संवाद

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
21 Feb 2022 - 12:46 am

तिचं ऑफिस सातव्या मजल्यावर, त्याचं दहाव्या. सकाळचे ८. नवीन नोकरीचा अतिउत्साह. फक्त दोघेच ऑनलाईन दिसत होते ऑफिस गृपवर. दोघांनाही आश्चर्य वाटलं.

त्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि हसून लिहिलं, "माझ्याशी स्पर्धा?"

तिचा बराच वेळ रिप्लाय नाही. तो कामात पुन्हा दंग. काही वेळातच ती समोर उभी राहिली, सुंदर हास्य, बोलके डोळे आणि उत्साह घेऊन. त्याचं अर्ध लक्ष कामात.

"कॉफी घेऊयात?", ती म्हणाली.

त्याला काही सुचेना, "तू पुढे हो, मी आलोच हे थोडंसं काम संपवून."

ती मागे वळून पाहत पाहत पोहोचली पँट्री मधे.
छान गाणं गुणगुणत होती ती, कॉफी घेता घेता.

"छान म्हणतेस तू गाणं. ऐकलं मी थोडावेळ बाहेर थांबून". ती बावरली थोडी.
मग ती अधिकाराने म्हणाली, "बघ, कॉफी जमलीय का"

"तुझ्यासोबत यायला जमलं नाही लगेच", कडू कॉफी गोड मानून त्याने सावरायचा प्रयत्न केला.

"पण तू एवढ्या लवकर ऑफिसमधे?", त्याने विचारलं.

"तुझा पाठलाग करत होते", ती गंमतीने म्हणाली.

"आणि तू?", तिनेही हसून विचारलं.

"मी तुझं गाणं ऐकावं म्हटलं!"

दोघेही हसले, एकसुरात.
कॉफी संपली.
----

कथा

प्रतिक्रिया

संवादाची सुरुवात आवडली. :-)

कुमार१'s picture

21 Feb 2022 - 2:54 pm | कुमार१

आवडला संवाद.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 4:27 pm | मुक्त विहारि

एकदम हलकीफुलकी प्रेम कहाणी

चौथा कोनाडा's picture

22 Feb 2022 - 5:59 pm | चौथा कोनाडा

💓
आवडली गुलाबी कॉफी !

श्रीगणेशा's picture

22 Feb 2022 - 7:42 pm | श्रीगणेशा

धन्यवाद राघव, कुमार सर, मु वि, चौ को _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2022 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं. असं हलकं फुलकं सुरु राहीलं पाहिजे आयुष्यात.

-दिलीप बिरुटे

डाॅ बिरूटे सर , आे हलक, फुलक चालू राहिले पाहिजे ,हे म्हणायलाठीक आहे ,पण private office मधे चालून जाईल govt office मधे केले तर भारीच अर्थाचा अनर्थ होतो ,आपल्या बद्दल काय काय अपरोक्ष बोलतिल व काय नाही त्यांत स्त्रियांना लग्नापूर्वी, व्हायचेय लग्न म्हणून व विवाहानंतर झाले म्महणून ग काय कंड्या पिकतिल म्हणून भारीच दक्ष हावे लागतसे साधारण 80/90 च्या काळात ते आत्ता 14/16 साली निवृत्तीपर्यंत. नाहीतर office मधे ,तिच्याबद्दल कायकाय कंड्यपिकतिल व विवाह होणे मुष्कील किंवा विवाह झालेला असला तरी नवर्यामुळे दक्ष रहावे लागते, चुकूनही तोंडातून उल्लेख गेलातर नवरा काय करेल नि काय नाही हेही कांहींवर दडपण असतेच, जरी सर्वच नवरे असे नसतिलही पण orthodox असणारे घरातून बाहेर काढायचे त्या काळात
ही भिती, व त्याच्या घरातले या कामात पहिले पुढाकार घ्चायचे, बाकी दोघांचे मन जोडण्याच्या कामात नाही तिथे पटवून घेत असताना मुलगी तिला त्रास द्ययची पद्धत. काही ।हळवे पुरूषही अशी दक्षता घेताना मी स्वःता बघितलेय.,कळावे हा प्रतिवाद नाही अनुभवलेली वस्तुस्थिति सांगण्याचा प्रयत्न.