✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोजागिरी स्पेशल

प
प्यारे१ यांनी
Fri, 10/18/2013 - 16:29  ·  लेख
लेख
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर ) तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि दूध मसाला (२५ रुपये तोळा) (स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या) संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे. कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल. दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये. बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे. (बसायची म्हणजे बसायची, लोळणे नाही.) दूध अधिक गरम हवे असल्यास एका ग्लास मागे ४ रुपये अधिक द्यावे लागतील. ग्लास आपापले आणावे. ग्लास स्टीलचा असला तर व्यवस्थित पकडावा. गरम दुधाने हात भाजल्यास नि दूध सांडल्यास आम्ही जबाबदार नाही. बिअरचा ग्लास आणू नये. पडला तर फुटतो, काचा पायात घुसण्याची शक्यता असते. दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या मिळतील. कोजागिरीनिमित्त्य दूध पिण्याचाच कार्यक्रम होईल. भेळभत्ता हवा असल्यास आमच्याकडे फरसाणा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, कुरमुरे मिळतील. दर चौकशी करुन घ्यावा. वर्तमानपत्राचे कागद घरुन आणावेत. बाकी कार्यक्रम आपापल्या जागी करावेत. गाणी वाजवाय ची असल्यास आपल्या घरुन टेपरेकॉर्डर अथवा कॉम्प्युटर आणून रात्री ८.३० नंतर ९.५५ पर्यंत वाजवावीत. लाईट कनेक्शन मिळणार नाही. ९.५५ ला एक, ९.५७ ला एक नि ९.५९ ला एक असे तीन वेळा आवाज बंद करण्याबाबत मिसकॉल दिले जातील. १० नंतर टेपरेकॉर्डर काँप्युटरचा आवाज झाल्यास १५१ रु. दंड सोसायटी मध्ये भरावा लागेल. माणसांचे कमी आवाजात बोलण्याचे आवाज चालतील. भसाड्या आवाजात गाणी म्हणू नयेत. तोंडाव्यतिरिक्त आवाज व इतर प्रदूषण करु नये. कोजागिरीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8229 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

वाईकरांचा हा पुणेरी धाटणीचा

भावना कल्लोळ
Fri, 10/18/2013 - 16:40 नवीन
वाईकरांचा हा पुणेरी धाटणीचा लेख खुसखशीत झाला आहे.
  • Log in or register to post comments

वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 16:59 नवीन
वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख आवडला. अवांतरः एका वाई/सातारकराने ४४ ला "चौरेचाळीस" म्हटल्याने अम्मळ हळवा झालो. ही नाशिककरांची मक्तेदारी असे आम्ही समजत असू.
  • Log in or register to post comments

सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 17:02 नवीन
सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून केलेला 'क्षीण' प्रयत्न. खरंतर खरड फळ्यावर टाकणार होतो शुभेच्छा. हळू हळू वाढत गेलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

छान

अभ्या..
Fri, 10/18/2013 - 17:06 नवीन
भेळभत्ता टायपून पंढरपुरकराना खुश केलं दिसतंय ;) असो. प्यारेसाहेब बरेच फिरुन लांबवर पोहोचलेले आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

भेळभत्ता?

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 18:14 नवीन
म्ह्ञ्जे नक्की काय? कधीकाळी ही संज्ञा ऐकल्याचे आठवते परंतु जालजराजर्जर जाहल्याने आठवणेस अडचण येत आहे, तरी कृपया याजवर ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे

अनिरुद्ध प
Fri, 10/18/2013 - 18:22 नवीन
आपल्याला विजेरी हा शब्द अभिप्रेत आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये.

अभ्या..
Fri, 10/18/2013 - 21:36 नवीन
आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये. नुसता भत्ता हां शब्द पंढरपुर भागात वापरत. नुसते चुरमुरे (भदंग किंवा चिवडा वाले नाहित) घेउन त्यावर गोडे तेल काळा मसाला आणि तिखट मिठ टाकणे. सर्व चुरमुरे असे चोळणे की प्रत्येक चुर्मुर्याला मसाला लागला पायजे. अगदीच शौक म्हणजे शेङ्गादाणे व् फ़रसाण. :-D पंढरपुर येथे सगळे श्रम परिहार या भत्यावरच होत. अगदी हापिस, कट्टे, चौकात सुद्धा एखादे वर्तमानपत्र पसरून हां कार्यक्रम साजरा होई. :) हे असे भत्त्याचे चुरमुरे बार्शी पंढरपुर भागातच मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अच्छा तसंय होय? हे तर

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 21:43 नवीन
अच्छा तसंय होय? हे तर बङ्गाली "झाल मुरी" सारखंच दिसतंय की!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अब्या तु मला सांगितलं नैस ,

जेनी...
Fri, 10/18/2013 - 22:01 नवीन
अब्या तु मला सांगितलं नैस , तु कंपु बिंपू केलाय्स ते :-/ कट्टी बाबा तेरी मेरी यारी न कंपुत गेली दुनियादारी :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१ टु ब्याटु!

