आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर )
तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि
दूध मसाला (२५ रुपये तोळा)
(स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या)
संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे.
कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल.
दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये.
बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे. (बसायची म्हणजे बसायची, लोळणे नाही.)
दूध अधिक गरम हवे असल्यास एका ग्लास मागे ४ रुपये अधिक द्यावे लागतील.
ग्लास आपापले आणावे.
ग्लास स्टीलचा असला तर व्यवस्थित पकडावा.
गरम दुधाने हात भाजल्यास नि दूध सांडल्यास आम्ही जबाबदार नाही.
बिअरचा ग्लास आणू नये. पडला तर फुटतो, काचा पायात घुसण्याची शक्यता असते.
दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या मिळतील.
कोजागिरीनिमित्त्य दूध पिण्याचाच कार्यक्रम होईल.
भेळभत्ता हवा असल्यास आमच्याकडे फरसाणा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, कुरमुरे मिळतील.
दर चौकशी करुन घ्यावा. वर्तमानपत्राचे कागद घरुन आणावेत.
बाकी कार्यक्रम आपापल्या जागी करावेत.
गाणी वाजवाय ची असल्यास आपल्या घरुन टेपरेकॉर्डर अथवा कॉम्प्युटर आणून रात्री ८.३० नंतर ९.५५ पर्यंत वाजवावीत.
लाईट कनेक्शन मिळणार नाही.
९.५५ ला एक, ९.५७ ला एक नि ९.५९ ला एक असे तीन वेळा आवाज बंद करण्याबाबत मिसकॉल दिले जातील.
१० नंतर टेपरेकॉर्डर काँप्युटरचा आवाज झाल्यास १५१ रु. दंड सोसायटी मध्ये भरावा लागेल.
माणसांचे कमी आवाजात बोलण्याचे आवाज चालतील.
भसाड्या आवाजात गाणी म्हणू नयेत. तोंडाव्यतिरिक्त आवाज व इतर प्रदूषण करु नये.
कोजागिरीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
18 Oct 2013 - 4:40 pm | भावना कल्लोळ
वाईकरांचा हा पुणेरी धाटणीचा लेख खुसखशीत झाला आहे.
18 Oct 2013 - 4:59 pm | बॅटमॅन
वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख आवडला.
अवांतरः एका वाई/सातारकराने ४४ ला "चौरेचाळीस" म्हटल्याने अम्मळ हळवा झालो. ही नाशिककरांची मक्तेदारी असे आम्ही समजत असू.
18 Oct 2013 - 5:02 pm | प्यारे१
सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून केलेला 'क्षीण' प्रयत्न.
खरंतर खरड फळ्यावर टाकणार होतो शुभेच्छा. हळू हळू वाढत गेलं. ;)
18 Oct 2013 - 5:06 pm | अभ्या..
भेळभत्ता टायपून पंढरपुरकराना खुश केलं दिसतंय ;)
असो. प्यारेसाहेब बरेच फिरुन लांबवर पोहोचलेले आहेत. ;)
18 Oct 2013 - 6:14 pm | बॅटमॅन
म्ह्ञ्जे नक्की काय? कधीकाळी ही संज्ञा ऐकल्याचे आठवते परंतु जालजराजर्जर जाहल्याने आठवणेस अडचण येत आहे, तरी कृपया याजवर ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे, ही विनंती.
18 Oct 2013 - 6:22 pm | अनिरुद्ध प
आपल्याला विजेरी हा शब्द अभिप्रेत आहे असे वाटते.
18 Oct 2013 - 9:36 pm | अभ्या..
आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये. नुसता भत्ता हां शब्द पंढरपुर भागात वापरत. नुसते चुरमुरे (भदंग किंवा चिवडा वाले नाहित) घेउन त्यावर गोडे तेल काळा मसाला आणि तिखट मिठ टाकणे. सर्व चुरमुरे असे चोळणे की प्रत्येक चुर्मुर्याला मसाला लागला पायजे. अगदीच शौक म्हणजे शेङ्गादाणे व् फ़रसाण. :-D
पंढरपुर येथे सगळे श्रम परिहार या भत्यावरच होत. अगदी हापिस, कट्टे, चौकात सुद्धा एखादे वर्तमानपत्र पसरून हां कार्यक्रम साजरा होई. :)
हे असे भत्त्याचे चुरमुरे बार्शी पंढरपुर भागातच मिळतात.
