डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल
सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ... बहुसंख्य डेमन्स जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचे डोळे पूर्ण काळे होतात ...
सुपरनॅचरल मालिकेमध्ये क्रॉसरोड्स डेमन डील ही संकल्पना बऱ्याचवेळा वापरली आहे ... क्रॉसरोड्स डेमन्स हे हेल / नरकाचे कर्मचारी दाखवले आहेत .. त्यांचे वरचे अधिकारी म्हणजे पुरातन अधिक शक्तिशाली असे डेमन्स , त्यात प्रिन्सेस ऑफ हेल , क्नाईट्स ऑफ हेल वगैरे श्रेणी आहेत .. क्रॉसरोडस डेमन्सचे डोळे लाल असतात तर पिवळे डोळे असलेले फक्त 4 डेमन्स आहेत - प्रिन्सेस ऑफ हेल - नरकाचे राजकुमार , त्यांचं बाकीच्या सगळ्या डेमन्सवर नियंत्रण असतं ...
क्रॉसरोड्स डील म्हणजे ज्या माणसांना या प्लँचेट , स्पिरिटना आवाहन करणे , जुनी चेटूक , तंत्रमंत्र शिकवणारी पुस्तकं किंवा ऐकीव माहितीवरून या सैतानी गोष्टींमध्ये गती आहे ते लोक यश / एखादी इच्छित वस्तू मिळवा आहे 2 - 3 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन डेमनला आवाहन करू शकतात ... त्याची पद्धत म्हणजे अशा 2 -3 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी मध्यभागी ( अर्थातच अशी जागा शहरी भागात नाही तर जिथे अजून काँक्रीटचे रस्ते झाले नाहीत अशाच ठिकाणी असते ) एक लहान खड्डा खणून त्यात एका लहान पेटीत आपला फोटो , काही नाणी , इतर काही वस्तू उदा . विशिष्ट झाडाची फुलं किंवा विशिष्ट प्राण्याचं विशिष्ट हाड आदी घालून त्या खड्ड्यात पुरतात ..... काहीवेळा आवाहनाचा ठराविक मंत्र उच्चारावा लागतो .
हे केलं की क्रॉसरोड्स डेमन तिथे हजर होतो ... हे डेमन्स बहुधा तरुण सुंदर मुलींची शरीरं वापरतात ( म्हणजे पझेस करतात ) .... डीलमध्ये अमाप पैसा , टॅलेंट किंवा काहीही एक गोष्ट मागता येऊ शकते . डील / करार पक्का करण्यासाठी त्या डेमनचं चुंबन घेणं हीच पद्धत आहे .... एखादेवेळी मुलगी नसली आणि पुरूषाचं शरीर असेल तरीही त्याशिवाय पर्याय नाही .
पण हा करार करून मिळवलेली ती गोष्ट उपभोगण्यासाठी फक्त 10 वर्षं मिळतात . आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला आपला आत्मा विकावा लागतो . म्हणजे ती गोष्ट मिळाल्यानंतर 10 वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू होणार .... त्या व्यक्तीला मारण्यासाठी नरकातले क्रूर राक्षसी कुत्रे / हेलहाऊन्ड्स पाठवले जातात ... आणि ते शरीर रक्तबंबाळ करून मृत्यू झाल्यानंतर आत्म्याला / सूक्ष्मशरीराला धरून नरकात नेतात ...
डीलची 10 वर्षं संपल्यानंतर काय होणार याबद्दल डील करणाऱ्यांना माहीती नसेल तर ती माहिती द्यायला क्रॉसरोड्स डेमन्स बांधील नसतात ... एखादा डेमन अशी जितकी डील्स महिन्याला करेल त्यावर त्याला मिळणाऱ्या सवलती वगैरे असतात ... त्यासाठी हे डेमन्स असं डील करण्यासाठी उत्सुक / डेस्परेट असणारी माणसं शोधून त्यांना मोहात पाडतात ..
उदा . या मालिकेत काहींनी केलेली डील्स म्हणजे -
एका सामान्य डॉक्टरने सर्वाधिक यशस्वी सर्जन बनण्यासाठी डील केलं , तो रातोरात टॅलेंटेड झाला . तसंच एका सामान्य आर्किटेक्टने यशासाठी डील केलं तो नावाजलेला कुशल श्रीमंत आर्किटेक्ट बनला .... एका चित्रकाराने मागताना चूक केली आणि श्रीमंतीऐवजी टॅलेंट मागितलं , तो उत्कृष्ट चित्रं काढू लागला पण ती खरेदी करण्यात कोणाला रस नव्हता त्यामुळे तो गरिबीतच राहिला ... एकीने आपली आजारी आई मृत्यू पावू नये म्हणून तर एकाने आपली प्रिय पत्नी कँसरमधून बरी व्हावी म्हणून 10 वर्षांचं डील करून आत्मा विकला .
हा असा विकलेला आत्मा हेलच्या राज्यकर्त्यांच्या प्रॉपर्टीखाली येतो ... जितके आत्मे अधिक तेवढी त्यांची शक्ती वाढते .... यातल्या बहुतेक आत्म्यांना टॉर्चर करून डेमन्स बनवलं जातं ...
