दिवाळीचे विष्णूपूजन !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 4:30 pm

आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते.

पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी. असं काय आहे विष्णूमध्ये की ज्यामुळे लक्ष्मी त्याचे पाय चेपते?

विष्णू जगाचा आणि जगातला सर्वश्रेष्ठ "मॅनेजर"! कधी गरूडावर बसून (far-sight) जग बघणारा तर कधी शेषावर निजून ground realities चा अंदाज घेणारा. विष्णूच्या एका हातात पांचजन्य शंख आहे (marketing / being heard), एका हातात सुदर्शनचक्र (remote control / reach), कौमुदकी गदा विष्णूची ताकद दर्शवते आणि शिक्षा करण्याचा अधिकारही (power / control). आणि विष्णूच्या एका हातात पद्म आहे (reward). आणि म्हणूनच विष्णू आपल्या (म्हणजे त्याच्या आणि जगाच्याही) आयुष्याच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे.

मग जर आपण विष्णूसारखं बनण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मी का नाही आपले पाय चेपणार?

बाबा रणछोडदास उगाच नाही सांगून गेले...."काबिलियतका (विष्णू) पीछा करो.. कामयाबी (लक्ष्मी) दौडते चली आयेगी |"

शुभ दीपावली ! :)

(प्रेरणा - देवदत्त पटनाईक)

संस्कृतीधर्मसमाजप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छासंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Nov 2013 - 4:51 pm | पैसा

विष्णुचं इंटरप्रिटेशन आवडलं!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2013 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा

पै तै ... +१ ...
खंप्लीट शहमती! :)

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 5:05 pm | प्यारे१

बुद्धीने सर्वही होते, बुद्धीदाता नारायणु| आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे|| :)

जुना विसरी पडलेला विचार नव्याने मांडल्याबद्दल अभिनंदन!

मृगनयनी's picture

1 Nov 2013 - 6:28 pm | मृगनयनी

मस्त!.. मॉर्गन'जी... आवडलं! .... महाविष्णु हा स्थिर आहे. आणि लक्ष्मी ही चंचल आहे. पण ती महाविष्णु'च्या चरणाची गोडी चाखण्यातच धन्यता मानते. पण लक्ष्मी ही "माये"चे स्वरूप आहे. त्यामुळे सामान्य नर हे तिच्या रुपावर, ती देत असलेल्या सम्पत्तीवर पटकन भाळतात. आणि तिच्या उपासनेच्या मागे लागतात. कितीही सम्पत्ती मिळाली, तरीही अजून काहीतरी मिळवण्याची एक जीवघेणी शर्यत ते खेळतच राहतात ...पण तेव्हा नकळत हे विसरून जातात ,की हा सर्व "त्या" महामायेचाच खेळ आहे. क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची शक्ती फक्त तिच्यातच आहे. ती एक महामायाच आपल्यासाठी सम्पतीचे डोन्गर निर्माण करून पुन्हा पुन्हा तिच्या मागे फिरण्यासाठी वेगवेगळी आमिषं दाखवत आहे....... पण ज्या नराची भक्ती ही महाविष्णु'च्या चरणापाशीच लीन झालेली आहे, त्याला विष्णुच्या प्रियेमागे म्हणजेच लक्ष्मीमागे वेड्यासारखे फिरावे लागत नाही. भक्ताच्या गरजेनुसार प्रेमळ हरी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. मग ती प्रापंचिक असो, अध्यात्मिक असो किन्वा पारमार्थिक असो..... हरीचे केवळ 'नाम'च भक्ताला तारणहार ठरते. एकदा या नामामृताची गोडी भक्ताला लागली, की आपसूकच भक्ताभोवती महाविष्णुचे अभेद्य सुरक्षाकवच निर्माण होते. याचा अर्थ त्या भक्तावर संकटे येतच नाहीत, असे नाही. कारण संकटे येणे... हा प्रारब्धाचा एक भोग आहे. साक्षात महाविष्णुलाही... कुठल्याही अवतारात तो भोग चुकलेला नाही... पण अखन्ड हरिनाम जर मुखात असेल, तर संकटे जरूर येतात पण चुटकीसरशी त्यांचे निवारण होते. सतत हरिनाम जपणार्‍या भक्ताला आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही. अर्थात मासा झाल्याशिवाय तो पाण्यात कसा पोहतो, श्वास कसा घेतो.. हे जसे आपल्याला समजत नाही किन्वा अनुभवता येत नाही... त्याप्रमाणे पवित्र हरिनामाची गोडी चाखल्याशिवाय आणि आपण स्वतः हरिनाममय झाल्याशिवाय हरि आपली काळजी कशी आणि किती घेतो... हे कळणार नाही....!!!!!!!!!.... धनत्रयोदशीच्या मन्गलमय शुभेच्छा!!!! :)