18 Oct 2013 - 9:43 pm | बॅटमॅन
अच्छा तसंय होय? हे तर बङ्गाली "झाल मुरी" सारखंच दिसतंय की!! :)
18 Oct 2013 - 10:01 pm | जेनी...
अब्या तु मला सांगितलं नैस , तु कंपु बिंपू केलाय्स ते :-/
कट्टी बाबा
तेरी मेरी यारी न कंपुत गेली दुनियादारी :-/
18 Oct 2013 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टु ब्याटु!
अजुन भर-
सोसायटी बाहेरच्या येणारास-आमच्या गच्चीतून (आकाशातला) चंद्र पहायचे प्रति माणशी ५ रू . होतील.
टीप- आकाश सोडुन इतरत्र चंद्र पहाणेचा प्रयत्न केल्यास , त्यासह अचानक चांदण्या दाखविण्याचि व्यवस्था करणेत आली आहे. (याचि नोंद घ्यावी)
18 Oct 2013 - 10:18 pm | मुक्त विहारि
लय भारी
हे अस्सल पुणेकरच लिहू शकतो...
18 Oct 2013 - 10:20 pm | प्यारे१
आम्ही निव्वळ कोजागिरीच्या चंद्राचाच विचार करीत होतो गुर्जी....
-सपशेल फेल प्यारे१ ;)
18 Oct 2013 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
=))
मंजि या टायंबाला तुम्चा ईचार चुक्ला! :P
18 Oct 2013 - 5:19 pm | अनिरुद्ध प
कोजागिरी बद्दल काही जास्त माहिती हवी असल्यास श्री प्यारे१ याना त्यान्च्या दुकानात सम्पर्क करावा,तसेच दुधाचा मसाला श्री प्यारे१ यान्च्या दुकानुतनच घेतला पाहिजे (रेसिपी सान्गण्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील),तरी सर्वांनी कोजागिरीच्या मसाला दुधाचे सेवन करणे सक्तीचे आहे,सगळ्याना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
18 Oct 2013 - 6:09 pm | स्पंदना
आम्ही फक्त बघायला येउ. चालेल ना?
प्यारे१ ते चंद्राच्या चांदण्यात बसायला दिलेल्या जागेचे चार्जेस राह्यले. तेव्हढे लावा आन मग जावा कुणीकड जायच तिकडे.
सर्व मिपाकरांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.
18 Oct 2013 - 6:21 pm | कोमल
कोजागिरीच्या दुधाचे (साधे ) साइड इफेक्ट झाल्यास श्री. प्यारेंच्या (स्पेशल) औषधांच्या दुकानात संपर्क साधावा. औषधे नेण्यासाठी खाकी पिशवी घरून आणावी.
कोजागिरीच्या दुधाचे (जास्तीचे ;) ) साइड इफेक्ट झाल्यास श्री. प्यारे जबाबदारी घेतील अशी आशा करुयात.
सगळ्याना कोजागिरी पौर्णिमेच्या साइड इफेक्टलेस शुभेच्छा.
18 Oct 2013 - 6:41 pm | मुक्त विहारि
सर्व मिपाकरांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
प्यारे१ ह्यांना प्रचंड धन्यवाद
18 Oct 2013 - 6:56 pm | धन्या
एकदम खुसखुशीत पुणेरी ष्टाईलचे लेखन.
18 Oct 2013 - 7:08 pm | अनन्न्या
११.४५ पर्यंत पोहोचु शकणार नाही, म्हणून २ लिटर दूध, पाव कि. साखर, दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या याच प्रमाणात घालून ते पेआशन केले जाईल.
