शेजारील काकी

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
12 Jul 2020 - 2:26 pm

शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही.

काकू मूळच्या कोकणातील. फणस जसा बाहेरून कडक आणि काटेरी, पण आतमध्ये एक्दम गुळगुळीत, कोमल तस काकूंच मन. सोसायटी मधील कुठेलेही काम असू देत. मदत करायला काकू सगळयांचा पुढे. कोणाकडून कशी कामे करून घ्यायची यात काकूंचा हात कोणी धरू शकणार नाही. कोणताही नोकर असो, की अधीकारी असो, त्याला त्याच्या कामाची जाणीव करून देणे हे काकूंचे काम. सोसायटी स्वच्छ, निरोगी कशी राहील याची नेहमी काळजी करणारे वक्तिमत्व.

काकूंचे आणखी वैशिष्ठये म्हणजे त्या फार रुचकर जेवण बनवितात. अन जेवण म्हणजे थोडे थोडे नाही तर पंचिवस, तीस चपाती रोज बनवितात. आमच्या कडच्या स्वारी ने हे ऐकल, तर चक्कर येऊनच पडणार. पुरणपोळी, भाकरी, दोन तीन प्रकारच्या भाज्या एक्दम राजेशाही थाट. अशांत त्यातला वाटा आम्हाला मिळणार नाही हे शक्यच नाही. आणी बर का, वाटा म्हणजे खारुताईचा घास नव्हे, तर आम्हा तिघांचेही पोट अगदी मनसोक्त भरेल एवढे देतात. काळा वाटाणा, कोंबडी वडे, पुरणपोळी, तांदळाची भाकरी काय काय, एक से एक चवदार पदार्थ. एकदा तर मोठा ग्लास भरून गरमागरम तांदळाची पेज दिली. एक्दम चविष्ट आणि हेल्दी. कधी त्याना कळले की मी नॉनव्हेग खातो. मग काय काकूंनी मालवणी पद्धतीचे राजभोग थाळीच मला दिली. मी दोन्ही वेळ त्याचा मनसोक्त आस्वाद घेत फारशा पाडला. माझी क्षमता एवढे नॉनव्हेज खाण्याची नसल्यामुळे आणि प्रेमाने मला दिलेला माझा वाटा मला कुणालाही वाटायचा नसल्यामुळे, तसेच ते वाया घालवणे मला पटत नसल्यामुळे, मग मीच काकींना सांगितले की आता मी नॉनव्हेज बंद केले. खरंच मी आता नॉनव्हेज बंद केलय.

आजकालची नवीन पिढी केक, डोसा, चकली बनवतात, त्या सगळ्यांना पण काकी मागे टाकतात, ते सुद्धा ओव्हन, मायक्रोवेव्ह न वापरता, कुकर किंवा आणखी काही घरगुती उपाय करून. मऊ, स्पॉंजि केक, कुरकुरीत चकल्या एक नंबर. आम्ही पण मग काकींना काही तरी आम्हाला जमेल ते देतो आणि काकींना ही ते फार आवडते. काही सुधारणा असल्यास त्या लगेच सांगतात, आणी काही आवडले तर रेसिपी नक्की विचारायला येतात, मिसळ, सांबर हे आमच्या कडील त्याचे आवडते पदार्थ.

आमच्या कडील मसाले विदर्भ पद्धतीचे असल्यामुळे तेही त्यांना खूप आवडतात. मी अमरावतीला गेलो की काकूंसाठी हीच प्रेमाची भेटवस्तू आणतो. मला जेवण बनविता येत म्हूणन मी youtube ला वीडियो टाकतो. पण काकूचे बनविले पदार्थ माझ्या सगळ्या व्हिडिओला किती तरी मागे टाकतात. पावसाळ्यात मिळणारी पावसाळी भाजी एकदा त्यानी दिली. भाजीला काय चव वा. मी लगेच बाजातून ती भाजी आणून, ती कशी बनवायची ते काकू कडून शिकून घेतले.

काल आरु, काकूंचा दीर त्याचा ६५ वा वाढदिवसाच्या निमित्ताने काकूने पुरणपोळी आणि मसाले भात बनविला. मग आमचा वाटा येणार नाही ते तरी कसे शक्य होते. पाच मोठ्या पुरणपोळी, मसाला भात आणि काजूकातली. वा काय ते बहरलेलं ताट बघून आम्ही तिघेही तुटून पडलो आणि भरपूर आस्वाद घेत दहा मिनिटात सगळा पाहुणचार गडप केला. आज मग रिटर्न गिफ्ट म्हूणन आरुला मस्त मसाले डोसे आणी सांबर बनविला. या वेळी आम्ही पण काकू देतात तेव्हढे देण्याचा पूर्ण प्रयन्त केला.

खरच म्हणतात ना खरा आनंद हा देण्यात असतो ते मला आता कळतंय आणि कदाचित काकूंनी कळतं नकळत आम्हाला पण त्याचा वागणुकीतून ते शिकवलंय.
देवा असा मायेचा शेजार सगळ्यांचं लाभो आणि काकूंचे आयुष्य असेच उदंड आणि आनंदात जावो.

धन्यवाद.

जीवनमानराहणीराहती जागाअनुभव

प्रतिक्रिया

प्रमोद पानसे's picture

13 Jul 2020 - 11:46 am | प्रमोद पानसे

अपेक्षा भंग झाला..

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2020 - 4:37 am | टवाळ कार्टा

=))

तुषार काळभोर's picture

18 Jul 2020 - 12:00 pm | तुषार काळभोर

..

अभिजीत अवलिया's picture

18 Jul 2020 - 9:25 pm | अभिजीत अवलिया

:)

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 7:54 am | प्राची अश्विनी

काकी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

किती छान शब्दशिल्प उभं केलंत. काकी अगदी समोर उभ्या राहिल्या.

वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या / प्रांतातल्या जेवणांंच्या वेगवेगळ्या चवींंची "रसपूर्ण" आठवण आली या काकींमुळे!