मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो!
अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो!
Semester चे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे introduction मध्ये सर विषयाचा significance आणि importance अनेक उदाहरणातून समजावून देत होते! विषयांतर होता-होता 'मौसम विभागाचे अंदाज' याकडे विषय घसरला! (सहज सांगावेसे वाटते, कि अशा विषयांतराला भालवणकर सरांच्या तासाला पूर्ण मुभा असे! 'त्यामुळं सामूहिक चिंतन होतं', असं त्यांचं मत होतं! मला ते निःसंशय पटलंय! असो!) आम्हा विद्यार्थ्यांचा सरळ प्रश्न होता कि, 'अशा technology च्या वापरातून आपण weather prediction accurately का करू शकत नाही? मौसम विभागाचे अंदाज एवढे काहींच्या-काही का निघतात? (काही वर्षांपूर्वी अंदाज आजच्या तुलनेत लक्षणीयरीत्या चुकत!)' सरानी त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर असं होतं कि. 'एखादा पक्षी युरोप मध्ये फडफडला, की सांगलीतील वातावरण बदलावं एवढे वातावरणातले बदल complicated असतात! कुठल्याही technology च्या वापरातून 100% accurately prediction शक्य नाही!'
आम्ही विद्यार्थी त्यावेळी हसलो होतो! किरकोळ फडफडणारा पक्षी वातावरण कसं-काय बदलेल!? आम्हाला वाटलं होतं, सरानी प्रश्नाला बगल दिली, आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरून ते पंचक्रोशीत सुपरिचित असूनही त्यांना या आमच्या प्रश्नाचे उत्तर आले नाही!
झालं, lecture पुढे सरकलं, आणि आम्ही हा प्रसंग विसरूनही गेलो!
पण, सर योग्य होते! चीन मध्ये फडफडलेल्या वटवाघुळाचा प्रताप आपण पाहतोच आहोत! फक्त वातावरणीय नव्हे, तर आर्थिक, वैद्यकीय, सामाजिक, मानसिक, राजकीय आणि इतरही सर्वच अंदाज त्यामुळेच बदलत नाहीयेत का?
प्रतिक्रिया
9 May 2020 - 2:59 pm | सिरुसेरि
यालाच "द बटरफ्लाय इफेक्ट" असे नाव असावे . छान आठवण .
9 May 2020 - 8:48 pm | योगी९००
छान...
मी पण वालचंद सांगलीलाच मॅकॅनिकलला शिकलो.. १९९५ ला पास झालो.