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/18/2013 - 22:16 नवीन
+१ टु ब्याटु! अजुन भर- सोसायटी बाहेरच्या येणारास-आमच्या गच्चीतून (आकाशातला) चंद्र पहायचे प्रति माणशी ५ रू . होतील. टीप- आकाश सोडुन इतरत्र चंद्र पहाणेचा प्रयत्न केल्यास , त्यासह अचानक चांदण्या दाखविण्याचि व्यवस्था करणेत आली आहे. (याचि नोंद घ्यावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ अ. आ.

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 22:18 नवीन
लय भारी हे अस्सल पुणेकरच लिहू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आम्ही निव्वळ कोजागिरीच्या

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 22:20 नवीन
आम्ही निव्वळ कोजागिरीच्या चंद्राचाच विचार करीत होतो गुर्जी.... -सपशेल फेल प्यारे१ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मंजि या टायंबाला तुम्चा ईचार

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/18/2013 - 23:01 नवीन
=)) मंजि या टायंबाला तुम्चा ईचार चुक्ला! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

क्रुपया

अनिरुद्ध प
Fri, 10/18/2013 - 17:19 नवीन
कोजागिरी बद्दल काही जास्त माहिती हवी असल्यास श्री प्यारे१ याना त्यान्च्या दुकानात सम्पर्क करावा,तसेच दुधाचा मसाला श्री प्यारे१ यान्च्या दुकानुतनच घेतला पाहिजे (रेसिपी सान्गण्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील),तरी सर्वांनी कोजागिरीच्या मसाला दुधाचे सेवन करणे सक्तीचे आहे,सगळ्याना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आम्ही फक्त बघायला येउ. चालेल

स्पंदना
Fri, 10/18/2013 - 18:09 नवीन
आम्ही फक्त बघायला येउ. चालेल ना? प्यारे१ ते चंद्राच्या चांदण्यात बसायला दिलेल्या जागेचे चार्जेस राह्यले. तेव्हढे लावा आन मग जावा कुणीकड जायच तिकडे. सर्व मिपाकरांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कोजागिरीच्या दुधाचे (साधे )

कोमल
Fri, 10/18/2013 - 18:21 नवीन
कोजागिरीच्या दुधाचे (साधे ) साइड इफेक्ट झाल्यास श्री. प्यारेंच्या (स्पेशल) औषधांच्या दुकानात संपर्क साधावा. औषधे नेण्यासाठी खाकी पिशवी घरून आणावी. कोजागिरीच्या दुधाचे (जास्तीचे ;) ) साइड इफेक्ट झाल्यास श्री. प्यारे जबाबदारी घेतील अशी आशा करुयात. सगळ्याना कोजागिरी पौर्णिमेच्या साइड इफेक्टलेस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

योग्य ती नोंद घेतल्या गेली आहे....

मुक्त विहारि
Fri, 10/18/2013 - 18:41 नवीन
सर्व मिपाकरांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... प्यारे१ ह्यांना प्रचंड धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त !

धन्या
Fri, 10/18/2013 - 18:56 नवीन
एकदम खुसखुशीत पुणेरी ष्टाईलचे लेखन.
  • Log in or register to post comments

निघायचे ठरवले पण...