(प्रेरणा - देवदत्त पटनाईक)

हा छोटेखानी लेख वाचताना छापखाना टाईपचा वाटत होताच. :)

जे.पी.मॉर्गन's picture

2 Nov 2013 - 8:31 am | जे.पी.मॉर्गन

अग्रीड ! :-)

पण पटनाईकांचं इंटरप्रिटेशन आवडतं मला. त्या माणसानी आपल्याच मायथॉलॉजीकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली. आणि एक "स्कूल ऑफ थॉट" म्हणून चांगला प्रकार आहे. कंपनीत एक नवी कल्पना फ्लोट करता येते. एकंदर चांगलं लिहितो / बोलतो ह इसम.

शुभ दीपावली!

जे.पी.

उपास's picture

1 Nov 2013 - 8:16 pm | उपास

म्हणूनच सत्य'नारायणा'ची पूजा सार्वत्रिक/ सार्वकालिक आहे असं म्हणतात. विष्णुची ती सगळ्यात जवळची आणि करायला सोप्पी अशी पूजा.
अनुषंगाने -
मागे पर्वतीवर गेलो होतो तेव्हा वरती मागल्या बाजूच्या विष्णुमंदिरावर एक पाटी वाचनात आली. त्यातली रंजक माहिती अशी की संध्येतली जी विष्णुची २४ नावे आहेत (केशव, माधव, गोविंद.. ) ह्यांचा विष्णुच्या त्या नावाच्या मुर्तीतल्या हातातील शंख, चक्र, गदा ,पद्मा ह्या क्रमांकाशी संबंध आहे. एकूण ह्या चार गोष्टी चोवीस प्रकारे (चार फॅक्टोरीयल ४ गुणिले ३ गुणिले २ = २४) मांडता येतात आणि त्यानुसार विष्णुची त्या त्या नावतली मूर्ती बनविलेली दिसते.
लेख आवडलाच..
विष्णवे नमः | विष्णवे नमः | विष्णवे नमः||

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 11:16 pm | मुक्त विहारि

लेख आवडला

अमोल केळकर's picture

2 Nov 2013 - 10:54 am | अमोल केळकर

छान :)
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

अमोल केळकर

कवितानागेश's picture

2 Nov 2013 - 11:52 am | कवितानागेश

छान लिहिलय. :)

सूड's picture

2 Nov 2013 - 1:05 pm | सूड

आवडलं !!

अग्निकोल्हा's picture

5 Nov 2013 - 11:08 pm | अग्निकोल्हा

बाकी कवडिची अक्कल नसता घबाड हाती यावे प्रमाणे अनेकांच्या हातात लाखो, करोडो आलेले याची देहि याची डोळा बघत असल्याने आपण विष्णु असलेच पाहिजे यावर मात्र विश्वास नाही

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 4:36 am | स्पंदना

एक वेगळाच दृष्टीकोण!
आवडला. पण एक छोटीशी शंका आहे, अर्थात मजेत, लक्ष्मीबाई या जरा फार मत्सरी वगैरे असल्याचे ऐकुन आहे. मग त्यांना नवर्‍याचे भक्त आशिर्वाद देण्यास योग्य वाटतील का? नाही म्हणजे मी एव्हढी लोकप्रीय असुनही तुमच्या घरात रहाते अन मला तरीही काडीची किंमत नाही असा टिपीकल अ‍ॅटीट्युड असण्याचीही शक्यता आहे.
मजेत घ्या हो!

अनिरुद्ध प's picture

6 Nov 2013 - 7:55 pm | अनिरुद्ध प

वर्णन.

गुलाम's picture

7 Nov 2013 - 12:11 pm | गुलाम

छान लेख!!!

म्हणूनच लक्ष्मीची पुजा नेहमी नारायणासोबतच केली जाते. एकटी लक्ष्मी नुसतीच चंचल नसून संकटकारक आणि अशूभ मानली आहे (एकट्या लक्ष्मीचे वाहन घुबड मानले आहे). अर्थात येथे लक्ष्मीचा अर्थ संपत्ती आणि नारायणाचा अर्थ विवेक, सद्सद्विवेकबुद्धी असा होतो.
पुण्यात जमिनीचे भाव आभाळाला टेकल्यानंतर काही लोकांकडे अचानक, लायकी नसताना प्रचंड पैसा आला. असे लोक एकतर थोड्याच दिवसात पैसे संपून रस्त्यावर आले किंवा स्कॉर्पिअन संस्क्रुतीमध्ये कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या कच्छपी लागून गुंड बनले.