हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर
कटाक्ष-
नेटफ्लिक्स माहितीपट
वेळ - ८५ मिनिटे
भाषा- इंग्रजी
ओळख-
कटाक्ष-
नेटफ्लिक्स माहितीपट
वेळ - ८५ मिनिटे
भाषा- इंग्रजी
ओळख-
मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा-
१) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं. काही वेळा अनेक जण तिला (फारसं महत्त्वाचं कारण नसताना)छळत असतात.
२) कुठलीतरी एक सत्य गोष्ट कुणीतरी,कुणापासून तरी लपवत असतं आणि त्यावर एक वर्षभर मालिका चालते.
आत मी, बाहेर कोण?
जगण्याच्या अवस्था किमान दोन.
कधी पाखरू, कधी मुंगी,
तरी उतरत नाही जगण्याची धुंदी.
वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले,
पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.
संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला
निजलेलं माणूसपण जागवून गेला.
ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो,
अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो.
भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला
आतला अंधःकार तरी नाही मिटला.
माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा
स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा.
अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा
ज्याला गवसला तो विटेवरी उभा.
✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट
✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख
✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज?
✪ ये शाम मस्तानी!
✪ मळभ हटताना
✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
✪ गरज फक्त सोबत देण्याची
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम
लागेल काय सांगता येत नाय..!
म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं..
त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची.
अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना
ती आवडत असणार हे साहजिकच आहे..
आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!
नॉर्मली ते तसेच असते..!
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली.
तशी त्यांची कॉलेज पासूनची ओळख. पण खऱ्या अर्थाने मैत्री आणि भेटीगाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून चालू होत्या. भेटणं, बोलणं, फिरायला जाणं हे सर्व २६-२७ वर्षांची मध्यमवर्गीय घरातील मुलं-मुली ज्या भविष्यकालीन हेतूने करतात तसंच चाललेलं होतं.
तिला आता लग्नाची घाई झाली होती. त्याला भेटत असतानाच घरच्यांच्या आग्रहाने ती इतरही मुलांना ऑनलाईन भेटत होती. ते दोघे भेटल्यावर ती त्याला नेहमी विचारायची, आता पुढे काय? अजून किती वेळ घेणारेस तू? खरंतर त्यालाही ती आवडत होती. पण तो उगाच वेळ घेत होता. आपण अजून सेटल झालो नाही , १-२ वर्ष थांबूयात अशी माफक कारणं तो स्वतःच्याच मनाला देत होता.
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.
पाच सहा वर्षे झाली असतील. सातार्याहून मुंबै ला यायचे होते.
सातारा मुंबई थेट बस होती . रात्री साडे दहा ची वेळ असेल.
दहा वाजताच बसस्टँडवर जाऊन पोहोचलो. बसच्या स्टँडच्या शेडमधे तुरळकच उतारू होते.
अचानक तेथे एक बाई आली. वय वर्षे तीशीच्या आतच असेल.केस विस्कटलेले ,साडी अंगावर कोट. थंडी फारशी नव्हती तरीही तीने अंगावर ब्लेझर कोट घातला होता
तीच्या कडे काही सामानही दिसत नव्हते.
तीच्याकडे कोणाचे लक्ष्यही नव्हते.
अचानक काहितरी गलबला ऐकू आला म्हणून चमकून पाहिले. तर ती बाइ मोठमोठ्याने कोणावर तरी भांडत ओरडत होती.
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)