अनन्न्या
Fri, 10/18/2013 - 19:08 नवीन
११.४५ पर्यंत पोहोचु शकणार नाही, म्हणून २ लिटर दूध, पाव कि. साखर, दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या याच प्रमाणात घालून ते पेआशन केले जाईल. Image removed.
  • Log in or register to post comments

हरकत नाही

अनिरुद्ध प
Fri, 10/18/2013 - 19:20 नवीन
आधी आम्ही आपण सादर केलेल्या दुधाचे सेवन करु आणि मग प्यारे१ यान्च्या स्पेशल मसाला घातलेल्या दुधाचा आस्वाद घेवु असो दुध उत्तम होते,(केशराचा स्वाद तसेच रन्ग दुध जास्त प्यायला प्रव्रुत्त करणारा होता[प्रकाशचित्रातल्या]),कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

पुणेकर व्हायचा क्षीण प्रयत्न

पैसा
Fri, 10/18/2013 - 21:58 नवीन
पुणेकर व्हायचा आणि ट्यार्पी खेचायचा क्षीण प्रयत्न. किंवा पुणेरी पाट्यांचा अभ्यास अंमळ जास्त झाला असावा. लिखाण खुसखुशीत! (हे कबूल केलंच पाहिजे)
  • Log in or register to post comments

आता ढवळ्या- पवळ्या , वाण -

प्यारे१
Fri, 10/18/2013 - 22:26 नवीन
आता ढवळ्या- पवळ्या , वाण - गुण वगैरे होतंच की थोडंफार! बाकी आम्ही शिकतोय अजून बर्का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

निवेदिता-ताई
Fri, 10/18/2013 - 22:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments

प्यारे काकु आवडेश गं लेख ..

जेनी...
Fri, 10/18/2013 - 22:40 नवीन
प्यारे काकु आवडेश गं लेख ...छान जमलाय गं एकदम !
  • Log in or register to post comments

ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे

सूड
Fri, 10/18/2013 - 22:42 नवीन
ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे बाधते त्यांनी आपापल्या जबाबदारीवर प्राशन करावे. नंतर काही झाल्यास मंडळ जबाबदार नाही.
  • Log in or register to post comments

आणि ज्यांना नाय बादते त्यांची

जेनी...
Fri, 10/18/2013 - 22:46 नवीन
आणि ज्यांना नाय बादते त्यांची जवाबदारी मंडळ घेणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अतिशय उत्तम, सकस आणि

प्रचेतस
Fri, 10/18/2013 - 23:23 नवीन
अतिशय उत्तम, सकस आणि माहितीपूर्ण लेखन.
  • Log in or register to post comments

असं पण असतं काय?

प्यारे१
Sat, 10/19/2013 - 00:14 नवीन
असं पण असतं काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोजागिरिनिमित्त धागा वर काढत

प्यारे१
Mon, 10/26/2015 - 14:36 नवीन
कोजागिरिनिमित्त धागा वर काढत आहे. आमची ही स्कीम बुवांच्या उपरोक्त पुरवणीसह तशेच महागाईभत्त्याच्या वाढीव दरांनुसार सुरु आहे याची नोंद घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments

वो प्यारे भौ

बाबा योगिराज
Mon, 10/26/2015 - 15:46 नवीन
धंदा थोडा मंदा है. कै डिस्को वाल्या उंटाची इस्किम काडा की रॉ.... दुधात आमची बुटी(जड़ी-बुटी वाली बर्का) घातली तर चालन का??? तहानलेला बाबा.
  • Log in or register to post comments

वो प्यारे भौ

बाबा योगिराज
Mon, 10/26/2015 - 15:46 नवीन
धंदा थोडा मंदा है. कै डिस्को वाल्या उंटाची इस्किम काडा की रॉ.... दुधात आमची बुटी(जड़ी-बुटी वाली बर्का) घातली तर चालन का??? तहानलेला बाबा.
  • Log in or register to post comments

दुध एवढे स्वस्त कसे(म्हशिचे

palambar
Mon, 10/26/2015 - 23:48 नवीन
दुध एवढे स्वस्त कसे(म्हशिचे असुन) ?
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

स्वाती दिनेश
Tue, 10/27/2015 - 21:48 नवीन
मसाला दूध मस्त झाले आहे, थोडा छिद्रान्वेषीपणा- फक्त कोजागरी हवे, कोजागिरी नाही.. स्वाती
  • Log in or register to post comments

अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/28/2015 - 00:27 नवीन
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर गाण येत नसल्यास सांगण्याचे पैसे नाही सांगीतलेत ते
  • Log in or register to post comments

अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/28/2015 - 00:28 नवीन
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर गाण येत नसल्यास सांगण्याचे पैसे नाही सांगीतलेत ते
  • Log in or register to post comments

काका, काय हे?

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 00:37 नवीन
काका, काय हे? तुम्हाला काय वाटेल तसं द्या. सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं???? (धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

काका, काय हे?

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 00:37 नवीन
काका, काय हे? तुम्हाला काय वाटेल तसं द्या. सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं???? (धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा