कला
डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल
सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ...
पृथ्वी उवाच
पृथ्वी उवाच....
तलखी ने कासावीस हा जीव,
दाह घेई सर्वांगाचा ठाव,
उदरात घुसमटे बीजांचा जीव,
निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव.
आक्रमू दे आकाश हे जलदांनी,
येऊ दे रे आभाळ हे भरूनी,
लखलखत्या विद्युल्लतानी,
रणसंगर होऊ दे ह्या गगनी.
घननीळ बरसता बेधुंद,
मेदिनीस कस्तुरी सुगंध,
जीवनामृत शोषितील ही रंध्र,
भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध
डोळ्यात आणोनि प्राण,
विनविती माझे पंचप्राण,
मेघराजा तुजला माझी आण,
दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण.
© श्रेया राजवाडे, जुन 2019
ऑफिसात जाऊन आलो
ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो
जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो
होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?
पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.
मूळ पेरणा
इथे आहे
(काय करून आलो)
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
सुपरनॅचरल - इंग्रजी मालिका
इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल
साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं ..
" 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात "
चाची ४२०
चाची ४२० तसा जुना चित्रपट आहे , टीव्हीवर अनेकदा लागून गेला आहे ... बहुतेक लोकांनी किमान एकदातरी पाहिला असेल असं वाटतं ... मीही बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता आवडलाही होता पण 1 - 2 आठवड्यांपूर्वी युट्यूब वर पाहिला आणि त्यांनतर मधले मधले सीन असे काही वेळा पाहिले गेल्या 1 - 2 आठवड्यात ... आजच तो ज्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे तो अव्वाई शानमुगी पाहिला .
दोन्ही चित्रपट मिसेस डाऊटफायर या इंग्रजी चित्रपटावर आधारीत आहेत . मिसेस डाऊटफायर मागेच कधीतरी पाहिला होता .
|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील.
या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो. तसेच आज आग्र्याच्या किल्ल्यात ती जागा कुठे आहे, ब्रिटिश काळात त्या जागेचे काय झाले हे ही आपल्याला समजते आहे.
शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान
आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य!
(हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)
श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण
मंडळी, नमस्कार!
श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण!
"मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत....
श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!
तो सावळा, श्रीरंग..!
त्या श्यामरंगात रंगलेल्या..
काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल?
काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला?
प्रत्येकीचा कृष्ण निराळा..
प्रत्येकीचा प्रश्न निराळा..
त्या प्रश्नांचा रंग...
श्यामरंग...
त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!
एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार!