अनुभव

स्मृतीची पाने चाळताना: एक

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
21 Jun 2020 - 11:12 am

शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.

साहित्यिकव्यक्तिचित्रणलेखअनुभव

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
4 Jun 2020 - 10:38 am

रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच,
"श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

राहणीराहती जागाव्यक्तिचित्रलेखअनुभव

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ३ - त्रिकुट , त्रिशंकू

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
25 May 2020 - 8:31 pm

अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला?

राहती जागाव्यक्तिचित्रलेखअनुभव

कोरोनासोबत जगायचे आहे...!

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 2:57 pm

लॉकडाउन म्हणायलाच तेवढा राहिलाय. दैनंदिन रूटीन हळूहळू वळणावर येतंय. टीव्ही चॅनल्स चा धोशा आता कुणी फारसा मनावर घेत नाहीयेत. रेल्वे एष्ट्या सुरु झाल्या आणि आतापर्यंत लॉकडाऊन असलेल्या कोरोनाला पाय फुटू लागलेत. आतापर्यंत बंद डब्यात असलेल्या लहानलहान गावांतून कोरोना रूग्ण वाढू लागलेत.
आमच्या गावातही ४-५ निघाले.
आता तर सगळेच व्यवहार सुरु झालेत. सगळे म्हणतात, खबरदारी घ्या.

समाजअनुभव

कृतघ्न -7

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 11:06 am
साहित्यिकसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारसमीक्षालेखअनुभवमतमाहितीसंदर्भचौकशीमदतआरोग्यविरंगुळा

जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
16 May 2020 - 12:56 am

फारच निराशा वाटतेय आज
आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले
आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे
सामान संपत चालले आहे
सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही
अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय
सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत
काय होणार कळत नाही

******************************

जीवनमानप्रकटनप्रतिसादअनुभवमाहिती

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २

वेदांग's picture
वेदांग in जनातलं, मनातलं
12 May 2020 - 6:06 pm

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938

=========================================

नर्मदे हर

कथाअनुभव

फडफडणारा पक्षी आणि वातावरण

Harshal Kulkarni's picture
Harshal Kulkarni in जनातलं, मनातलं
9 May 2020 - 1:31 pm

मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो!
अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो!

शिक्षणअनुभव

पोपटाचा दिवस

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in जनातलं, मनातलं
7 May 2020 - 3:05 pm

दुपारच्यावेळी आम्हा पोरांचा खेळ ऐन भरात आलेला होता. गावातले बहुतांश लोक शेतात गेल्याने आमच्या आवाजाव्यतिरिक्त गल्ली तशी शांत होती. जेवणासाठी ज्याला त्याला आपापल्या घरून बोलावणे येऊन गेलेले होते. पण पुढचाडाव झाल्यावर जाऊ, असे म्हणत सगळेजण रंगात आलेला गोट्यांचा खेळ पुढे नेत होते. तेवढ्यात मांजरीचा ओरडण्याचा आणि पक्षाच्या किंचाळण्याचा कर्कश आवाज कानावर आला. वळून पाहिले तेव्हा आमच्या वाड्यातल्या लिंबाच्या झाडावर काहीतरी झटापट झाल्याचा अंदाज आला. तसेच आम्ही ताडकन आठ दहा जणं तिकडे धावत गेलो. आम्ही पोहोचलो आणि तेवढ्यात झाडावरून एक पक्षी खाली फडफड करत पडला.

बालकथाअनुभव