18 Oct 2013 - 7:20 pm | अनिरुद्ध प
आधी आम्ही आपण सादर केलेल्या दुधाचे सेवन करु आणि मग प्यारे१ यान्च्या स्पेशल मसाला घातलेल्या दुधाचा आस्वाद घेवु
असो दुध उत्तम होते,(केशराचा स्वाद तसेच रन्ग दुध जास्त प्यायला प्रव्रुत्त करणारा होता[प्रकाशचित्रातल्या]),कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
18 Oct 2013 - 9:58 pm | पैसा
पुणेकर व्हायचा आणि ट्यार्पी खेचायचा क्षीण प्रयत्न. किंवा पुणेरी पाट्यांचा अभ्यास अंमळ जास्त झाला असावा.
लिखाण खुसखुशीत! (हे कबूल केलंच पाहिजे)
18 Oct 2013 - 10:26 pm | प्यारे१
आता ढवळ्या- पवळ्या , वाण - गुण वगैरे होतंच की थोडंफार!
बाकी आम्ही शिकतोय अजून बर्का. ;)
18 Oct 2013 - 10:08 pm | निवेदिता-ताई
+१
18 Oct 2013 - 10:40 pm | जेनी...
प्यारे काकु आवडेश गं लेख ...छान जमलाय गं एकदम !
18 Oct 2013 - 10:42 pm | सूड
ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे बाधते त्यांनी आपापल्या जबाबदारीवर प्राशन करावे. नंतर काही झाल्यास मंडळ जबाबदार नाही.
18 Oct 2013 - 10:46 pm | जेनी...
आणि ज्यांना नाय बादते त्यांची जवाबदारी मंडळ घेणार =))
18 Oct 2013 - 11:23 pm | प्रचेतस
अतिशय उत्तम, सकस आणि माहितीपूर्ण लेखन.
19 Oct 2013 - 12:14 am | प्यारे१
असं पण असतं काय? ;)
26 Oct 2015 - 2:36 pm | प्यारे१
कोजागिरिनिमित्त धागा वर काढत आहे.
आमची ही स्कीम बुवांच्या उपरोक्त पुरवणीसह तशेच महागाईभत्त्याच्या वाढीव दरांनुसार सुरु आहे याची नोंद घ्यावी. ;)
26 Oct 2015 - 3:46 pm | बाबा योगिराज
धंदा थोडा मंदा है.
कै डिस्को वाल्या उंटाची इस्किम काडा की रॉ....
दुधात आमची बुटी(जड़ी-बुटी वाली बर्का) घातली तर चालन का???
तहानलेला बाबा.
26 Oct 2015 - 3:46 pm | बाबा योगिराज
धंदा थोडा मंदा है.
कै डिस्को वाल्या उंटाची इस्किम काडा की रॉ....
दुधात आमची बुटी(जड़ी-बुटी वाली बर्का) घातली तर चालन का???
तहानलेला बाबा.
26 Oct 2015 - 11:48 pm | palambar
दुध एवढे स्वस्त कसे(म्हशिचे असुन) ?
27 Oct 2015 - 9:48 pm | स्वाती दिनेश
मसाला दूध मस्त झाले आहे,
थोडा छिद्रान्वेषीपणा- फक्त कोजागरी हवे, कोजागिरी नाही..
स्वाती
28 Oct 2015 - 12:27 am | दिवाकर कुलकर्णी
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर गाण येत नसल्यास सांगण्याचे पैसे नाही सांगीतलेत ते
28 Oct 2015 - 12:28 am | दिवाकर कुलकर्णी
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर गाण येत नसल्यास सांगण्याचे पैसे नाही सांगीतलेत ते
28 Oct 2015 - 12:37 am | प्यारे१
काका, काय हे?
तुम्हाला काय वाटेल तसं द्या.
सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं????
(धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)
28 Oct 2015 - 12:37 am | प्यारे१
काका, काय हे?
तुम्हाला काय वाटेल तसं द्या.
सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं????
(धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)