शेजारील काकी
शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही.
शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही.
वेळ- सभेचा दिवस
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.
... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!
साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
इतरवेळी करतो तसा जनरल डब्यातून कोकणरेल्वेचा प्रवास यावेळी मुददामून टाळला, हा इतरवेळचा प्रवास म्हणजे धावत जात गाडी पकडणं नव्हे किमान कोकणरेल्वेसाठी तरी नाही….म्हणजे अजून इतरवेळचा प्रवास म्हणजें काय तर….इथं जर रात्री अकराची मंगलोर गाडी आणि त्यातही जनरल डबा ठाणे रेल्वेस्टेशनवरुन पकडायचा असेल तर लोक नंबर कधी लावतात फॅल्टफार्म नंबर पाच वर…… आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता….
इसवी सन: २००६-०७
आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल.
आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको.
तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं.
हे असं होतंच म्हणजे.
काही इलाज नव्हता त्याला.
कारण प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सामुदायिक थापेबाजीचा, किंवा तोंडात सामूहिक गुळणी धरून इज्जत काढून घ्यायचा एक महोत्सव भरायचा, ज्याला ते लोक 'ओरल्स' म्हणायचे...
आज ऑफिस कामातून कम्पलसरी सुट्टी घ्यायची होती. लॉकडाउन काळात एम्प्लॉयी वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे, सुट्टीच घेत नाही, हे मॅनेजमेंटच्या लक्षात आले. तेव्हा एक दिवस कम्पलसरी सुट्टीचा नवीन नियम लागू झाला. हे कंपल्शन एम्प्लॉयी, की एम्प्लॉयर कोणच्या हिताचे, यावर फाटे पाडल्यापेक्षा, दोघांनाही एक दुसऱ्यापासून, एक दिवस मुक्ती, आराम, एक दुसऱ्यासाठी बाळगलेली काळजी, असे समजून "इट्स विन विन सिच्युवेशन फॉर बोथ" असे मानायला हरकत नाही. मग आजचा दिवस काही मार्गी लागतो की नाही ते बघायला हवे.
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच,
"श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.