आपण ग्रेट आहोतच !
१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.