मंगलाष्टक वन्स मोअर - पाणचट टू द कोअर!
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता.