामुळे कंटाळून नुकतेच कोण्त्याही नेट्वर्क प्रोव्हायडरचे सिम कार्ड टाकता येइल असे हुवेइ कम्पनीचे डेटा कार्ड घेतले. त्याचा फायदा असा कि आपल्याला कोणत्याही एकाच नेटवर्क प्रोव्हायडर च्या प्लान्स वर विसंबुन राहावे नाही. जोपर्यन्त आपल्याला एखादा प्रोव्हायडर आवडेल व परवडेल तोपरेन्त त्याचे सिम वापरावे…. आणि जर काही दिवसांनी दुसर्या कुणी अधिक चांगले प्लान्स ऑफर केले तर आपण फक्त नवीन सिम घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो . डिव्हाईस मध्ये परत गुंतवणूक करण्याची गरज नाही. शिवाय अशा डिव्हाईस मध्ये खूप प्रकार उपलब्ध अहेत.
मला आवडलेला फायदा म्हणजे जर कधी फोन चे चार्जिंग संपले तर सिम कार्ड त्यात टाकून ल्यापटोप वरून फोन करणे व घेणे शिवाय एस एम एस करणे इत्यादी शक्य अस्ते.
आणि एअरटेल कार्ड टाकल्यावर ३G स्पीड सुद्धा समाधान कारक वाटला.
फ्लिपकार्ट वर अशी अनेक डाटा कार्डे परीक्षणासह उपलब्ध आहेत.

- जयंती

पैसा's picture

19 Dec 2013 - 5:04 pm | पैसा

माझ्याकडेही असले एक हजारभर रुपयांचे डाटाकार्ड आहे. त्यात कोणतेही सिम घालून प्रवासात वापरत आहे.

मला धन्यवाद म्हणायचे राह्यले पैसाताई ;-)

पैसा's picture

19 Dec 2013 - 7:11 pm | पैसा

जी टॉकवर म्हटले होते. आता इथे पण म्हणते!! धन्यवाद अभ्या!!

सावधान! बावधन येथे टाटा फोटॉन स्लो चालतं. अन्य ठिकाणी हा प्रॉब्लेम आला नाही.
बावधला महाग असलं तरी रिलायन्सला पर्याय नाहि असं दिसतंय!

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.. सध्या सर्व उपलब्ध पर्यायांची गूगलणी चालू आहे.

आदूबाळ's picture

22 Dec 2013 - 4:25 pm | आदूबाळ

गुरूघंटाल, दहा शेजार्‍यापाजार्‍यांकडे ते नेट कसं आणतात (वायर्ड, डाँगल, मोबाईल हॉटस्पॉट) अशी चौकशी करा. कुठे कशी रेंज येते याची माहिती ते नक्की देऊ शकतील.

प्रत्येक मजल्यावर वायफाय नेटवर्क शोधा. सर्वात जास्त नावं ज्या नेटवर्कची सापडतील ते डोळे मिटून घ्या.

विस्डम ऑफ क्राऊडस.