या मालिकेत पत्नीच्या मृत्यूनंतर जॉन सुपरनॅचरल गोष्टींना शोधून मारणारा हंटर बनतो ... त्यात डेमन्सही येतात ... डेमन्सना ठार मारण्याचा मार्ग जॉनला माहीत नाही , पण त्यांना डेमन ट्रॅपमध्ये अडकवता येतं आणि लॅटिनमधला एक्सॉर्सिजम वाचून परत नरकात पाठवता येतं , जिथून परत यायला त्यांना बराच वेळ आणि कष्ट पडतात ...
त्याच्या पत्नीला मारणारा नरकाच्या चार प्रिन्सेसपैकी एक असलेला अतिशय शक्तिशाली असा डेमन आहे ... त्याचं नाव समजेपर्यंत त्याला यलो आईड डेमन या नावाने संबोधलं जातं ... त्याच्यावर एक्सॉर्सिजमचा काही परिणाम होणार नाही ..... जॉन त्याला मारण्याचा मार्ग शोधण्याच्या बराच जवळ पोहोचला आहे ... त्याला पूर्ण ठार मारू शकेल अशी एकमेव गन जी काही शतकांपूर्वी बनवली गेली होती आणि त्यानंतर बराच काळ बेपत्ता होती ती शोधून काढण्यात तो यशस्वी झाला आहे ...... अशा वेळी डेमन्स जॉन आणि त्याची मुलं सॅम आणि डीन यांच्या गाडीचा अपघात घडवून आणतात ... डीनला गंभीर इजा होते ... त्याला वाचवण्यासाठी जॉन स्वतः त्याच यलो आईड डेमनला आवाहन करून त्याच्याशी डील करतो ... डीनला वाचवण्याच्या बदल्यात गन त्या डेमनला द्यावी लागते शिवाय जॉनचा आत्मासुद्धा . त्याला 10 वर्षंपण मिळणार नाहीत ... डीन बरा झाला की लगेच जॉनचा मृत्यू होणार .... पण जॉन ते डील स्वीकारतो ....
तिकडे जबरदस्त दुखापत झालेला डीन आऊट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स घेत असतो ....
https://youtu.be/1ic1AvlP1bo
त्याला मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार करायला आलेली रिपर / मृत्यूनंतर आत्म्याला न्यायला आलेली कर्मचारी एंजल त्याला समजावत असते .... त्याचवेळी यलो आईड डेमन म्हणजे तिने धारण केलेल्या शरीराचा ताबा घेऊन डीनला परत आपल्या शरीरात पाठवतो ,
https://youtu.be/h5j2JF_6Abg
त्याच्या सर्व इंटर्नल जखमा भरून आलेल्या असतात .. त्यानंतर डीनशी बोलून झाल्यानंतर काही वेळाने जॉन मृत अवस्थेत सॅमला आढळतो ....
https://youtu.be/xQSKQFz_MQw
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक परिचय
धन्यवाद ....
डेमन्स
पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी
पण भीती वाटलीच नाही ...
पॅ ऍ १ चांगला होता पण बाकीचे
चौरस्त्यावर भानामती
टोमणा नाही ना मारत आहात ?
+1
पुर्वी 'श्री' नावाचे पाक्षिक कम टॅबलाॅइड यायचे त्यात अशाच
टोमणाच मारतोय
वा आपण देवाला मनोरंजन
तसं असतं तर ....
सध्या चर्चा आपल्या मुद्यावर चालू आहे
असो मला वाटते माझ्या भावनांचे पुरेसे स्पष्टीकरण मी दिलेले आहे
जोवर लोक या गोष्टी
भीती वाटतीये आता एवढं डेंजर
जादूटोणाविरोधी विधेयक
कल्पनारंजन व कायदा
ठोssss! पडलो, फुटलो वगैरे वगैरे वगैरे.... :D
- तुम्हाला निशापरी यांचा धागावाचणे बंधनकारक आहे का ?
नाही, हि गोष्ट पूर्ण ऐच्छिक आहे, इथेच आपले शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक शोषण होत नाही हे सुस्पष्ट आहे. तुम्ही त्या जे सांगतात ते सत्य माना अथवा दुर्लक्ष करा हा संपूर्णपणे आपल्या अभिव्यक्ती चा भाग आहे, शोषण नाही. शोषण = अंधश्रद्धा as simple as it is. याधाग्यात कुठेही आपला अपमान तर सोडाच निदान तुमच्या परवानगी शिवाय तुमचा सुस्पष्ट उल्लेख तरी आहे का ? मग कायद्याचा विषयच संपला... कोर्ट एंटरटेनही करणार नाही. हयात काही शंका नसतील तर पुढे चर्चा चालू ठेवू... ...फक्त डॉक्टरांनी सैतानाशी करार केला होता हे जरी विनोदाने केलेले विधान असले तरी त्याचा मॅग्नेट्युड त्यांच्या अंतापर्यंत पोचतो म्हणून ते विधान मनाला व्यथित करते हे समजून घ्यावे.कल्पनारंजक लेख व खरीखुरी कारवाई
"आपला" हा शब्द केवळ फक्त
Conjuring Universe