संवाद
तिचं ऑफिस सातव्या मजल्यावर, त्याचं दहाव्या. सकाळचे ८. नवीन नोकरीचा अतिउत्साह. फक्त दोघेच ऑनलाईन दिसत होते ऑफिस गृपवर. दोघांनाही आश्चर्य वाटलं.
त्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि हसून लिहिलं, "माझ्याशी स्पर्धा?"
तिचा बराच वेळ रिप्लाय नाही. तो कामात पुन्हा दंग. काही वेळातच ती समोर उभी राहिली, सुंदर हास्य, बोलके डोळे आणि उत्साह घेऊन. त्याचं अर्ध लक्ष कामात.
"कॉफी घेऊयात?", ती म्हणाली.
त्याला काही सुचेना, "तू पुढे हो, मी आलोच हे थोडंसं काम संपवून."
ती मागे वळून पाहत पाहत पोहोचली पँट्री मधे.
छान गाणं गुणगुणत होती ती, कॉफी घेता घेता.
